Ganga Dussehra 2022: गंगा दसर्‍याला बनलेत 4 शुभ संयोग; 'हे' काम केल्याने बदलेल आयुष्य!

गंगा दसर्‍याच्या दिवशी गंगा नदीत स्नान केल्याने सर्व पाप धुऊन जातात, असे लोकांची श्रद्धा आहे.
Ganga Dussehra 2022
Ganga Dussehra 2022Sakal
Updated on

Ganga Dussehra 2022: पंचांगानुसार, ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील दहावा दिवस गंगा दसरा म्हणून साजरा केला जातो. या दिवशी माता गंगा अवतरली होती, अशी धार्मिक श्रद्धा आहे. यावेळी 09 जून म्हणजेच आज गंगा दसरा साजरा केला जात आहे. या दिवशी गंगा नदीत स्नान केल्याने सर्व पाप धुऊन जातात, असे सांगितले जाते. हे माँ गंगेच्या पवित्रतेमुळे होते, अशी पौराणिक मान्यता आहे. यावेळी गंगा दसर्‍याच्या दिवशी 4 विशेष योगायोग होत आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थितीमुळे हे शुभ संयोग तयार होत आहेत. चला जाणून घेऊया गंगा दसर्‍याला कोणते शुभ संयोग घडणार आहेत आणि या दिवशी कोणत्या गोष्टींचे दान करणे शुभ मानले जाते.

Ganga Dussehra 2022
आजचे पंचांग आणि दिनविशेष - 9 जून 2022

गंगा दसर्‍याला घडतील हे 4 शुभ संयोग | Ganga Dussehra 4 Auspicious Coincidences:

ज्योतिषांच्या मते यावेळी गंगा दसरा अनेक प्रकारे खास आहे. माता गंगा अवतरणाच्या दिवशी म्हणजेच गगा दसर्‍याच्या दिवशी ग्रह आणि नक्षत्रांची स्थिती अतिशय शुभ असणार आहे. या दिवशी 4 शुभ संयोग होत आहेत. वास्तविक, या दिवशी सूर्यदेव आणि बुध ग्रह वृषभ राशीमध्ये उपस्थित असतील. ज्यामुळे बुधादित्य योग तयार होईल. तसेच या दिवशी रवि योगाचा शुभ संयोग होईल. यासोबतच हस्त नक्षत्राचा शुभ संयोगही या दिवशी घडत आहे. याशिवाय व्यतिपात योगही तयार होत आहे. हस्त नक्षत्रात माता गंगा अवतरली होती. अशा स्थितीत गंगा दसर्‍याच्या दिवशी हा योग बनणे अत्यंत शुभ मानले जाते.

Ganga Dussehra 2022
पंचांग 9 जून: या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करावे

दसर्‍याला गंगास्नानाचा शुभ मुहूर्त | Ganga Dussehra Snan Shubh Muhurat:

गंगा दसऱ्याला दशमी तिथीचे विशेष महत्त्व आहे. दशमी तिथी 9 जून रोजी सकाळी 8.23 ​​ते 10 जून रोजी सकाळी 7.27 पर्यंत असेल. या काळात गंगेत स्नान करणे पुण्यकारक मानले जाते. गंगेत स्नान करणे शक्य नसेल तर आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळूनही स्नान करू शकता.

गंगा दसर्‍याला या वस्तू दान केल्या जातात | Ganga Dussehra Daan:

गंगा दसर्‍याच्या दिवशी नदीत स्नान करण्याबरोबरच दान करण्याचीही परंपरा आहे. या दिवशी दान न केल्याने केलेले पुण्य अपूर्ण राहते असे म्हणतात. अशा स्थितीत या दिवशी खरबूज, सत्तू, तीळ, दिवा, अन्न, वस्त्र, अंतर, पान, पंखा आणि जव इत्यादी दान करणे चांगले मानले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.