Appasaheb Dharmadhikari social work
Appasaheb Dharmadhikari social worksakal

Appasaheb Dharmadhikari : सेवाकार्याचा ‘जागतिक’ ठसा..!

डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान (डीएसएनडीपी) ही भारतातील रेवदंडा येथील जागतिक, पुरस्कारप्राप्त स्वयंसेवी संस्था आहे.
Published on

डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान (डीएसएनडीपी) ही भारतातील रेवदंडा येथील जागतिक, पुरस्कारप्राप्त स्वयंसेवी संस्था आहे. जगभरातील सामुदायिक सेवेत गुंतलेल्या शेकडो स्वयंसेवकांमार्फत प्रतिष्ठानाचे कार्य चालवले जाते.

डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी स्थापन केलेल्या आणि डॉ. श्री. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली डीएसएनडीपी संस्था ‘वसुधैव कुटुंबकम’च्या प्राचीन भारतीय नीतिमत्तेसाठी वचनबद्ध आहे. स्वयंसेवकासह मानवतेची सेवा करण्याची वचनबद्धता, जगभरातील वैविध्यपूर्ण आणि सातत्यपूर्ण सामुदायिक सेवा प्रयत्न हे सर्वांसाठी एक पुरावा म्हणून उभे आहेत.

भारत, यूएसए, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, युनायटेड किंगडम, सिंगापूर, दुबई, ओमान, नायजेरिया अशा अनेक देशांमध्ये प्रतिष्ठानतर्फे ४५पेक्षा अधिक सामाजिक आणि पर्यावरणीय उपक्रम राबवले जातात, जसे की स्वच्छता मोहीम, रक्त आणि प्लाझ्मादान शिबिरे, मोफत वैद्यकीय तपासणी शिबिरे, वृक्षारोपण आणि संवर्धन मोहीम इत्यादी.

नोव्हेंबर २०१६मध्ये अमेरिकेत ‘थँक्सगिव्हिंग डे’ निमित्ताने डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानातर्फे (डीएसएनडीपी) सामाजिक परतफेड दृष्टिकोनाने देशव्यापी रक्तदान शिबिराचे आयोजन केले. सुट्टी असूनही, अनेक नि:स्वार्थी लोक रक्तदान करण्यासाठी पुढे आले, त्यांनी जीवनदानाबद्दल कृतज्ञता दर्शविली. हा कार्यक्रम प्रचंड यशस्वी झाला, अनेक युनिट रक्त जमा केले.

‘डीएसएनडीपी’च्या पुढाकाराने थँक्सगिव्हिंगची खरी प्रेरणा, प्रेम, दयाळूपणा आणि उदारतेचा प्रसार केला. रक्ताची मौल्यवान देणगी देऊन, देणगीदारांनी करुणा, सहानुभूती आणि सामुदायिक सेवा या मूल्यांचे उदाहरण दिले आणि इतरांच्या जीवनात अर्थपूर्ण बदल घडवून आणला.

फेब्रुवारी हा राष्ट्रीय कर्करोग प्रतिबंध महिना असल्याने डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या स्मरणार्थ कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानातर्फे (डीएसएनडीपी) २५ फेब्रुवारी २०२३ रोजी कर्करोग जनजागृती कार्यक्रम पार पडला. कर्करोगाचा प्रतिबंध हे २१व्या शतकातील सार्वजनिक आरोग्याच्या सर्वांत महत्त्वपूर्ण आव्हानांपैकी एक आहे.

त्यामुळे पूर्वनिदान, कर्करोगाचे संभाव्य जोखीम घटक आणि पूर्वउपचार याबाबत जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे. कर्करोगाविषयी जागरूकता वाढवणे आणि त्याच्याशी संबंधित न्यूनगंड कमी करणे हे या कार्यक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

हार्वर्ड, क्लिव्हलँड क्लिनिक आणि टफ्ट्स मेडिकल अशा प्रख्यात संस्थांमधील डॉक्टर आणि कर्करोग संशोधक तज्ज्ञ यांनी स्तन, कोलोरेक्टल, डिम्बग्रंथी (ओव्हेरिअन), गर्भाशय आणि गर्भाशयाच्या ग्रीवेचा कर्करोग याचे प्रतिबंध व चाचणी आणि महिलांची कर्करोगापासून बचाव आणि पूर्व निदान याविषयी समाजामध्ये जागरूकता निर्माण करणे याविषयी माहिती देण्यात आली.

