Gajanan Maharaj Palkhi: श्री गजानन महाराज पालखीची ‘आनंदवारी’: महिलांच्या हाती संपूर्ण नियोजनाची सूत्रे

Gajanan Maharaj Palkhi: सांगलीतील सहयोगनगर येथील श्री गजानन महाराज मंदिरातील श्री गजानन महाराज पालखीची वारी मात्र स्वतंत्र मार्गाने सांगली ते पंढरपूर रवाना होते.
Gajanan Maharaj Palkhi
Gajanan Maharaj PalkhiSakal
Updated on

Gajanan Maharaj Palkhi: आषाढी वारीत वारकरी देहूतून सहभागी होतात. सांगलीतील सहयोगनगर येथील श्री गजानन महाराज मंदिरातील श्री गजानन महाराज पालखीची वारी मात्र स्वतंत्र मार्गाने सांगली ते पंढरपूर रवाना होते. गेली २२ वर्षे हा सोहळा सुरू आहे. त्याची सूत्रे महिलांच्या हाती आहेत, हे विशेष. मंजिरी करमरकर ऊर्फ गजानन दीदी या दिंडीचे नेतृत्व करत आल्या आहेत. यावर्षी ९ जुलै रोजी दिंडी निघणार आहे.

विश्रामबाग येथील सहयोगनगरमध्ये श्री गजानन महाराज सेवा संस्थानचे मंदिर आहे. २२ वर्षांपूर्वी मंजिरी करमरकर यांनी ठरवले, संस्थानची आषाढी वारी सुरू करायची. ही वारी म्हणजे पालखी सोहळा असेल, असा त्यांचा निश्‍चय होता. सोहळ्यात १५ महिला सहभागी झाल्या. महिलांनीच खांद्यावर पालखी घेतली. चार-चारचे गट केले आणि सांगली ते पंढरी अत्यंत भक्‍तिभावाने ती पालखी वाहिली. आज या ‘आनंदवारी’त ४० वारकरी सहभागी असतात. त्यात तरुण, तरुणी, ज्येष्ठांचाही सहभाग असतो.

हा पालखी सोहळा सहयोगनगरमधून सुरू होतो. भोसे, कुची, घोरपडी, नागज आदी एकूण आठ मुक्काम होतात. काही वर्षांपूर्वी पालखीसाठी ढकलगाडी करून घेण्यात आली. या पालखीत श्री गजानन महाराजांचा मुखवटा, ज्ञानेश्‍वरी, श्री गजानन विजय ग्रंथ आणि तुकाराम गाथा यांचा समावेश असतो. वारीसोबत तीन वाहने असतात. एका वाहनात शिधा आणि आठ-दहा आचारी महिला सहभागी होतात. मुक्कामाच्या ठिकाणी आधी पोहोचून त्या सगळी तयारी करतात. वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांकडून आम्ही एकही रुपया घेत नाही. सगळा खर्च संस्थानकडून आम्ही करतो, असे करमरकर सांगतात. कधी अडचण आली तर मी भीक मागेन; मात्र वारीसाठी वारकऱ्यांकडून वर्गणी घेणार नाही, असा निर्धार त्यांनी केला आणि तो आजअखेर नेटाने पाळलेला आहे.

Gajanan Maharaj Palkhi
National Doctor's Day 2024: छत्रपती संभाजीनगरमध्ये वाढतेय मेडिकल टुरिझम, तज्ज्ञ डॉक्टर, अत्याधुनिक सुविधा, स्वस्त उपचारामुळे प्राधान्य

अनिल दीक्षित, गणेश जाधव, रवींद्र साखळकर, अनिल चव्हाण, द्राक्षायणी राजपूत अशी टीम मंजिरीताईंच्या मदतीला उभी असते. कोणी आजारी पडले, पाय दुखले तर त्यांना औषधोपचार तातडीने दिला जातो. एखाद्याला चालणे शक्य नसेल तर त्याच्यासाठी सोबत वाहन असतेच. या सगळ्या नियोजनावर चर्चा करण्यासाठी, सूचना देण्यासाठी वारीपूर्वी एक बैठक होत असते. यावर्षी ती रविवारी (ता. ७ जुलै) दुपारी ३ वाजता निघणार आहे. ज्यांनी नाव नोंदणी केली, त्यांनाच वारीत सहभागी करून घ्यावे, असा इथला दंडक आहे. यंदा ९ जुलैला वारी निघेल, १८ जुलैला दहीहंडीचा कार्यक्रम उरकल्यानंतर वारीचा सांगता होईल. वारकऱ्यांनी तेथून आपापल्या सोयीने परत यावे, असे नियोजन असते, असे करमकर सांगतात.

कदीर काझी चालक

वारीत जात-धर्म-पंथ सगळे गळून पडतात; उरतो फक्त अखंड हरिनामाचा गजर. सगळे एक होतात. सांगलीच्या आनंदवारीचेही असेच एक वैशिष्ट्य आहे. गेली २२ वर्षे या वारीत सहभागी होणाऱ्या वाहनाचे सारथ्य कदीर काझी नावाचे मुस्लिम चालक करत आहेत. वारीच्या आनंदात तेही न्हाहून निघत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.