पुणे : शेअर बाजारात (Share market) गुंतवणुक केल्यास जादा परतावा मिळेल, असे आमिष दाखवून सायबर गुन्हेगारांनी एका वृद्ध नागरिकाची तब्बल 11 लाख 24 हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यात (Samarth police thane) अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (pune Fraud Rs 11 lakh by an elderly citizen)
फिर्यादी वृद्ध नागरीकाच्या मोबाइलवर काही दिवसांपुर्वी एका महिलेने संपर्क साधला. "एक्सलेंसा ऑप्शन ऑनलाइन ट्रेंडिग कंपनी'कडून शेअर बाजारात गुंतवणूक करण्यात येते. गुंतवणुक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष त्यांना दाखविण्यात आले होते. त्यास प्रतिसाद देत फिर्यादींनी सुरुवातीला त्यांच्याकडील काही रक्कम गुंतवणूक करण्यास दिली. त्यानंतर त्यांच्या मोबाईलवर एक मेसेज पाठविण्यात आला. त्यांनी केलेल्या गुंतवणुकीवर 35 लाख रुपये इतका नफा मिळाला असल्याचा मेसेज त्यांना पुन्हा पाठविण्यात आला.
त्यानंतर त्यांना आणखी काही रक्कम गुंतवणूक करण्यास सांगण्यात आले. ऑनलाइन पद्धतीने त्यांच्या खात्यावर परताव्यापोटी एक लाख 12 हजार 620 रुपये पाठविण्यात आले. अशा पद्धतीने फिर्यादीचा विश्वास संपादन केल्यानंतर संबंधीत व्यक्तींनी वेळोवेळी फिर्यादीकडून 11 लाख 24 हजार रुपयांची रक्कम ऑनलाईन माध्यमाद्वारे घेतली. त्यानंतर परतावा देणे थांबविले. दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांकडे फिर्याद दिली. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) उल्हास कदम करीत आहेत.
अशी घ्या काळजी
अनोळखी व्यक्तींच्या फोन, मेसेजला प्रतिसाद देऊ नका.
अनोळखी ईमेल, लिंकला प्रतिसाद देण्याचे टाळा.
अनोळखी व्यक्तींच्या फ्रेंड रिक्वेस्ट स्विकारू नका.
कोणत्याही आमिषाला बळी पडू नका.
आर्थिक व्यवहार करण्यापुर्वी कुटुंबीयांशी चर्चा करा.
फसवणूक होण्याची चिन्हे दिसल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधा.
इथे साधा संपर्क
व्हॉटसऍप क्रमांक - 7058719371 किंवा 7058719375
सायबर पोलीस ठाणे - 020 - 29710097
ई-मेल - crimecyber.pune@nic.in
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.