टाइम्स स्क्वेअर, न्यू यॉर्क, जे शहर कधीही झोपत नाही ते महास्वछता अभियान आणि वृक्ष संवर्धन कार्यक्रमाने जागे झाले. डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान (डीएसएनडीपी) या जागतिक स्वयंसेवी संस्थेने २७ एप्रिल २०२४ रोजी ‘अर्थ डे- एव्हरी डे विथ डीएसएनडीपी’ महा स्वच्छता अभियान आणि वृक्षारोपण व संवर्धन करण्यात आले.

ज्यामध्ये अमेरिकेतील २९ राज्यांमधून आणि मेक्सिको, कॅनडा आणि भारत या देशांमधून ३०० हून अधिक प्रतिष्ठानाच्या स्वयंसेवकांनी सहभाग घेत न्यूयॉर्क व न्यू जर्सी शहरातील हुडसन यार्ड्स - द व्हेसल, हेरॉल्ड स्क्वेअर, मॅडिसन स्क्वेअर गार्डन, सेंट पॅट्रिक कॅथेड्रल, क्रायस्लर बिल्डिंग, ब्रायंट पार्क, टाइम्स स्क्वेअर, मॅडम तुसोड्स म्युझिअम, चार्जिंग बुल, वॉल स्ट्रीट (एनव्हायएसइ), मॅनहॅटन डाउनटाउन, सेंट्रल पार्क ट्रिनिटी चर्च, बॅटरी पार्क, वर्ल्ड तरडे सेंटर, अमेरिकन म्युझिअम ऑफ नॅशनल हिस्टरी, मॅनहॅटन ब्रिज, ब्रुकलिन ब्रिज अशा प्रसिद्ध २१ ठिकाणी स्वच्छता अभियान, वृक्षलागवड व वृक्षसंवर्धन या कार्यक्रमांद्वारे श्रमदान दिले.

जर्सी सिटी, न्यू जर्सी येथे २७ एप्रिल रोजी सकाळी आयोजित कार्यक्रमाच्या उद्‍घाटनाला खासदार अँजेला मॅकनाइट, आमदार जेसिका रामिरेझ, जिल्हाध्यक्ष अँथनी एल रोमानो ज्युनिअर, सभापती जॉयस ई. वॉटरमन राज्य-संचलित कार्यक्रम चालवणाऱ्या हजारो स्वयंसेवकांनी केलेल्या राष्ट्रव्यापी प्रयत्नांमध्ये प्रतिष्ठानाच्या योगदानाचे अधिकाऱ्यांनी कौतुक केले. अशा कार्यक्रमांच्या आयोजनाने हवामान बदलाच्या (ग्लोबल क्लायमेट चेंज) धोक्यावर मात करण्यासाठी प्रेरणा देईल, याबाबत प्रतिष्ठान आशावादी आहे.

न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध टाइम स्क्वेअर या जागेवर दोन शंभर फूट बाय शंभर फूट स्क्रीनवर डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानाचा व्हिडिओ ता. २७ एप्रिल रोजी भारतीय वेळेनुसार रात्री अकरा वाजून तीस मिनिटांनी व बारा वाजून तीस मिनिटांनी दाखविण्यात आला. तसेच ५० फूट बाय ५० फूट स्क्रीनवरदेखील हा व्हिडिओ दिवसभरातून ३६० वेळा दाखविण्यात आला. शंभर फूट बाय शंभर फूट स्क्रीनवर दिसणारा व्हिडिओ लाइव्ह लिंकद्वारे २७ एप्रिल रोजी लाखो सदस्यांनी बघितला.

