Astro Tips For Tulsi Mala : तुळशीची माळ घालण्याचे हे फायदे माहिती आहे का?

तुळशीचे रोप आणि तुळशीची माळ या दोन्हींना हिंदू धर्मात विशेष धार्मिक महत्त्व
Astro Tips For Tulsi Mala
Astro Tips For Tulsi Malaesakal
Updated on

Astro Tips For Tulsi Mala : तुळशीचे रोप आणि तुळशीची माळ या दोन्हींना हिंदू धर्मात विशेष धार्मिक महत्त्व आहे. प्रत्येका हिंदू माणसाच्या घरात तुळशीच रोप असतच आणि तुळशीच्या रोपाची नियमित पूजा केली जाते. शास्त्रामध्ये तुळशीला अत्यंत पवित्र आणि सकारात्मक वनस्पती मानली जात. हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाच्या पूजेला जेवढ महत्त्व आहे, तेवढेच महत्त्व तुळशीची माळ घालण्यालाही आहे.

Astro Tips For Tulsi Mala
Heart Care : फिटनेस प्रेमींनो सावधान! प्री वर्कआऊट सप्लीमेंट ठरू शकतात हार्ट अ‍ॅटॅकच कारणं

यासोबतच त्या माळेने जप केल्यास ते खूप फलदायी ठरते. जे लोक भगवान श्रीकृष्ण आणि भगवान विष्णूचे उपासक आहेत ते त्यांच्या गळ्यात तुळशीची माळ नक्कीच घालतात. गळ्यात तुळशीची माळ घातल्याने मनाची शांती आणि आध्यात्मिक शुद्धता राहते, अशी श्रद्धा आहे.याशिवाय ज्योतिष शास्त्रातही तुळशीच्या माळाचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. तुळशीची माळ धारण केल्याने व्यक्तीच्या कुंडलीत असलेले बुध आणि गुरु हे दोन्ही ग्रह बलवान होतात.

Astro Tips For Tulsi Mala
Bajri Halawa Recipe : बाजरीची भाकरीच नाही तर हलवाही आहे स्वादिष्ट अन् पौष्टिक!

तुळशीची माळ गळ्यात घालण्याचे नियम

- जरी तुळशी नेहमीच शुद्ध आणि सकारात्मक उर्जेने परिपूर्ण असते, तरी ती घालण्याआधी ती गंगाजलाने शुद्ध करून आपल्या गळ्यात घालावी.

- तुळशीची माळ गळ्यात घातल्याने कुंडलीत बुध आणि गुरु हे दोन्ही ग्रह बलवान होतात.

- तुळशीच्या माळेमुळे भगवान विष्णू, लक्ष्मी देवी आणि कृष्णाचा सतत आशीर्वाद मिळतो.

- जे तुळशीची माळ घालतात त्यांनी नेहमी सात्विक भोजन करावे.

-ं गळ्यात तुळशीची माळ घालणाऱ्यांनी ती कधीही काढू नये.

Astro Tips For Tulsi Mala
Heart Health : निरोगी हृदयासाठी कसा असावा आहार ?

तुळशीच्या माळेवर जप करण्याचे नियम

- गळ्यात घालणारी आणि जपाची दोन्ही माळा वेगळ्या ठेवाव्या.

- जप केल्यानंतर तुळशीची माळ कापडात गुंडाळून ठेवावी.

- एकाच माळेने जप करावा, आणि त्या माळेने दुसऱ्या कोणी जप करू नये.

- तुळशीच्या माळेत कमीत कमी 27 आणि जास्तीत जास्त 108 मणी असावेत.

Astro Tips For Tulsi Mala
Heart Health : निरोगी हृदयासाठी कसा असावा आहार ?

तुळशी माळाचे प्रकार

तुळशीच्या माळांचे दोन प्रकार आहेत. एक श्यामा आणि दुसरी रामा तुळशी. या दोघांपासून तुळशीची माळ तयार केली जाते. श्यामा तुळशीची माळ धारण केल्याने माणसाला मानसिक शांती आणि मनात सकारात्मक उर्जेची भावना येते. श्मामा तुळशीच्या माळामुळे आर्थिक लाभासोबतच देवाची कृपा प्राप्त होते. त्याच वेळी, राम तुळशीची जपमाळ देखील व्यक्तीच्या जीवनात सकारात्मकता आणि आत्मविश्वास वाढवते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.