Astrology Tips For Love Marriage : प्रेमी जोडप्यांना घरून सहज होकार मिळाला आणि लग्न (love Marriage) झालं असं फारच कमी वेळा बघायला मिळतं. पण बहुतेक वेळा घरच्यांचा विरोध असल्यामुळे हिरमोड झालेले, ब्रेक अप झालेल्या प्रेमींची संख्या अधिक दिसते. यावर उपाय म्हणजे एकतर पळून जाऊन लग्न करा नाहीतर घरच्यांना समजवून, मनवून करा.
पण या दोन्ही पण प्रकारात रिस्क आणि कष्ट खूप लागतात. शिवाय पळून जायचे म्हणजे सर्वांची मन दुखवायची. आणि घरच्यांना पटवायचे तर ते जमत नाही असा संभ्रम असतो. पण यावर आम्ही एक प्रभावी उपाय सांगत आहोत. या उपायाने तुम्ही घरच्यांची संमती मिळवू शकतात.
साहित्य
२१ विड्याची पानं
तूप
दूध
साखर
मध
दही
पाणी
कुंकू
कृती - एका भांड्यात दूध, दही, तूप, साखर, मध एकत्र करून त्याचं पंचामृत करावं. या पंचामृताचा शिवलिंगावर अभिषेक करावा. त्यानंतर पाण्याने ते स्वच्छ धुवावे. त्यानंतर २१ विड्याच्या पानांवर कुंकू ओलं करून त्यावर ज्यांनी लग्नासाठी परवानगी द्यायची आहे त्यांची नावं लिहावी.
त्यानंतर शिवलिंगा भोवती ही पानं तीन वेळा फिरवा. ती पानं पिंपळाच्या झाडाखाली पुरा. पानं पुरल्यानंतर २१ वेळा ॐ नमः शिवाय चा जप करावा. आणि त्यानंतर तुमच्या जोडीदाराचं नाव तीन वेळा म्हणा आणि परत या.
हा उपाय तीन सोमवार करावा. लक्षात ठेवा तुम्ही शिवलिंगाची पुजा करून आल्यानंतर ५ तासाच्या आत ती पानं पिंपळाच्या झाडाखाली पुरली जाणं आवश्यक आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.