संस्थापक डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि डॉ. श्री. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या नेतृत्वाखाली, अमेरिकेतील १८ राज्य व १०२ शहरांमध्ये स्वच्छता अभियान, वृक्ष लागवड आणि वृक्षसंवर्धनाचे कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. या अभियानाअंतर्गत आतापर्यंत एकूण २०३४ ‘श्री सदस्यां’नी मिळून २२९ कार्यक्रमांमधून सुमारे १७,३६५ किलो कचरा जमा केला आहे, तसेच १७,६५० वृक्षांची लागवड आणि संवर्धन करण्यात आले आहे.

प्रतिष्ठानातर्फे राबविण्यात आलेल्या कार्यक्रमांमुळे आतापर्यंत अमेरिकेतील सरकारची अंदाजे सत्तर लाख रुपयांची बचत झाली आहे. या विविध कार्यक्रमांमुळे डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानाच्या नावाचे एकूण ४४ फलक अमेरिकेतील महामार्ग, उद्याने व रेल्वे स्टेशन इत्यादी ठिकाणी लागले आहेत. ‘डीएसएनडीपी’चे समाजाप्रती असलेले समर्पण ४९ वृत्तपत्र आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी स्वीकारले आहे आणि प्रतिष्ठानचे कौतुक केले आहे.

कॅनडातील कार्य

कॅनेडियन ब्लड सर्व्हिसेसने दशकांमध्‍ये रक्तदात्यांच्या टंचाईचा सामना केला आहे. कॅनेडियन ब्लड सर्व्हिसेसचे म्हणणे आहे की, त्यांनी संपूर्ण महामारीमध्ये ३१ हजार रक्तदाते (ब्लड डोनर्स) गमावले, परिणामी एका दशकातील सर्वांत कमी रक्तदात्यांची संख्या झाली.

कॅनडामधील रक्त आणि प्लास्मा यांची टंचाई भरून काढण्यासाठी डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान पुढे येऊन, कॅनेडियन ब्लड अँड प्लास्मा ड्राईव्ह सर्व्हिसेस यांचा मदतीने प्लाझ्मा ड्राईव्ह आयोजित करण्यात आला. जेणेकरून रक्तदात्यांची टंचाई भासणार नाही. जुलै २०२२ आणि ऑक्टोबर २०२३ मध्ये, ‘डीएसएनडीपी’मार्फत टोरंटो, कॅनडामध्ये प्लाझ्मादान मोहिमेचे आयोजन करण्यासाठी कॅनेडियन ब्लड सर्व्हिसेससोबत कार्य केले.

या यशस्वी कार्यक्रमांमध्ये अनेक नागरिक पुढे आले आणि प्लाझ्मादान केले. त्याची अनेक लोकांना याची मदत झाली. या मोहिमेचा मुख्य उद्देश रक्त आणि प्लाझ्मा दान करण्याच्या महत्त्वाविषयी जागरूकता वाढवणे आणि ‘डीएसएनडीपी’ आणि कॅनेडियन ब्लड सर्व्हिसेसने एकत्रितपणे काम करून औदार्य आणि सामुदायिक सेवेच्या संस्कृतीला प्रेरित करणे, तसेच गरजूंना मदत करण्यासाठी रक्त आणि प्लाझ्मा यांचे दान करण्याच्या महत्त्वाचा प्रचार करणे, हे होते.

प्रतिष्ठानमार्फत कॅनडा येथे ६ शहरांमध्ये स्वच्छता अभियान, वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धनामार्फत आतापर्यंत एकूण ३८७ ‘श्री सदस्यां’नी मिळून १९ कार्यक्रमांमधून ३७५९ किलो कचरा जमा केला आहे, तसेच ३०० वृक्षांची लागवड आणि संवर्धन करण्यात आले आहे. प्रतिष्ठानातर्फे राबविण्यात आलेल्या कार्यक्रमांमुळे आतापर्यंत कॅनडातील सरकारची अंदाजे ८ लाख ३५ हजार रुपयांची बचत झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()