धर्मशास्त्रात केळीच्या झाडाला पूजनीय स्थान देण्यात आले आहे. असे मानले जाते की, यात भगवान विष्णूचा वास आहे. म्हणून या झाडाचे गुरूवारी विधीपूर्वक पूजन करण्यात आले. पण तुम्हाला माहित आहे का, की केळीच्या झाडाचे पूजन केल्याने तुम्ही आर्थिक संकटांना टाळू शकतात. वास्तूशास्त्रानुसार जर तुमच्या घरात केळीचे झाड असेल तर गरिबी येत नाही.
काळीच्या झाडाचे फायदे
असे मानले जाते की, गुरूवारी केळीच्या झाडाची पूजा केल्याने त्या कुटूंबाला कधी आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत नाही. यामुळे घरात सुख, समाधीन येते.
जर तुम्हाला घरात संपत्ती हवी असेल तर केळीच्या झाडाचे मूळ गुपचूप काढून स्वतः जवळ ठेवावे. नंतर हे मूळ गंगाजलाने स्वच्छ धुवून त्याला पिवळा धागा बांधून घरातल्या तिजोरीत किंवा जिथे पैसे ठेवतात तिथे ठेवावे. हे काम केवळ गुरवारीच करावे.
याशिवाय गुरूवारी आंघोळ करून पिवळ्या रंगाचे कपडे घालावे. जर पिवळे कपडे नसतील तर पिवळा रूमाल जवळ बाळगावा. जिथे केळीचे झाड दिसेल तिथे डोक्यावर किंवा खांद्यावर पिवळा रूमाल टाकून जावे. तिथे जाताना कोणी टेकणार नाही याची काळजी घ्यावी. जर कोणाच्या घरच्या केळीच्या झाडाचे दर्शन घेणार असाल तर त्यांना एक दिवस आधी सांगून ठेवा. त्या झाडाजवळ जाऊन नमस्कार करून इच्छापूर्तीची प्रार्थना करावी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.