आपल्या काळ बदलणार असेल आयुष्यात काहीतरी बदल घडणार असतील तर देव काहीतरी संकेत देतो. धर्मग्रंथात याबाबत अनेक दंतकथा आहेत. पण अनेकदा हे संकेत आपल्याला कळताच अस नाही; उदाहरणार्थ अचानक तळ हात खाजवयाला लागला की पापणी लवली तर नक्की याचा अर्थ काय हे कळत नाही.
आपल्या आयुष्यात आनंद येणार आहे किंवा दुःख हे सांगणं अनेकदा कठीण होत, आणि आपण विनाकारण काळजी करत बसतो.
चांगला काळ सुरू होण्यापूर्वी देव काही संकेत देतो. या शुभ संकेतांबद्दल एक पौराणिक कथा देखील आहे.
शास्त्रानुसार एकदा नारदमुनी भगवान श्रीकृष्णाला भेटायला गेले. नारदजी म्हणाले, "हे भगवान! स्वतःच्या आयुष्यात चांगली वेळ येणार आहे हे माणसाला कसे कळणार?" तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात की "हे नारद ! जेव्हा एखाद्या व्यक्तीसाठी चांगली वेळ येते, तेव्हा मी काही शुभ चिन्हे त्याला देत असतो, जे काहींना समजतात आणि काहींना याची उपरती होत नाही"
ते संकेत कोणती आहेत, याची उत्सुकता तुम्हालाही असेल ना?
घराबाहेर पांढऱ्या किंवा तपकिरी रंगाची गाय आली तर ती खूप शुभ मानली जाते. आपण गाईला पोळी खायला दिली पाहिजे, त्याने आपल्याला पुण्य मिळते.
घरातून बाहेर पडताना हिरव्या भाज्या, हिरवे गवत दिसले की तुमचे रखडलेले काम पूर्ण होणार आहे, असे समजा.
बाहेर जातांना प्रेत दिसले तर तेही शुभ मानले जाते, जे काम करायला बाहेर पडला आहात ते काम नक्की यशस्वी होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.