एकदा 'आय लव्ह यू' बोलणं गुन्हा ठरत नाही, ही तर अभिव्यक्ती: मुंबई सत्र न्यायालय

मुंबई सत्र न्यायालयाने मात्र एकदा 'आय लव्ह यू' म्हणणे गुन्हा ठरत नाही, असं म्हणत त्या मुलाची निर्दोष मुक्तता केली.
Saying 'I Love you' once is not a crime, this is an expression
Saying 'I Love you' once is not a crime, this is an expressionSakal
Updated on

आयुष्यात प्रत्येकालाच प्रेम हवं असतं. आपल्या प्रिय व्यक्तीवरील आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी 'आय लव्ह यू' म्हणून प्रपोज केलं जाते. म्हणूनच या शब्दांना मॅजिकल वर्ड असं म्हणतात. पंरतु एका मुलीला हे मॅजिकल शब्द बोलल्यामुळे एका २३ वर्षीय तरूणावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला. त्यानंतर मुंबई सत्र न्यायालयाने (Mumbai Session Court) मात्र एकदा 'आय लव्ह यू' म्हणणे गुन्हा ठरत नाही, असं म्हणत त्या मुलाची निर्दोष मुक्तता केली. (Saying 'I Love you' once is not a crime, this is an expression: Mumbai Sessions Court)

Saying 'I Love you' once is not a crime, this is an expression
'बरं झालं तू नकार दिलास..! एकतर्फी प्रेम करणाऱ्या प्रियकराचं लव्हलेटर

मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायाधीश कल्पना पाटील यांनी हा निकाल दिला. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, मुंबईतील एका 23 वर्षीय तरूणाने एका तरुणीसमोर प्रेम व्यक्त करताना तिला आय लव्ह यू असं म्हटले होते. त्यानंतर या तरूणीच्या कुटुंबियांनी वडाळा टीटी पोलीस ठाण्यात संबंधित तरूणाविरुद्ध तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी संबंधित तरूणावर पोक्सो (Pocso) कायद्याअंतर्गत लैंगिक छळाचा गुन्हा दाखल केला होता.

Saying 'I Love you' once is not a crime, this is an expression
रामसेतू व्हावा ऐतिहासिक वारसा; याचिकेवर सुप्रीम कोर्ट म्हणतं...

हे प्रकरण कोर्टात गेल्यानंतर तरुण त्या तरुणीचा वारंवार पाठलाग करत नव्हता वा तिला त्रासही देत नव्हता असं स्पष्ट झालं. शिवाय या तरुणाने फक्त एकदाच आय लव्ह यू म्हटलं होतं. त्यानंतर मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायाधीश कल्पना पाटील यांनी मुलीला एकदा आय लव्ह यू म्हणल्यास तो मुलीचा अपमान ठरत नाही, ही तर प्रेमाची अभिव्यक्ती आहे, असं म्हणत तरूणाची निर्दोष मुक्तता केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.