Ashadhi Wari 2024: पंढरीच्या पांडुरंगाच्या छातीवर खड्डा का आहे, काय आहे त्यामागील कथा?

Vithoba Temple History : कोणत्या ऋषींनी श्री विष्णूंना लाथ का मारली होती?
Ashadhi Wari 2024
Ashadhi Wari 2024esakal
Updated on

Ashadhi Wari 2024 : वारी म्हणजे तमाम महाराष्ट्रातील विठ्ठलभक्तांचं श्रद्धास्थान. वारी एक परंपरा आहे, संस्कृती आहे. दरवर्षी पंढरीची वारी करून वारकरी आषाढी आणि कार्तिकी एकादशीच्या दिवशी पांडुरंगाच्या दर्शनाला जातात. तहान, भूक, ऊन, पाऊस, वारा कशाचीही पर्वा न करता वारीचा प्रवास अविरत सुरु असतो.

विठ्ठलावर अपरंपार श्रद्धा ठेवून कित्येक वारकरी वारी करतात आणि वर्षानुवर्षे चालत आलेली विठ्ठलभक्तीची परंपरा पुढे चालू ठेवतात. वारकऱ्यांसाठी सुख म्हणजे विठोबाच्या चरणावर नतमस्तक होणे होय. पंढरीच्या सावळ्या परब्रह्मांची विविध काळात विविध नावांनी उपासना केली आहे.

पंढरीनाथ, पांडुरंग, पंढरीराया, विठाई, विठोबा, विठुमाऊली, विठ्ठल गुरूराव, पांडुरंग, हरि, इ. नांवे भक्तांनी दिलेली आढळतात. आज सर्वपरिचित व प्रचलित नांव म्हणजे 'पांडुरंग'आणि 'श्रीविठ्ठल'. विठ्ठल शब्दाची उत्पत्ती कशी झाली याचा अनेक इतिहासकारांनी व संशोधकांनी अभ्यास केला आहे.बरेच लोक विठ्ठल हा शब्द विष्णू या शब्दाचा अपभ्रंश आहे असे म्हणतात.

Ashadhi Wari 2024
Ashadhi wari 2023 : आषाढीच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता ; चंद्रभागा नदीपात्रातून काढला ४८ टन कचरा

हिंदू देवतांची अनेक मंदिरे आहेत. त्या मंदिरांची तिथल्या मुर्तीची अनेक वैशिष्टे आहेत. या वैशिष्टांनूसार कही गोष्टी काही आख्यायिका सांगितल्या जातात. त्यानुसारच आज आपण एक खास गोष्टीबद्दल माहिती घेणार आहोत.

कसं आहे विठ्ठलाचं रूप

विठ्ठलाच्या पायाखाली दगडी चौकोनी वीट आहे. विटेखाली उलटे कमळ आहे. संत ज्ञानेश्वर, तुकाराम आदी संतांनी जिथे माथा टेकवला ते विठ्ठलाचे चरण अतिशय कोमल आहेत.

चरणावर बोटाच्या आकाराचा छोटा खड्डा आहे.पायावर ध्वजक्त्रअंकुशादी चिन्हे आहेत. पायामध्ये तोडे आहेत. त्याने पीतांबर परिधान केला आहे. वस्त्राच्या निऱ्या व सोगा खाली रूळत आहे.

दिनांचा दयाळू, भक्तकामकल्पप्रदुम आणि योगियादुर्लभ असलेल्या विठुरायाची मूर्ती स्वयंभू अशी वालुकामय शिलेची आहे. श्रींच्या मस्तकी मुकुटासारखी उंच कंगोरेदार टोपी आहे. याचा आकार शिवलिंगासारखा असल्यामुळे त्यास शिवलिंग म्हणतात.

श्रींचे मुख उभट आहे. गाल फुगीर आहेत. दृष्टी समचरण आहे. कानी मकर कुंडले आहेत. गळ्यात कौस्तुभमणी आहे. पाठीवर शिंके असून ह्रदयस्थानी श्रीवत्सलांछन आहे. दोन्ही दंडावर अंगद असून मनगटावर मणिबंध आहेत.

Ashadhi Wari 2024
Ashadhi Wari : पालखी मार्गावरील मटण, बिअर बार, मद्य विक्री बंद करा; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

नितंब कराभ्याम् धृतो येन तस्मात् असे आद्यशंकराचार्यांनी श्रीविठ्ठल मूर्तीचे पांडुरंगाष्टक लिहून सुंदर व मार्मिक वर्णन केलेले आहे. श्रीविठ्ठलाने हात कटेवर ठेवलेले आहेत. उजव्या हातात कमळाचा देठ असून हात उताणा, अंगठा खाली येईल असा टेकविला आहे, तर डाव्या हातात शंख आहे.

श्रींचे कमरेला तिहेरी मेखला आहे. छातीवर उजवीकडे भृगुऋषींनी पादस्पर्श केलेली खूण आहे. ब्रह्मदेव निघालेली नाभी आहे. कमरेला वस्त्र आहे. वस्त्राचा सोगा पावलापर्यंत आहे. डाव्या पायावर मुक्तकेशी नावाच्या दासीने बोट लावलेची खूण आहे. अशी दगडी विटेवर उभी असलेली मूर्ती आहे

विठ्ठलाच्या मुर्तीवर असलेला तो ठसा!
विठ्ठलाच्या मुर्तीवर असलेला तो ठसा!esakal
Ashadhi Wari 2024
Ashadhi Wari 2024 : विठू माऊलीच्या कानात मासोळ्या का आहेत?

