Ashadhi Ekadashi 2024 : आषाढी एकादशीच्या निमित्ताने घरासमोर काढा विठुरायाच्या आकर्षक रांगोळ्या, अंगणाला येईल शोभा..!

Ashadhi Ekadashi 2024 Spacial Attractive rangolis by Vithuraya: ‘अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर’..!
Ashadhi Ekadashi 2024
Ashadhi Ekadashi 2024 esakal
Updated on

Ashadhi Ekadashi 2024 : ‘अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर’..! सध्या महाराष्ट्रातील वातावरण हे विठ्ठलमय झाले आहे. टाळ-मृदंगाच्या घोषात पायी चालत आलेली वारी उद्या लाडक्या विठुरायाच्या चरणी लीन होईल. पंढरपुरातील चंद्रभागेच्या काठावर उद्या वैष्णवांचा मेळा जमलेला पाहायला मिळेल. उद्या आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरी केली जाईल.

या आषाढी एकादशीला फार महत्व आहे. वर्षभरात येणाऱ्या एकादशींमध्ये सर्वात महत्वाची असणारी एकादशी म्हणजे आषाढी एकादशी होय. या एकादशीला महाएकादशी म्हणून ही ओळखले जाते. पंढरपुरातील वारीचा उत्सव हा डोळ्यांचे पारणे फेडणारा असतो. वारीची ही अनोखी परंपरा आपल्या महाराष्ट्राला लाभली हे आपल्या सर्वांचे भाग्यच म्हणावे लागेल.

आषाढी एकादशीच्या निमित्ताने तुम्ही तुमच्या घरासमोर, देवघरासमोर किंवा अंगणात सुंदर रांगोळ्या काढू शकता. आज आम्ही तुम्हाला अशाच काही आकर्षक आणि सोप्या रांगोळ्यांची डिझाईन्स दाखवणार आहोत.

Ashadhi Ekadashi 2024
Ashadhi Ekadashi 2024 : आषाढी एकादशीच्या निमित्ताने भगवान विष्णूंच्या 'या' प्रमुख मंदिरांना नक्की द्या भेट

विठूरायाची रांगोळी

आषाढी एकादशीनिमित्त तुम्ही तुमच्या अंगणात किंवा देवासमोर अशी सुंदर रांगोळी काढू शकता.

Ashadhi Ekadashi 2024
Ashadhi Ekadashi 2024 pinterest

सर्वात आधी असा गोलाकार काढून त्यात तुमच्या आवडीचा रंग भरा आणि विठ्ठलाची सुंदर प्रतिकृती काढून घ्या. त्यानंतर हवे ते रंग भरून बाहेरून फुलांची सुंदर डिझाईन काढा.

ठिपक्यांची सुबक रांगोळी

सणासुदीच्या दिवशी दारासमोर सुंदर रांगोळी काढणे शुभ मानले जाते. त्यामुळे, अंगणाला शोभा येते आणि वातावरण प्रसन्न राहते.

Ashadhi Ekadashi 2024
Ashadhi Ekadashi 2024 Pinterest

आषाढी एकादशीच्या निमित्ताने तुम्ही या प्रकारची सुबक ठिपक्यांची रांगोळी काढू शकता. या रांगोळीमध्ये तुम्ही सावळ्या विठुरायाचे रूप साकारू शकता.

पानाफुलांची सोपी रांगोळी

जर तुम्हाला रांगोळी काढण्यासाठी फार वेळ नसेल आणि धावपळीत परंतु, सुंदर रांगोळी काढायची असेल तर तुम्ही या प्रकारची रांगोळी काढू शकता.

Ashadhi Ekadashi 2024
Ashadhi Ekadashi 2024 pinterest

यासाठी सुरूवातीला गोलाकार काढून घ्या. त्याच्या अवतीभोवती अशी सुंदर फुले आणि पानांची डिझाईन काढून घ्या. त्यानंतर, बाजूने रंग भरून घ्या. आता मधोमध विठ्ठल नाव लिहा. तुमची सोपी आणि आकर्षक रांगोळी तयार आहे.

Ashadhi Ekadashi 2024
Ashadhi Wari 2024 : आषाढी वारीनिमित्त छोट्या वारकऱ्यांची अशी करा तयारी, फॉलो करा 'या 'सोप्या टिप्स

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.