Ashadhi Ekadashi 2022 भक्तिसंगीताद्वारे आज औरंगाबाद शहरात विठूरायाची सेवा

आषाढी एकादशीनिमित्त विविध संस्थांकडून उपक्रम
Ashadhi Ekadashi 2022
Ashadhi Ekadashi 2022
Updated on

औरंगाबाद - आषाढीनिमित्त २५ वर्षांपूर्वी भक्तीगीते - अभंग आदी भक्तिसंगिताच्या माध्यमातुन स्वरविहारने माऊलीच्या सेवेला शहरात सुरूवात केली. त्यानंतर आषाढी एकादशीनिमित्त विविध संस्थांकडून भक्तीसंगीतांच्या माध्यमातुन माऊलीची सेवा केली जात. प्रतिवर्षप्रमाणे यंदाही आषाढी एकादशीनिमित्त रविवारी शहरात वेगवेगळ्या ठिकाणी भक्तिसंगीताच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सखा पांडुरंग संगीत महोत्सव

स्वरमय गीतगुंजन व शिवाजीनगरातील स्वामी समर्थ सेवा केंद्राच्यावतीने प्रा.डॉ.तुकाराम वांढरे यांच्या ‘ सखा पांडुरंग '' या भक्ती संगीत महोत्सवाचे रविवारी आयोजन करण्यात आले आहे. शिवाजीनगरातील मोरया मंगल कार्यालयात सायंकाळी ६.३० वाजता हा महोत्सवर होईल .कार्यक्रमात प्रा. डॉ. तुकाराम वांढरे, ज्ञानेश्वर वांढरे, वर्षा जोशी , वेणू वांढरे, मधुरा वांढरे विविध भक्ती गीते सादर करणार आहेत . तर ज्ञानेश्वर शिंदे, संतोष खंडागळे , जितेंद्र साळवी, विनोद वाव्हळ हे वाद्यसंगीताची साथसंगत करतील. निवेदन प्रा. डॉ. समाधान इंगळे करणार आहेत.

आज जय हरी विठ्ठल भक्तीगीत कार्यक्रम

औरंगाबाद : आषाढी एकादशी निमित्ताने स्वरराजच्या माध्यमातून गायक प्रमोद सरकटे निर्मित जय हरी विठ्ठल हा भक्तीसंगीताचा कार्यक्रम रविवारी एमजीएमच्या रुख्मणी सभागृहात सायंकाळी सात वाजता घेण्यात येणार आहे.

गायक प्रमोद सरकटे आणि डॉ कीर्ती सरकटे यांची संकल्पना असलेल्या कार्यक्रमास एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम,अनुराधा कदम, एमजीएमचे चेअरमन कमलकिशोर कदम यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमात कमलकिशोर कदम यांना आषाढी महोत्सव गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, एमजीएम रुग्णालयाचे उपअधिष्ठाता डॉ. प्रविण सुर्यवंशी, डॉ. आनंद निकाळडे, श्रीधर वक्ते या सर्वांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. कार्यक्रमात गायक प्रमोद सरकटे, स्वराज सरकटे अमृता दहिवेलकर हे सादरीकरण करणार आहे. समीरा गुजर निवेदनाची बाजू सांभाळतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.