ज्योतिषशास्त्रात श्रीमंत होण्यासाठी,प्रगती होण्यासाठी अनेक उपाय सांगितलेले आहेत. त्यातलाच एक म्हणजे पिठाचा दिवा. जशी आपण पणती, समई, निरंजन लावतो तसाच पिठाचाही दिवा लावला पाहिजे.
सनातन धर्मात दिवा लावल्याशिवाय पूजा-आरती अपूर्ण असते. अगदी रोजची पूजा सुद्धा दिवा लावल्याशिवाय सुरू करत नाही. आपण दिवा लावून अग्नी देवाचा मान राखतो आहोत असं आपल्या वडीलधाऱ्या लोकांनी सांगितल्याच आठवत असेलच. काही विशेष दिवस असेल सण असेल तर तेव्हा पंचारती सुद्धा घडवली जाते. पूजेसाठी दिव्यामध्ये मोहरीच तेल वापरलं जात. हे दिवे मातीचे, पितळीचे, चांदीचे असतातच पण यात पिठाचाही दिवा वापरला जातो.
ज्योतिष शास्त्रामध्ये पिठाचा दिवा खूप शक्तिशाली असल्याचे वर्णन केले आहे, जो आयुष्यातल्या मोठ मोठ्या समस्यांवर मात करू शकतो. पिठाचा दिवा लावणे हा देखील श्रीमंत होण्याचा एक प्रभावी मार्ग आहे.
पिठाचा दिवा लावण्याची योग्य पद्धत
इच्छापूर्तीसाठी सहसा पिठाचे दिवे लावले जातात. यासाठी पिठाच्या दिव्यांची संख्या नेहमी चढत्या ते उतरत्या किंवा उतरत्या ते चढत्या क्रमाने अशी ठेवावी.
उदाहरणार्थ, 11 दिवस दिवे लावणार असला तर पहिल्या दिवशी 11 दिवे, दुसऱ्या दिवशी 10 दिवे आणि शेवटच्या दिवशी फक्त 1 दिवा. किंवा जर तुम्ही 1 दिवा लावत असाल तर शेवटच्या दिवशी 11 दिवे लावावे.
इच्छेनुसार आवडत्या देवासमोर दिवा
- ज्यांना आर्थिक संकटातून सुटका हवी आहे त्यांनी लक्ष्मी देवीसमोर संकल्प घेऊन 11 दिवस वाढत्या किंवा उतरत्या क्रमाने पिठाचे दिवे लावावेत. यामुळे काही दिवसांत तुमच्या आर्थिक स्थितीत कमालीची सुधारणा होईल.
- जर तुमच्या डोक्यावर खूप कर्ज असेल तर बजरंग बली हनुमानासमोर पिठाचा दिवा लावावा.
- अन्नपूर्णा देवी समोर पिठाचे दिवे लावल्याने घर धनधान्याने भरलेले राहते.
- पुन्हा-पुन्हा आर्थिक नुकसान होत असेल तर शनिदेवांसमोर पिठाचा दिवा लावावा. सर्व अडथळे आणि आर्थिक अडचणी दूर होतील.
- भगवान विष्णूंसमोर दिवा लावल्यानेही दुर्दैव सौभाग्यामध्ये बदलते. माणसाच्या आयुष्यात अपार सुख आणि समृद्धी असते. यासोबतच प्रत्येक कामात यश मिळू लागते.
दिवा कसा तयार करावा
गव्हाच्या पिठात हळद मिक्स करून त्याची कणिक मळून त्यापासून दिवा बनवून गाईच्या तुपात किंवा मोहरीच्या तेलात दिवा लावावा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.