- श्रीरंग हिर्लेकर : ९४२२१११८९३
अनेकदा एकच तिथी दोन दिवस असते. अशा वेळेस कोणत्या दिवशी विशिष्ट कर्म करावे हा प्रश्न पडतो. यासाठी धर्मसिंधू किंवा निर्णयसिंधू असे ग्रंथ जवळ असावेत. त्यात यासंबंधी व्यवस्थित माहिती दिलेली असते. त्या माहितीनुसार आपले विशिष्ट धार्मिक कृत्य कधी करावे हा निर्णय पाहून ती वेळ पंचांगातील त्या दिवसांपैकी कधी लागू होते ते ठरवता येते.