Crime News : दारू पिऊन घरात त्रास देत असल्याने आई व बहीणीने सुपारी देऊन केला तरूणाचा खून

तेलंगणा राज्यातील पाच आरोपींना अटक
crime news
crime newscrime news
Updated on

टेंभुर्णी : खून झालेल्या अज्ञात तरूणाची ओळख पटली असून सुकुमार व्यंकटरामण्णा गोडोचेरला (रा. सदाशिवपेठ मेडक तेलंगणा) असे त्या तरूणाचे नाव आहे. हा तरूण दारू पिऊन आई व बहीणीस त्रास देत होता. त्यामुळे आई व बहीणीने सुपारी देऊन त्याचा खून केल्याचे पोलीस तपासात उघड झाले असून आई ,बहीण व अन्य तिघे असे एकूण पाच आरोपींना टेंभुर्णी पोलीसांनी अटक केली आहे. या सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती टेंभुर्णीचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी दिली.

crime news
Jalgaon ZP News : शाळाखोल्या दुरुस्तीने शिक्षण घेणे सुसह्य; रावेर तालुक्यात शाळांची स्थिती समाधानकारक

या प्रकरणी मयत तरूणाची आई अन्नपूर्णा व्यंकटरामण्णा तोराडी उर्फ गोड्डूचेरला ( वय-60 ) बहीण विनयाकरूणा राजेंद्र चौधरी ( वय- 40 रा.शेरलिंगमपल्ली जि. रंगारेड्डी तेलंगणा) मुख्य आरोपी महंमद अकबर खान, मुनीरअली शब्बीरअली सय्यद ( वय-37) महिबुब वलीद अब्दुल ( वय -35 रा शेरलिंगमपल्ली जि. रंगारेड्डी तेलंगणा) असे अटक झालेल्य आरोपींची नावे आहेत.

crime news
Jalgaon ZP News : शाळाखोल्या दुरुस्तीने शिक्षण घेणे सुसह्य; रावेर तालुक्यात शाळांची स्थिती समाधानकारक

पुणे सोलापूर महामार्गावरील टेंभुर्णीतील बायपास रस्त्यावर लक्ष्मी पॅलेस समोरील कुबेर पाटील यांच्या शेतात आरोपींनी मृतदेह आणून टाकल्याची घटना 26 मे 2024 रोजी उघडकीस आली होती. मृतदेह कारमधून आणून टाकल्याचा संशय आल्याने पोलीसांनी वरवडे व सरडेवाडी येथील टोलनाक्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता संशयित कार (टीएस 09 /जीक्यूटीआर 3442)ही सरडेवाडी येथील टोलनाक्यावरून 26 मे 2024 रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास काचेला टाॅवेल व पाठीमागील बाजूस कपडा लावून पास होत असल्याचे दिसून आले. ती कार वरवडे टोलनाक्याचे फुटेज पाहिले असता 26 मे रोजी दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास पास झाल्याचे दिसुन आले.त्यावेळी खिडकीवर टाॅवेल व कपडा लावला नसल्याचे दिसून आले.कारच्या नंबर वरून मालकाचा शोध घेतला असता तो तेलंगणा राज्यातील असल्याने पोलीस पथक तेलंगणा राज्यात पाठवले तेथे कार मालकाचा शोध घेऊन चौकशी केली असता मयत तरूणाची ओळख पटली. यावेळी मयताची आई, बहीण, थोरला भाऊ ,मेव्हुणा यांचे जबाब नोंदवले. मयत हा आई व बहीणीस दारू पिऊन मारहाण करणे व इतर कारणावरुन त्रास देत होता असे सांगितले. पोलीसांनी नातेवाईक, मित्र, मयताची पत्नी, प्रेयसी, शेजारी यांच्याकडे बारकाईने चौकशी केली असता आई व बहीणीने सांगितलेल्या घटनेत तफावत आढळून आली.

crime news
Jalgaon News : शेतीच्या हिस्स्यावरून 2 गटांत हाणामारी; दहिवद शिवारातील घटना

त्यामुळे आई व बहीणीस विश्वासात घेऊन विचारले असता मयत सुकुमार हा घरात त्रास देत असल्याने त्यास मारण्यासाठी गल्लीतील महंमद अकबर खान यास सुपारी दिल्याचे उघडकीस आले. आरोपी महंमद अकबर खान याची गोपनीय माहिती काढली असता तो मुंबईत समजल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुरज निंबाळकर व त्यांच्या सहकार्यांनी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात हजर केले.महंमद अकबर खान याच्याकडे चौकशी केली असता त्याने 25 मे रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मयत तरूणाची आई व बहीणी समक्ष मयतास नोकरी लावतो म्हणून त्यास कारमध्ये बसविले. त्यावेळी मुख्य आरोपी महंमद अकबर खान, मुनीरअली शब्बीरअली सय्यद व महिबुब वलीद अब्दुल असे होते. हे सर्वजण पुणे येथे गेले तेथून आरोपीने चाकू खरेदी केला. नंतर पुण्याहून सोलापूरकडे येत असताना 26 मे रोजी दुपारी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास टेंभुर्णी बायपास रस्त्यावर कुर्डूवाडी ब्रीज पास होत असताना सुकुमार याच्या गळ्यावर, छातीवर 15 वार करून त्याचा ठार मारले. त्यानंतर मयत सुकुमार याचे प्रेत सर्व्हिस रोड च्या शेजारील मैदानावर टाकून सोलापूरच्या दिशेने निघून गेले होते.

जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे,अप्पर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कुलदीप सोनटक्के, सहाय्यक पोलीस फौजदार विलास रणदिवे,हवालदार विलास नलवडे, संदीप गिरमकर, प्रदीप पर्वते, पोलीस नाईक विनोद साठे, पोलीस कॉन्स्टेबल तुकाराम माने-देशमुख, महिला पोलीस कॉन्स्टेबल पुनम शिंदे, पुनम देवकर, मनिषा मंठाळे , स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुबोध जमदाडे,कांबळे, सुरज निंबाळकर, फिंगरप्रिन्ट तज्ञ सहाय्यक पोलीस निरीक्षक जालीवर गुळवे,पोलीस नाईक सागर मठपती, सायबर सेलचे व्यंकटेश मोरे यांनी ही कामगिरी केली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.