प्राचीन काळी लोक कडुलिंबाच्या पानावर गुळ टाकून नवीन वर्ष साजरे करायचे. त्यामुळे नवीन वर्षात तुम्ही खाल्लेली पहिली गोष्ट म्हणजे कडू आणि गोड यांचे मिश्रण. मग तुम्ही कॅलेंडर पाहता, जे तुम्हाला वेळ, तारीख, योग, दिवसाचे नक्षत्र सांगते. त्यामुळे ज्ञानासमवेत गोड-कडू स्वीकारणे माणसाला पुढे वाढण्याचे प्रचंड बळ देते.
जीवनात ज्याला तुम्ही कडू मानता त्याने तुम्हाला खोली दिली आहे, तुम्हाला बळकट केले आहे. त्यामुळे तुमच्या आयुष्यात जी आव्हाने येतात ते तुम्हाला बळकट, अधिक सामर्थ्यवान बनवीत आहेत आणि जीवनातील गोडवा तुम्हाला दिलासा देतो. जीवन फक्त कडू असल्यास त्याला स्थायित्व नाही. जीवन फक्त गोड असल्यास प्रगल्भता नाही. त्यामुळे जीवन हे दोन्हींचे मिश्रण आहे आणि काळाचाही हाच स्वभाव आहे.
काळाच्या चक्रात नेहमीच काहीतरी अद्भुत घडत असते त्यात काही गोष्टी इतक्या आनंददायी नसतात. काही चांगले नसलेले घडते, तेव्हा तुमच्या जवळ सामर्थ्य, धैर्य आणि ज्ञान असणे आवश्यक आहे आणि चांगल्या गोष्टी घडतात तेव्हा तुमच्यात इतरांचा समावेश करण्याची आणि सेवा करण्याची क्षमता असणे आवश्यक आहे. तुम्ही दररोज ध्यान करता तेव्हा वाईट काळाचा प्रभाव कमी होतो आणि कल्याणकारी किंवा चांगल्या वेळेचा प्रभाव वाढतो. त्यामुळे खऱ्या प्रामाणिक उत्सवासाठी ज्ञान, सत्संग आणि सेवा हे सर्व महत्त्वाचे आहे. जेव्हा निसर्गाचा पूर्ण स्वीकार असतो तेव्हाच खरा उत्सव होतो.
आव्हाने कशीही असली, तरी एक चांगले जग निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्न करीत राहणे आवश्यक आहे.
आपण स्वत्वामधे स्थिर होतो, तेव्हा हे शक्य आहे. तुमच्यामध्ये एक अभिनेता आणि एक साक्षी आहे. तुम्ही आत जाता, तसे तुमच्यात साक्षीचा पैलू वाढत जातो आणि तुम्ही घटनांपासून अलिप्त राहता. तुम्ही बाहेर जाता, तसतसा तुमच्यातील अभिनेता परिस्थितीला प्रतिसाद देण्यात अधिक कुशल बनतो. आपल्या अस्तित्वाच्या या दोन पूर्णपणे विपरीत पैलूंचे पोषण ध्यानाद्वारे केले जाते. तुम्ही स्वत्वाच्या जवळ येता, तेव्हा तुमची कृती जगात शक्तिशाली बनते आणि जगात केलेली योग्य कृती तुम्हाला स्वत्वाच्या जवळ आणते. नवीन वर्ष जवळ येत आहे, तसे आपण अचल राहण्याचा आणि एका चांगल्या जगाकडे वाटचाल करण्याचा संकल्प करूया.
वेळ माणसाला बदलते, पण काळ बदलणारी माणसेच असतात. आपण देखील त्यापैकीच एक होऊया.
नवीन वर्षाच्या शुभेच्छा!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.