स्वयंरोजगाराची कास...

आपल्या समाजात गाईला अध्यात्माबरोबर वैज्ञानिकही तितकेच महत्त्व आहे. गोमय, गोमूत्रापासून केवळ औषधेच तयार होत नाहीत, तर दैनंदिन जीवनात लागणाऱ्या अनेक गृहोपयोगी वस्तूही तयार होतात.
Cow Production
Cow ProductionSakal
Updated on

आपल्या समाजात गाईला अध्यात्माबरोबर वैज्ञानिकही तितकेच महत्त्व आहे. गोमय, गोमूत्रापासून केवळ औषधेच तयार होत नाहीत, तर दैनंदिन जीवनात लागणाऱ्या अनेक गृहोपयोगी वस्तूही तयार होतात. गो उत्पादनातून स्वयंरोजगाराची कास अनेकांनी धरली आहे.

वैयक्तिक

  • हेअर टॉनिक, शाम्पू, तेल

  • पंचगव्य साबण, लहान मुलांसाठीही साबण

  • फेसपॅक, फेसवॉश

  • अंगराग पावडर

  • हँडवॉश

  • फेसक्रिम

  • गोमय लेप

  • उटणे

  • दंतमंजन

गृहोपयोगी

  • फिनेल

  • डिशवॉश बार

  • डिटर्जंट पावडर

  • डासांवरील कॉईल

  • टॉयलेट क्लिनर

  • सॅनिटायझर

उत्पादने

  • तूप

  • दूध पावडर

  • गोजल सरबत

पूजेचे साहित्य

  • धूप

  • गोबर कंडा

  • उदबत्ती

  • गोमय पणती

शेतीसाठी पूरक

  • सेंद्रिय खत

  • किडनाशके

  • गांडूळ खत

  • जीवामृत

  • दशपर्णी अर्क

वेगवेगळ्या गोशाळांमध्ये गो उत्पादनांसाठी खास मशिनरी विकसित करण्यात आली आहे. त्यातून मोठ्या प्रमाणावर रोजगाराची निर्मिती होत असते. नागरिकांमध्ये गो उत्पादनाबाबत दिवसेंदिवस जागरूकता निर्माण होत असून, या उत्पादनांना मागणीही वाढत आहे.

कणेरी मठात होत असलेले प्रयोग

कणेरी मठात विविध प्रकारच्या यंत्रांद्वारे औषधनिर्मिती होत आहे. औषधे व अन्य पदार्थ तयार करण्यासाठी मठाने स्वतंत्र इमारत उभारली आहे. डिस्टिलेशन प्लँट, पणती, तेल, गोमय व कुंडी तयार करणाऱ्या मशिनचा समावेश आहे. वेगवेगळ्या विभागात वेगवेगळी यंत्रे आहेत.

औषधाबरोबर टॉयलेट क्लीनरची निर्मिती

कणेरी मठात एक हजार गाईंच्या गोमूत्राच्या माध्यमातून दिवसाला सुमारे १०० ते २०० लिटर अर्क तयार केला जातो. या अर्काची बाजारभावातील किंमत २५० ते ३०० रुपये प्रतिलिटर इतकी आहे. याशिवाय आरोग्यदायी तेलाची निर्मिती केली जाते. महिन्याला सुमारे ५०० लिटर तेल या प्रकल्पाच्या माध्यमातून तयार केले जाते. पंचगव्य घृत महिन्याला ५० किलो इतके तयार होते. ४००० रुपये किलो या दराने हे घृत विकले जाते. दंतमंजन, डोळ्यात, कानात घालायची औषधे तयार केली जातात. महिन्याला सुमारे एक हजार बॉटल तयार होतात. याशिवाय टॉयलेट स्वच्छता करणारी औषधेही तयार केली जातात. फिनेल, डिश वॉश टॉयलेट क्लीनर आदी पदार्थ तयार केले जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.