Adhik Maas Purnima 2023: अधिक मासातील पुरुषोत्तम पौर्णिमा कधी आहे? 

शास्त्र आणि पुराणांमध्ये अधिक महिन्याच्या पौर्णिमेचे महत्त्व अधोरेखित केले असून, ती विशेष मानली गेली आहे.
Adhik Maas
Adhik Maasesakal
Updated on

Adhik Maas: यंदा अधिक मासामुळे श्रावण महिन्यात दोन पौर्णिमा आहेत. श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेच्या दिवशी पौर्णिमेचे व्रत पाळले जाते आणि स्नान-दान करण्याची परंपरा आहे. पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायणाची पूजा करून कथा ऐकतात. त्यांच्या आशीर्वादाने जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येते, असे मानले जाते. या दिवशी स्नान आणि दान केल्याने पुण्य प्राप्त होते आणि पापांपासून मुक्ती मिळते. 

हिंदू कॅलेंडरनुसार यावेळी श्रावण महिन्याचा शुक्ल पक्ष चालू आहे. मंगळवार 1 ऑगस्ट रोजी पहाटे 03.51 वाजल्यापासून अधिक महिन्याच्या शुक्ल पक्षाची पौर्णिमा सुरू होईल. ही तिथी 1 ऑगस्टच्या रात्री 12:01 पर्यंत वैध आहे. त्यामुळे श्रावण अधिक मासची पौर्णिमा 1 ऑगस्ट रोजी आहे.

पौर्णिमेच्या दिवशी, लोक ब्रह्म मुहूर्तापासूनच स्नान आणि दान करण्यास सुरुवात करतात. श्रावण अधिक मास पौर्णिमेचा ब्रह्म मुहूर्त पहाटे 04:18 ते 05:00 पर्यंत आहे. यानंतर, सकाळी 09:05 ते दुपारी 02:09 हा चांगला काळ आहे.

शास्त्र आणि पुराणांमध्ये अधिक महिन्याच्या पौर्णिमेचे महत्त्व अधोरेखित केले असून, ती विशेष मानली गेली आहे. अधिक महिन्याचे स्वामीत्व श्रीविष्णूंकडे असल्यामुळे याला पुरुषोत्तम मास असे म्हटले जाते. पुरुषोत्तम मासात श्रीविष्णूंप्रमाणे महादेव शिवशंकर यांचे पूजनही अतिशय शुभ आणि पुण्य फलदायी मानले गेले आहे. अधिक महिन्यात केलेले पूजन, नामस्मरण, आराधना, उपासना यांचे दसपटीने फळ मिळते, अशी लोकमान्यता असल्याचे सांगितले जाते. 

Adhik Maas
Adhik Maas 2023: छत्रपती संभाजीनगर मध्ये गाजतीय चक्क 'धोंडा स्पेशल थाळी', काय आहे स्पेशल ?

पुरुषोत्तम पौर्णिमा महालक्ष्मीला समर्पित असल्याची मान्यता आहे. या दिवशी धनलक्ष्मी देवीचे पूजन अत्यंत शुभलाभदायक मानले गेले आहे.या दिवशी देवीची मनोभावे पूजा करून धनलक्ष्मीचे शुभाशिर्वाद प्राप्त करण्याची सुवर्ण संधी असल्याचे सांगितले जाते. तंत्रशास्त्रात धनलक्ष्मी पूजनासह काही उपाय सांगण्यात आले आहेत. ते उपाय कर्जमुक्ती, भौतिक सुख-सुविधा, कौटुंबित शांतता, समृद्धी कारक मानले गेले आहे. तसेच पुरुषोत्तम पौर्णिमेला केलेल्या धनलक्ष्मी पूजनामुळे देवीचे शुभाशिर्वाद कायम राहतात.

Adhik Maas
Adhik Maas 2023 : राज्याबाहेर भगरीला परराज्यात मागणी; अधिकमासात फराळासाठी साबूदाणा, फलाहाराला पसंती

अधिक महिन्याच्या पौर्णिमेला सकाळी आणि सायंकाळी धनलक्ष्मी देवीचे पूजन, आरती, नामस्मरण करावे, असे सांगितले जाते. धनलक्ष्मी पूजनात कमळ आणि गुलाबांच्या फुलांचा आवर्जुन वापर करावा. तसेच नैवेद्यात लवंग अर्पण करावी आणि पूजनानंतर ग्रहण करावी. त्यातील एक लवंग पाकिटात ठेवावी. असा उपाय केल्याने कर्जमुक्ती जलदगतीने होऊ शकते. 

Adhik Maas
Nag Panchami 2023 : यंदा नागपंचमी कधी आहे ? जाणून घेऊ या पूजेचे महत्व शुभमुहूर्त आणि पूजा विधी

धनसंचय वृद्धिंगत होऊ शकतो. बचतीच्या योजना यशस्वी होतात, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.पुरुषोत्तम पौर्णिमेला धनलक्ष्मी पूजनासह काही स्तोत्रांचे पठण अत्यंत उपयुक्त ठरते, असे सांगितले जाते. धनलक्ष्मी पूजनानंतर लक्ष्मी स्तोत्र किंवा कनक धारा स्तोत्र पठण करावे, असे सांगितले जाते. शास्त्रांनुसार, या दोन्ही स्तोत्रांचे पठण केल्याने अनेकविध सिद्धी प्राप्त होऊ शकतात. राजयोग जुळून येतात. तसेच विरोधक आणि हितशत्रू नामोहरम होतात. इंद्राने रचलेल्या या स्तोत्रांच्या पठणामुळे ऐश्वर्य आणि अपार धन-संपदा प्राप्त होऊ शकते, अशी लोकमान्यता असल्याचे सांगितले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.