Ambabai Mandir : नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी तब्बल 1 लाख 34 हजारहून अधिक भाविकांनी घेतलं अंबाबाईचं दर्शन

Ambabai Mandir Kolhapur : सकाळी साडेआठ वाजता मुनीश्वर घराण्यातील परंपरागत श्रीपूजकांच्या हस्ते घटस्थापना झाली. तोफेच्या सलामीने घट बसले.
Ambabai Mandir Kolhapur
Ambabai Mandir Kolhapuresakal
Updated on
Summary

ऐतिहासिक भवानी मंडपातील तुळजाभवानी मंदिरासह शहरातील नवदुर्गा मंदिरातही पारंपरिक उत्साहात घटस्थापना होऊन नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला.

कोल्हापूर : दुष्ट प्रवृत्तींचा संहार करून भक्तांवर आपली कृपादृष्टी ठेवणारी आदिमाया, आदिशक्ती करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या (Ambabai) शारदीय नवरात्रोत्सवाला (Sharadiya Navratri Festival) कालपासून मंगलमय वातावरणात प्रारंभ झाला. सकाळी साडेआठच्या सुमारास तोफेची सलामी देऊन मंदिरात घटस्थापना झाली आणि उत्सवाला प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी श्रीसुक्तामध्ये वर्णन केलेल्या महालक्ष्मी रूपात देवीची सालंकृत बैठी पूजा बांधण्यात आली होती.

श्रीसुक्तातील श्री महालक्ष्मी आदिजननी आहे. तिने आपल्या तपोबळावर बिल्ववृक्ष निर्माण केला. ज्याची फळे तिला प्रिय आहेत. तिने सृष्टी निर्माण केली, असे वर्णन केलेल्या महालक्ष्मी रूपातील सालंकृत व मनोहारी पूजा बांधण्यात आली होती. श्रीपूजक संजीव मुनीश्वर, सुशांत कुलकर्णी, रवी माईणकर, आशुतोष जोशी यांनी पूजा बांधली.

Ambabai Mandir Kolhapur
Ambabai Temple : शारदीय नवरात्रोत्सवात अंबाबाई देवीची कशी असणार अलंकारिक पूजा? जाणून घ्या संपूर्ण माहिती

सकाळी साडेआठ वाजता मुनीश्वर घराण्यातील परंपरागत श्रीपूजकांच्या हस्ते घटस्थापना झाली. तोफेच्या सलामीने घट बसले. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, मंदिर व्यवस्थापक महादेव दिंडे यांच्या हस्ते शासकीय अभिषेक झाला. त्यानंतर शासकीय पूजा झाली. रात्री पालखी सोहळा झाला. कलश आकारात फुलांनी सजविलेल्या पालखीचे पूजन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील व जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते झाले.

दरम्यान, ऐतिहासिक भवानी मंडपातील तुळजाभवानी मंदिरासह शहरातील नवदुर्गा मंदिरातही पारंपरिक उत्साहात घटस्थापना होऊन नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला. तुळजाभवानी मंदिरात खासदार संभाजीराजे छत्रपती, संयोगिताराजे छत्रपती, मालोजीराजे छत्रपती, मधुरिमाराजे छत्रपती, शहाजीराजे छत्रपती व यशराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत घटस्थापना झाली. तुळजाभवानीची पहिल्या दिवशी धान्याच्या सुगीची खडी पूजा बांधण्यात आली.

Ambabai Mandir Kolhapur
'रावणाने लावला होता व्हायोलिनचा शोध, प्राचीन तामिळ संस्कृतीत सापडतो पुरावा'

सांस्कृतिक कार्यक्रमांना प्रतिसाद

अंबाबाई मंदिरात आज सकाळी सहा ते सात या वेळेत संगीता रेवणकर यांचे ललितसहस्रनाम, सात वाजता जगदीश गुळवणी यांचे श्रीसुक्त पठण झाले. यानंतर झालेल्या निरूपमा भजनी मंडळ, हरीप्रिया भजनी मंडळ, निधी भजन मंडळ, ओम भजनी मंडळ, श्री संत बाळूमामा भजनी मंडळ, श्रीपंत महिला भजनी मंडळ, पार्वती महिला भजनी मंडळ यांचे भजनाचे कार्यक्रम झाले. संकेत जोशी यांचे बासरी वादन झाले. अनुजा गाडे, विदुषी शाम्मवी अभिषेक यांनी गायन सेवा प्रदान केली. या सांस्कृतिक कार्यक्रमांना भाविकांचा प्रतिसाद मिळाला.

Ambabai Mandir Kolhapur
Navratri: गावात एकही विवाह सोहळा होत नाही, गावकरी पलंगावर झोपत नाहीत, काय आहे कारण? जाणून घ्या रेणुका मातेच्या प्रसिद्ध मंदिराबद्दल

यांनी घेतले दर्शन

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार जयश्री जाधव, जिल्हाधिकारी अमोल येडगे, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, संयोगिताराजे छत्रपती यांनी गुरुवारी करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले.

दृष्‍टिक्षेपात उत्सव

  • दर्शन मंडपासह प्रमुख चौकात अंबाबाईचे लाईव्ह दर्शन

  • मंदिरात रात्री पालखी सोहळ्यालाही गर्दी

  • विविध सेवाभावी संस्थांकडून भाविकांना सुविधा

  • चारही प्रवेशद्वारांवर सुरक्षेसाठी व्यवस्था

  • पारंपरिक उत्साहात घरोघरी घटस्थापना

  • सोंगी भजन, दांडियासह सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.