लवकरच लग्नाचा सिझन सुरू होणार आहे. त्यामुळे घरात लग्नाची जोरदार तयारी सुरू झाली असेल. खरं तर लग्न हे दोन घरांमध्ये होतं. लग्नानंतर घरी येणाऱ्या नव्या नवरीसाठी सर्व काही बदलणार असतं. लग्न ठरल्यानंतर घरातील नवे जोडपे राहणार कुठे याची चर्चा होते. नवऱ्या मुलाची बेडरूम आता नव्या व्यक्तीसाठीही असणार आहे. त्यामुळे त्या बेडरूमची सजावट करण्याकडे लक्ष्य दिलं जातं.
वास्तूशास्त्रामध्ये घरातील प्रत्येक रूम आणि प्रत्येक वस्तूसाठी विशेष गोष्ट ठरवलेली असते. वास्तूशास्त्रात त्या गोष्टीला महत्त्वाचे स्थान आहे. घरातील बाथरूम, प्रवेशद्वाराची दिशा चुकली तर घराला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.