Astro Tips : राम भक्त हनुमानाच्या या ८ सिद्धींनी तुम्ही करू शकतात जगावर राज्य, जाणून घ्या

Hanuman Siddhi Mantra: राम भक्त हनुमानाला सिता मातेने दिले होते हे वरदान.
Astro Tips in Marathi
Astro Tips in Marathiesakal
Updated on

Hanumanji Siddhi For Great Success Ramnavami 2023 : श्रीरामांचे भक्त हनुमान यांना अष्टसिद्धींचा दाता म्हटला जातो. भक्ती, बुद्धी, श्रद्धा आणि या सगळ्याच्या वर अपार बल असलेले असे हनुमानजी म्हणून आपण त्यांना ओळखतो.

हनुमान चालीसामध्ये याचा उल्लेख आहे की, सिता मातेने या अष्टसिद्धींच वरदान बजरंगबलीला दिलं होतं. या आठ सिद्धी जर तुम्हाला मिळवता आल्या तर आपण जगावर राज्य करू शकतात. या आठ सिद्धी कोणत्या जाणून घेऊया.

अणिमा सिद्धी

अणिमाचा अर्थ अणुपेक्षादी सूक्ष्म होणे. पुराण असं सांगतं की, हनुमानजू स्वतः सूक्ष्म होऊ शकत होते. पण आजच्या काळात आपण शरीराने नाही तर मनाने आणि विचारांनी सूक्ष्म होणे गरजेचे आहे.

जर कोणत्याही गोष्टीतले बारकावे सूक्ष्मतम गोष्टी आपल्याला जाणून घेता आल्या तर ती गोष्ट आपलीच झाली म्हणून समजा.

महिमा सिद्धी

या सिद्धीचा अर्थ असा की, शरीर खूप मोठे, भव्य दिव्य करणे. आजच्या काळात बघायचे म्हटले तर आपले स्वप्न, दृष्टीकोन आणि मन असे भव्यदिव्य करावे. दूरदृष्टी ठेवावी.

Astro Tips in Marathi
Astro Tips : तुमच्या हातावरच्या 'या' खुणा देता तुम्हाल ऐश्वर्य, लाभेल अंबानी, अदानीसारखं भाग्य

गरिमा सिद्धी

गरिमा सिद्धीत असे म्हणतात की, बजरंग बली आपले शरीर एवढे जड करत की, कोणीही त्याला हलवू शकत नाही. भीम आणि हनुमानाची शेपटी ही गोष्ट तुम्ही लहानपणी ऐकली असेलच. तसं आपलं मन पक्क करा. काहीही झालं तरी हे हलल नाही पाहिजे. संकट काळात डगमगू नये आणि आनंदात हुरळून जाऊ नये.

लघिमा सिद्धी

लघिमा सिद्धीचा अर्थ असा की, शरीराला आवढं हलक करावं की हवेत उडता येईल. हे आपल्यासाठी मनाच्या सूक्ष्मतेशी जोडावं. उगाच विचारांचं, नकारात्मकतेचं, चिंतांच ओझ बाळगत जडत्व आणण्यापेक्षा हे सार झटकून हलकं व्हावं. विश्वातली सकारात्मकतेचा स्वीकार करावा.

Astro Tips in Marathi
Holi Astro Tips : ...म्हणून खेळतात धुळवड, होळीच्या राखेचे ७ फायदे

प्राप्ती सिद्धी

एखाद्या वस्तूला लगेच प्राप्त करणे अशी ही सिद्धी आहे. याला आजच्या भाषेत आपण जिद्द म्हणू शकतो. ध्येयाला घट्ट धरून राहीलो तर आपल्याला हवं ते साध्य करण्याची जिद्द बाळगणे आवश्यक आहे.

प्राकाम्य सिद्धी

प्राकाम्य सिद्धी म्हणजे कोणत्याही परिस्थितीत टिकून राहण्याची, जगण्याची शक्ती. ही गोष्ट तर आजच्या काळात फारच उपयुक्त आहे. अपयशाने खचून जाणं आणि यशाने हुरळून जाणं या दोन्हीही गोष्टी घातक आहेत. त्यामुळे यश, अपयश, आनंद, दुःख सगळे पचवून जीवन जगता येणं खूप आवश्यक असतं.

ईशीत्व सिद्धी

ईश्वरीय शक्ती प्राप्त होणे. आपल्या प्रत्येकात असणारी वैश्विक शक्ती ओळखणे गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हाला नवी उर्जा मिळते, कार्यक्षमता वाढते. याच आंतरीक प्रेरणेला ईश्वरी शक्ती म्हणतात.

वशीत्व सिद्धी

दुसऱ्यांना आपल्या नियंत्रणात आणणे, वश करणे. या गोष्टीकडे आपण सकारात्मकतेने बघायला हवे. तसे बघितल्यास जाणवेल की, जर आपल्या सकारात्मकता वाढली तर आपोआप अनेक लोक आपल्याकडे आकर्षित होतात आणि नियंत्रणातही येतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.