Ashadhi Wari : देहूनगरीतून आज होणार तुकोबांच्या पालखीचं प्रस्थान, फुगड्या अन् भजनांमध्ये वारकरी दंग

देहूनगरीतून तुकोबांची वारी आज पुढल्या प्रवासाच्या दिशेने वाट वळवणार असून वारीचा पुढला मुक्काम हा इनामदार वाडा इथे असणार आहे
Ashadhi Wari
Ashadhi Wari esakal
Updated on

Ashadhi Wari : टाळ मृदुंगाच्या गजरात संपूर्ण देहूनगरी मग्न झाली आहे. देहूनगरीतून तुकोबांची वारी आज पुढल्या प्रवासाच्या दिशेने वाट वळवणार असून वारीचा पुढला मुक्काम हा इनामदार वाडा इथे असणार आहे. वारकरी आज हजारोंच्या संख्येने देहूमध्ये जमलेले आहेत.

पालखी सोहळा दरवर्षी मोठ्या उत्साहात पार पडतो. यंदा पालखी सोहळ्याचे हे ३३७ वे वर्ष आहे. यासाठी हजारोंच्या संख्येने आज वारकरी देहूला पोहोचले आहेत. सोहळ्यासाठी टाळ आणि मृदुंगाच्या गजरात संपूर्ण देहूनगरी दुमदुमली आहे.

Ashadhi Wari
Ashadh Month : जूनमध्ये या दिवशी सुरु होईल आषाढ महिना, विष्णू देवाला प्रसन्न करण्याची खास संधी

दरवर्षी राज्यातल्या वेगवेगळ्या भागातील लोक या सोहळ्यासाठी एकत्र जमतात. या पार्श्वभूमीवर देहूत चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय. आज सकाळी पहाटे ५ वाजता श्री’ची संत तुकाराम शिळा मंदीर, श्री विठ्ठल-रखुमाई महापूजा करण्यात आली. त्यानंतर पहाटे ५.३० वाजता तपोनिधी नारायण महाराज समाधी महापूजा करण्यात आली.

यानंतर ९-११ दरम्यान इनामदार वाडा येथे श्री संत तुकाराम महाराज पादुका पूजन केले जाणार आहे. यानंतर १०-१२ च्या दरम्यान पालखी प्रस्थान सोहळ्याला आणि काला कीर्तनाला सुरुवात होणार आहे. (Ashadhi wari)

Ashadhi Wari
Pandharpur Ashadhi Wari: राज्य सरकारचा मोठा निर्णय! निर्मल वारीसाठी ग्रामपंचायतींना मिळणार 4 कोटी 21 लाख रुपये

याशिवाय येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. सायंकाळी ५ वाजता पालखी प्रदक्षिणा होऊन सायंकाळी ६.३० वाजता पालखी सोहळा मुक्काम हा इनामदार वाडा येथे होणार आहे. यानंतर मुख्य आरती होणार असून रात्री ९ वाजता कीर्तन, जागर असे कार्यक्रम होणार आहे. सोमवारी या पालखीचे पुण्यात आगमन होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.