विठ्ठलाच्या छातीवर असलेला तो खड्डा नसून पायाचा ठसा आहे. आता देवाच्या छातीवर पाय देण्याची हिम्मत कोणी केली. आणि असं का घडलं. याबद्दल पुराणात एक कथा सांगितली जाते. तर भगवान विष्णूंना भृगु ऋषींनी लाथ मारली होती. त्याची कथा पाहुयात.

भृगु ऋषींनी श्री विष्णूंना लाथ का मारली

एकदा ऋषी-मुनी सरस्वती नदीच्या तीरावर जमले होते आणि ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्यामध्ये श्रेष्ठ कोण याची चर्चा करत होते. पण या चर्चेतून काही निष्कर्ष निघत नाही हे पाहून त्याने तिन्ही देवतांची परीक्षा घेण्याचा विचार केला. या कार्यासाठी ब्रह्माजींचे पुत्र महर्षी भृगु यांची निवड करण्यात आली.

Ashadhi Wari 2024
Ashadhi Cycle Wari : सायकल रॅलीतून देणार पर्यावरण रक्षणाचा संदेश; लासलगावहून रॅली पंढरपूरसाठी रवाना

भृगु ऋषी सर्वात आधी ब्रह्मलोकात गेले. तिथे जाताच त्यांनी ब्रह्मांजींना ना नमन केले ना त्यांची स्तुती केली. हे पाहून ब्रह्माजी संतापले आणि त्यांचा चेहरा रागाच्या अतिरेकाने लाल झाला, पण भृगुजी आपला पुत्र आहे असे समजून त्यांनी आपल्या विवेकाने आपला राग दाबून ठेवला.

तेथून महर्षी भृगु कैलासला निघून गेले. ऋषींना येताना पाहुन पाहून देवाधिदेव महादेव प्रसन्न होऊन आपल्या आसनावरून उभे राहिले. त्यांना मिठी मारण्यासाठी हात पसरला, पण भृगु त्याची परीक्षा घेण्यासाठी आले होते.

भृगुने आलिंगन नाकारले आणि म्हणाले, "महादेवा, तुम्ही नेहमी धर्माच्या प्रतिष्ठेचा भंग करता, दुष्ट पापी लोकांना तुम्ही सहज वर देता, पण त्यानंतर ते संपूर्ण सृष्टीला त्रास देतात, म्हणून मी तुम्हाला कधीच मिठी मारणार नाही."

हे ऐकून भगवान शिव संतापले. त्याने त्रिशूल उचलून भृगुचा वध करण्याचा प्रयत्न केला, पण सती मध्येच आली, ज्यामुळे त्याचा राग शांत झाला.

Ashadhi Wari 2024
Ashadhi Wari 2023 : आमदार बालाजी किनीकर वारकऱ्यांच्या सेवेत! वारकऱ्यांच्या पायाला केली मालिश

यानंतर भृगु मुनी वैकुंठाकडे गेले. त्यावेळी भगवान विष्णू देवी लक्ष्मीच्या मांडीवर डोके ठेवून पडले होते. भृगु ऋषींनी येताच त्याच्या छातीवर तीक्ष्ण लाथ मारली. श्रीहरी विष्णू लगेच आपल्या आसनावरून उठले आणि त्यांना प्रणाम करून त्यांचे पाय दाबले आणि म्हणाले, "महाराज! तुमचा पाय दुखावला तर नाही ना?

महाराज तुम्ही इथे येणार हे मला माहिती नव्हतं?, त्यामुळे मी तुमचे स्वागत करू शकलो नाही. तुमच्या चरणांचा स्पर्श मनुष्याला पवित्र करणार आहे आणि तुमचे पाय माझ्या शरीराला स्पर्श झाले. या चरणस्पर्शाने मी आज धन्य झालो आहे,

हे बोल ऐकून ऋषींना खात्री पटली की, श्री हरी विष्णू श्रेष्ठ आहेत. मग ते ऋषी-मुनींकडे परतले आणि येथे ब्रह्माजी, शिवजी आणि विष्णूजी यांना आलेले सर्व अनुभव सविस्तर पणे सांगितले. तेव्हापासून ते भगवान विष्णूची सर्वोत्कृष्ट म्हणून पूजा करू लागले.

पंढरीचा पांडुरंग हा साक्षात भगवान विष्णू यांचाच अवतार आहे. त्यामुळे विठोबाच्या छातीवरही ऋषींच्या पायाच्या ठसा उमटला आहे. पूजा सुरू असताना, अभिषेक घालताना तो अंगठ्याचा ठसा अगदी उठून दिसतो.

पायावर देखील आहे खड्डा

विठ्ठलाच्या पायाच्या मध्ये एक खोलगट खड्डा पड्लेला आहे त्या विषयी असे सागण्यात येते की फ़ार वर्षापुर्वी मयुकेशनी नावाची अप्सरा होती तिला आपल्या सॊदर्यावर खुप गर्व होता. ती अप्सरा विठ्ठल दर्शनाला आल्यावर तिला विठ्ठलाचे पाय खुपच नाजुक लागले तिने पायाना स्पर्श करतात तेथुन रक्त वाहु लागले. यामुळे अप्स्ररेचा गर्व कमी झाला.व त्यांची खुण म्हणुन विठ्ठलाच्या तळ्व्याच्या वरील बाजुला खड्डा आहे. असे ते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.