Ashadi Wari 2023 : स्वच्छतेचे दूत करी पालखी मार्गाची सेवा

विद्यार्थ्याची ‘निर्मलवारी’; वारकऱ्यांसाठी शौचालयाची सुविधा
ashadi wari 2023 culture pandharpur special facilities to warkari
ashadi wari 2023 culture pandharpur special facilities to warkari sakal
Updated on

वाल्हे : आपल्या परिसरात दीड-दोनशे लोकांचा काही कार्यक्रम झाला तर तिथे स्वच्छता करण्याची चिंता वाटते. पंढरीच्या वाटेने लाखो भाविक एकत्र राहतात, तेव्हा स्वच्छता नेमकी कशी केली जाते? लाखो भाविकांना शौचालयाची व्यवस्था कशी होत असेल? असे अनेक प्रश्न पडतात.

पण पंढरीच्या वाटेने निघालेला वारकरी स्वयंशिस्तीने उपलब्ध असलेल्या सुविधांचा वापर करतो. मात्र, जे तत्कालीन परिस्थिती अशक्य असलेल्या स्वच्छतेच्या बाबी करण्यासाठी प्रशासनासह हजारो हात पुढे सरसावतात.

सध्या पंढरीच्या वारीत लाखो भाविक चालत आहेत. त्यामुळे स्वाभाविकच स्वच्छतेचा प्रश्न येतो. मार्गावरील मोठ्या शहरांमध्ये प्रशासनाची अपेक्षित यंत्रणा काम करत असते. वारीच्या काळात हा प्रश्न अपेक्षित धरुन प्रशासनाच्या वतीने स्वच्छतेची स्वतंत्र यंत्रणा राबत असते.

ashadi wari 2023 culture pandharpur special facilities to warkari
Ashadi Wari 2023 : वाऱ्याची झुळूक घेत मोठा टप्पा ओलांडला; पालखी यवतला विसावली; दर्शनासाठी गर्दी

त्यात स्थानिक तसेच अनेक स्वयंसेवी संस्था वारीच्या वाटेने स्वच्छता करण्यासाठी पुढे सरसावतात. त्यांचा भाव एकच असतो, आपल्याला पंढरीला जाता येत नाही, तर या माध्यमातून वारकऱ्यांची सेवा करता यावी, तसेच वारी पुढे निघून गेल्यावर संबंधित गावांवर ताण येऊ नये, हा त्यामागील सकारात्मक भाव असतो.

‘निर्मलवारी’ करणारे वारकरी

वारीत लाखोंच्या संख्येने वारकरी सहभागी होतात. मात्र, त्यांना शौचाला जायचा मोठा प्रश्न निर्माण होतो. याच पार्श्वभूमीवर २०१५ मध्ये सेवा ‘सहयोग’च्या माध्यमातून सुरू झालेली स्वच्छतेची चळवळ सुरू झाल. दोन गावांमध्ये हा उपक्रम यशस्वी झाल्यानंतर तो ‘निर्मलवारी’च्या या नावाने सुरू झाला.

ashadi wari 2023 culture pandharpur special facilities to warkari
Ashadi Wari 2023 : सोपानकाकांच्या नगरीत वैष्णवांची मांदियाळी; ज्ञानेश्‍वर माऊलींच्या दर्शनासाठी मोठी गर्दी

यंदा संत तुकाराम महाराज सोहळ्यासमवेत एक हजार शौचालये आहेत. त्यासाठी सुमारे चौदा-पंधरा हजार कर्मचारी कार्यरत आहेत. सरकारच्या वतीने शेकडो वारीत मुक्कामाच्या गावाच्या ठिकाणी लावली जातात. त्या माध्यमातून वारकऱ्यांना सुविधा उपलब्ध झाली. त्यामुळे तो उघड्यावर शौचाला जात नाही. त्यासाठी अठरा दिवस ‘निर्मलवारी’तील वारकरी वारीच्या वाटेने स्वच्छतेचा वसा घेऊन शौचालयाची सुविधा वारकऱ्यांसाठी उपलब्ध करून देतात.

