Rishipanchami festival : संतनगरीत आज ११४ वा ऋषिपंचमी उत्सव

Rishipanchami festival : मंदिर परिसरात विविध धार्मिक कार्यक्रम आणि आकर्षक विद्युत रोषणाईसह उत्सव साजरा केला जात आहे.
Rishipanchami festival
Rishipanchami festival sakal
Updated on

शेगाव : शेगावीचा राणा श्री संत गजानन महाराज यांचा ११४ वा पुण्यतिथी ऋषिपंचमी उत्सव संतनगरी शेगाव येथे श्री संस्थांमध्ये आज ता.८ सप्टेंबर रोजी मोठ्या भक्ती भावपूर्ण वातावरणामध्ये उत्साहात साजरा होत आहे.

या उत्सवानिमित्त मंदिरामध्ये ४ सप्टेंबर पासून विविध धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत.आज रविवारी श्रींचा मुख्य पुण्यतिथीचा उत्सव आहे. सकाळी १० वाजता मंदिरामध्ये राक्षसभुवन येथील ब्रह्मरुंदांच्या मंत्रोपचारात यागाची पूर्णाहुती व अवभृतस्नान होईल. तदनंतर श्रींच्या समाधी सोहळ्यानिमित्त कीर्तन पार पडेल. दुपारी मंदिर मधून श्रींची पालखी परिक्रमा वारकऱ्यांच्या सहभागाने टाळ मृदंगाच्या गजरात निघणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.