Black Thread In Leg : खरंच पायात काळा धागा घातल्याने राहु केतु शांत होतात का?

लहानपणी बाळाला नजर लागू नये म्हणून आजी किंवा जुन्या लोकांना तुम्ही काजळाचा काळा टीका लावून देताना बघितलं असेल. तसेच अनेक लोक पायात काळा धागासुद्धा बांधतात. खरंच पायात काळा धागा बांधल्याने राहु केतुंपासून मुक्ती मिळते का जाणून घेऊया.
Black Thread In Leg
Black Thread In Legesakal
Updated on

Leg Black Thread : लहानपणी बाळाला नजर लागू नये म्हणून आजी किंवा जुन्या लोकांना तुम्ही काजळाचा काळा टीका लावून देताना बघितलं असेल. तसेच अनेक लोक पायात काळा धागासुद्धा बांधतात. अनेकजण फॅशन म्हणून पायावर काळा दोरा बांधतात, तर अनेकजण नकारात्मक प्रभाव किंवा अलौकिक समस्या सोडवण्यासाठी हा उपाय करतात.

ज्योतिष शास्त्राबद्दल सांगायचे झाले तर असे म्हटले आहे की पायावर काळा धागा बांधल्याने कुंडलीत राहू-केतूची स्थिती मजबूत होऊ शकते. मात्र खरंच पायात काळा धागा बांधल्याने राहु केतुंपासून मुक्ती मिळते का जाणून घेऊया.

पायात काळा धागा बांधण्याचे फायदे

ज्योतिष शास्त्रानुसार ज्या लोकांच्या कुंडलीत राहु-केतुची स्थिती कमकुवत आहे, त्यांनी एका पायात काळा धागा बांधावा. असे मानले जाते की असे केल्याने राहु-केतु प्रसन्न होतात आणि जीवनातील अनेक समस्या आपोआप दूर होतात.

शनीचा प्रभाव कमी होतो

शनिदेव हा उग्र ग्रह मानला जातो. ज्यांचा राग तीव्र असतो, त्याच्या आयुष्यात शनीची ढैय्या आणि साडेसती सुरू व्हायला वेळ लागत नाही. असे मानले जाते की पायात काळा धागा बांधल्याने शनिदेव प्रसन्न राहतात, त्यामुळे घरगुती कलह आणि आर्थिक संकटापासून मुक्ती मिळते. (Astrology)

पुरुषांनी कोणत्या पायात काळा धागा घालायचा?

ज्योतिषांच्या मते, जर पुरुषांना पायात काळा धागा बांधायचा असेल तर त्यांनी मंगळवारी उजव्या पायात घालावा. असे केल्याने कुंडलीत शनि ग्रह बलवान राहतो. यासोबतच राहु-केतुही त्रास देत नाहीत.

Black Thread In Leg
Hasan Mushrif Astrology : हसन मुश्रीफांचं कुणी काहीही बिघडवू शकत नाही, ज्योतिषी म्हणतात...

महिला या पायात काळा धागा घालतात

स्त्रियांना पायात काळा धागा बांधायचा असेल तर डाव्या पायात घालणे योग्य आहे. मुलींनी शनिवारी हा धागा पायात घालावा. असे केल्याने मानसिक शांती मिळते आणि आरोग्य चांगले राहते.

डिस्क्लेमर - वरील लेख माहितीवर आधारलेला असून सकाळ समुह याची पुष्टी करत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.