स्थानिक प्रशासनाला हातभार

वारीमार्गावर काही गावे छोटी आहेत. तेथे यंत्रणा अशा वेळी अपुरी पडते. तेथे प्रशासनाच्या वतीने अतिरिक्त यंत्रणा उपलब्ध करून दिली जाते. वारकरी आपल्या दिंडीच्या परिसरात कचरा एकत्र करून त्याची संबंधित घनकचरा व्यवस्थापनाच्या माध्यमातून विल्हेवाट लावली जाते. वारीसाठी गावांच्या स्वच्छतेसाठी स्वतंत्र निधी संबंधित प्रशासनाला दिला जातो.

ashadi wari 2023 culture pandharpur special facilities to warkari
Ashadi Wari 2023 : सासवडमधून संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा निघताना भंडाऱ्याची उधळण व पावसाची हजेरी

विद्यार्थी वारकरी स्वच्छतेचे पुजारी

पुणे विद्यापीठाचे सुमारे दोनशे विद्यार्थी पालखी मार्गावर प्रत्येक गावांमधील तळ स्वच्छ करतात. अनेक वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे. मुक्काम उरकून जेव्हा पालखी दुसऱ्या गावात मार्गावर जातो. तेव्हा तळ विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे दोनशे विद्यार्थी स्वच्छ करतात.

पोटासाठी करतात स्वच्छता

पालखी मार्गावर पाण्याच्या बाटल्यांचा वापर होतो. मोकळी बाटल्या रस्त्याने टाकलेल्या असतात. पालखी पुढे गेल्यानंतर त्यांच्या मागे फलटण भागातील काही जण या बाटल्या गोळा करतात. त्या एकत्र टेंपोत टाकून ते विकतात. हे काम उदरनिर्वाहासाठी केले जात असले तरी वारीच्या मार्गावर एकप्रकारे स्वच्छता होते आणि त्यांना काही पैसेही मिळतात.

ashadi wari 2023 culture pandharpur special facilities to warkari
Ashadi Wari 2023 : ‘खाकी’तील सेवेकरी; माउलींचे वारकरी

वारीतील बोध

  • प्रत्येकाने स्वयंशिस्तीने स्वच्छता करावी

  • परिसर स्वच्छतेसाठी पुढाकार घ्यावा

  • सामुदायिक स्वच्छता अभियानात सहभाग घ्यावा

  • उपलब्ध शौचालयांचा वापर करा

  • प्लॅस्टिक कचरा बाजूला करावा

  • आपले घर, परिसर, गाव स्वच्छ करावा.

वारीतील वारकऱ्यांना प्रशासन मुलभूत सुविधा पुरवितात. वाटेने भाविक नाश्‍ता, जेवण, पाणी, चहा यांची व्यवस्था करतात. मात्र, शौचालयाची व्यवस्था होत नाही. वारकऱ्यांची ही गैरसोय लक्षात घेऊन २०१५ मध्ये सेवा सहयोग नावाने स्वच्छतेची चळवळ सुरू केली. त्याचा चांगला परिणाम होताना दिसत आहे. मात्र, वारकऱ्यांनी त्याचा वापर करणे गरजेचे आहे. त्याबाबतही आम्ही त्यांचे प्रबोधन करीत आहेत.

- संतोष दाभाडे, समन्वयक, निर्मलवारी

ashadi wari 2023 culture pandharpur special facilities to warkari
Ashadi Wari 2023 : ‘खाकी’तील सेवेकरी; माउलींचे वारकरी

सासवड ते जेजुरी दरम्यान आम्ही ४० विद्यार्थी स्वच्छतेसाठी आलो. यावेळी १६० बॅग कचरा संकलित केला. स्वच्छतेसाठी वारकरी स्वतः मदत करतात. वारकऱ्यांमध्ये स्वयंशिस्त असते. आम्हालाही त्यांच्या सेवेची विठ्ठलाची सेवा करण्याचा आनंद मिळाला.

- अथर्व कोळपे, विद्यार्थी, इंडसर्च इन्स्ट्यिट्यूट ऑफ रिसर्च अॅन्ड मॅनेजमेंट, बावधन

आम्ही फलटणमधील जवळपास शंभर जण आहोत. सासवड ते नातेपुते या वारीच्या वाटेवर आम्ही वारी पुढे गेली की मागून रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या बाटल्या उचलतो. त्यातून दररोज सातशे ते आठशे रुपये मिळतात. वारीच्या वाटेने जाणाऱ्या वारकऱ्यांची सेवा होते. तसेच चार पैसेही मिळतात. तसेच आपल्या स्वतःची वारीही घडते

- मंगल शेळके, फलटण

स्वच्छवारी, निर्मल वारी करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत.आपण जीवनात हक्काच्या गोष्ट्री मागत असतो. मात्र, त्याचवेळी कर्तव्याकडे कानाडोळा करतो. वारीच्या वाटेने जाताना स्वच्छतेचा प्रश्न आहे तर तो कोणाला ना कोणाला सोडवायलाच लागेल. ते काम आपणच का करू नये, या भावनेने या उपक्रमात सहभागी झालो आहोत.

- नम्रता इंगळे, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.