Buddha Purnima : भारतातच नव्हे तर 'या' देशांमध्येही साजरी केली जाते बुद्ध पौर्णिमा

जगातील इतर कोणकोणत्या देशात बुद्ध पौर्णिमा सण साजरा केला जातो?
Buddha Purnima
Buddha Purnima sakal
Updated on

Buddha Purnima : बुद्ध जयंती किंवा बुद्ध पौर्णिमा हा बौद्ध धर्मियांचा सर्वात महत्त्वाचा सण, उत्सव आहे. आपल्यासारखाच जगातील इतर कोणकोणत्या देशात हा सण साजरा केला जातो, असा प्रश्न पडलाय ना तुम्हाला? चला तर मग, आपण एक सफरच करून येऊ. (Buddha Purnima celebrated including India all over the world )

जगभरातल्या बऱ्याचशा देशांतील बौद्ध लोक हा सण उत्साहाने साजरा करतात. बहुतेक देशांत बुद्ध जयंतीची सार्वजनिक सुटी असते. गौतम बुद्धांना बोधगया येथील बोधीवृक्षाखाली ज्ञानप्राप्‍ती झाली. ही घटना वैशाख पौर्णिमेची. तेव्हापासून हा दिवस बुद्ध पौर्णिमा म्हणून ओळखला जातो. श्रीलंका, थायलंड, बांगला देश या देशांमध्ये या सणाला ‘वेसाक’ म्हणतात बरं का. हा ‘वैशाख’ या शब्दाचा अपभ्रंश आहे.

थायलंडमध्ये लोक मंदिरांना भेट देतात, भिक्षूंना अन्न, मेणबत्त्या आणि फुलं अर्पण करतात. मंदिरांमध्ये भिक्षू प्रार्थना करतात आणि बुद्धाच्या शिकवणीवर प्रवचन देतात. “बुद्ध स्नान सोहळा” नावाचा एक विशेष सोहळादेखील या दिवशी होतो. थायलंडमध्ये ९५ टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्या ही बौद्ध आहे.

बौद्ध धर्म हा थायलंडचा मुख्य धर्म आहे. या दिवशी तिथे प्रथम भगवान बुद्धांना खीर अर्पण करतात आणि नंतर प्रसाद म्हणून वाटतात. तांदूळ, दूध, साखर आणि सुका मेवा वापरून ही खीर तयार केली जाते. श्रीलंकेमध्ये कागदी कंदील तसेच बांबूच्या कंदिलांनी घरे सजवतात. भक्तिगीते गायली जातात. ठिकठिकाणी बुद्धाच्या जीवनातील कथांचे चित्र-देखावे उभारले जातात.

Buddha Purnima
Margashirsha Purnima : मार्गशीर्ष पौर्णिमेला का आहे एवढं महत्व? जाणून घ्या दिनविशेष, मुहूर्त अन् लाभ...

बांगला देशात बौद्ध मंदिरांना रंगीबेरंगी सजावट आणि मेणबत्त्यांनी तेजाळलं जातं. मंदिरांच्या आसपास मोठी जत्रा भरते. बंगाली खाद्यपदार्थ (बहुतेक शाकाहारी), कपडे आणि खेळणी विकायला असतात. बुद्धाच्या जीवनातील कलाकृती सादर केल्या जातात. भूतानमध्ये या वेसाक महिन्यामध्ये कठोर शाकाहारी जेवणाचे पालन केले जाते.

कंबोडियामध्ये बुद्धाचा जन्मदिवस ‘विसाक बोचिया’ म्हणून साजरा केला जातो. देशभरातील भिक्षू कमळाची फुले, धूप आणि मेणबत्त्या घेऊन मंदिरात जातात, लोक भिक्षूंना दान देतात. चीन आणि हाँगकाँगमध्ये बुद्धाच्या ज्ञानाचे प्रतीक म्हणून मेणबत्त्या लावल्या जातात. बुद्धाच्या स्नानाची परंपरा चीनमध्ये सुरू झाली आणि फिलीपिन्स, जपानपर्यंत पोहोचली.

Buddha Purnima
Magh Purnima 2023:  माघ पौर्णिमेला हे उपाय केल्याने माता लक्ष्मी होईल प्रसन्न

जपानमध्ये हा दिवस ‘कानबुत्सु-ए’ म्हणून ओळखला जातो. इंडोनेशियामध्ये या दिवशी मोठी मिरवणूक काढली जाते. मलेशियामध्येही हा बुद्धाचा जन्मदिवस वेसाक दिवस म्हणून साजरा केला जातो. देशभरातील मंदिरे सजवली जातात. या दिवशी पिंजऱ्यात अडकलेल्या प्राण्यांना मुक्त केले जाते. देशभरात लोक प्रार्थना, जप आणि दान देण्यामध्ये गुंग असतात. मंगोलियामध्ये ‘वेसाक’ म्हणून हा सण साजरा केला जातो.

म्यानमारमध्ये, बुद्धाचा जन्मदिवस ‘कसून पौर्णिमा’ म्हणून साजरा केला जातो. बोधिवृक्षाला जल अर्पण करून आणि नामस्मरण करून हा उत्सव साजरा केला जातो. मोठ्या पॅगोडामध्ये, उत्सवाचा भाग म्हणून संगीत आणि नृत्यदेखील केले जाते. नेपाळमध्ये या दिवशी मांसाहार टाळला जातो. तांदळाची गोड खीर बनवली जाते.

Buddha Purnima
Buddha Purnima 2023 : तब्बल 130 वर्षांनंतर बुद्ध पौर्णिमेला दुर्मिळ योग, या राशीचे लोक होतील मालामाल

उत्तर कोरियामध्येही हा दिवस साजरा केला जातो. फिलीपिन्समध्ये हा दिवस ‘कारवान नी बुद्ध’ म्हणून ओळखला जातो. सिंगापूरमध्ये या दिवशी बौद्ध मंदिरे फुलांनी सजवली जातात. दक्षिण कोरियामध्ये हा दिवस कोरियन चांद्र दिनदर्शिकेनुसार साजरा केला जातो. या दिवसाला “सेओक्का तानशिन इल” म्हणतात.

या दिवशी मंदिरामध्ये मोफत जेवण असते. इथे एक मोठा कंदील उत्सव आयोजित केला जातो. तैवानमध्ये, व्हिएतनाममध्ये बुद्ध मूर्तींला सुगंधित पाण्याने स्नान घातले जाते. मेलबर्नमध्ये एप्रिल/मेच्या सुमारास बुद्ध दिवस आणि बहुसांस्कृतिक महोत्सव नावाचा शनिवार व रविवारचा उत्सव आयोजित केला जातो. ब्राझीलमध्ये या सणाला ‘हनामत्सुरी’ म्हणतात.

तिथे आता मोठ्या प्रमाणावर याची लोकप्रियता वाढली आहे. कॅलिफोर्नियामध्ये, न्यूयॉर्कमध्ये छान कार्यक्रम आयोजित करतात. अशी ही बुद्धपौर्णिमा... आपणही छान साजरी करतो नाही का?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.