Buddha Purnima 2024 : आपला देश विविधतेत एकता जपणारा देश आहे. आपल्या देशात अनेक धर्मांचे लोक एकत्र राहतात. प्रत्येक धर्माचे स्वतःचे सण असतात हिंदू ज्या प्रकारे दीपावली आणि होळी साजरी करतात, त्याचप्रमाणे बौद्ध धर्मीय लोक बुद्ध पौर्णिमा हा सण साजरा करतात. आज जगभरात मोठ्या उत्साहात बुद्ध पौर्णिमा साजरी केली जात आहे.
आजच्या दिवशी बौद्ध यांना ज्ञानप्राप्ती झाली. भगवान बुद्धांनी वयाच्या २९ व्या वर्षी संन्यासात प्रवेश केला. त्यांनी बोधगयामध्ये पिंपळाच्या झाडाखाली सहा वर्षे कठोर तपश्चर्या केली. (Buddha Purnima who is Gautam Buddha How did he get Buddha name )
बिहारच्या गया जिल्ह्यात अजूनही बोधीवृक्ष आहे. सारनाथमध्ये भगवान बुद्धांनी आपले प्रवचन दिले. त्यांनी बऱ्याच अशा घटना घडतानी बघितल्या की ज्यामुळे त्यांना दुःख का होते, त्यामागचे सत्य काय, त्या पासून कशी सुटका करावी व इतर बऱ्याच प्रश्नांच्या शोधात त्यांनी संसार त्यागून 29 व्या वर्षी घरदार सोडून जंगलात गेले आणि तपश्चर्येचा मार्ग स्वीकारला.
बुद्ध पौर्णिमा हा बौद्धांचा सर्वात पवित्र सण आहे. बुद्ध पौर्णिमा, ज्याला बुद्ध जयंती देखील म्हणतात. बुद्धांनी प्रण केला की जोवर मला ज्ञानप्राप्ती होत नाही तोवर मी काही तपस्येतून उठणार नाही आणि ते समाधीत बसले.
त्यानंतर त्यांना खरे ज्ञान प्राप्त झाले आणि त्या सिद्धार्थाचे गौतम बुद्ध झाले ( बुद्ध ) या शब्दाचा अर्थ ज्ञान प्राप्त होणे म्हणजे बोध असणे असा आहे. गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली आणि त्याच दिवशी त्यांचा मृत्यू झाला असे म्हटले जाते.
बुद्ध पौर्णिमेचे महत्त्व
वैशाख पौर्णिमेच्या दिवशी लुंबिनीमध्ये भगवान बुद्धांचा जन्म झाला होता आणि बुद्धत्व प्राप्त केल्यानंतर ते गौतम बुद्ध म्हणून ओळखले जाऊ लागले. वैशाख पौर्णिमेला गौतम बुद्धांचा जन्म झाल्यामुळे हा दिवस बुद्ध पौर्णिमा म्हणून ओळखला जातो. सत्याची जाणीव झाल्यावर भगवान बुद्धांनी लोकांना उपदेश दिला होता.
गौतम बुद्धांच्या जीवनाशी संबंधित सर्वात महत्त्वाचे तीर्थक्षेत्र बोधगया येथे आहे. बोधगया व्यतिरिक्त, तीन महत्त्वाची तीर्थक्षेत्रे आहेत. कुशीनगर, लुंबिनी आणि सारनाथ. बुद्धांनी बोधगया येथे ज्ञान प्राप्त केले आणि सारनाथमध्ये प्रथम धर्म शिकवण दिली.
बुद्ध पौर्णिमा साजरी करण्याची पद्धत
गौतम बुद्धांच्या जीवनाशी जोडलेले बौद्धांचे सर्वात महत्त्वाचे तीर्थस्थान म्हणजे बोधगया. बोधगया हे तीर्थक्षेत्र आहे, जिथे बुद्धांना ज्ञान प्राप्त झाले. बिहारच्या गया जिल्ह्यामध्ये बोधगया हे छोटे शहर आहे. भगवान बुद्धांचा सन्मान करण्यासाठी जगभरातील बौद्ध धर्माच्या लोकांची मोठी गर्दी जमते.
बौद्ध लोक त्यांची घरे दिवे आणि मेणबत्त्यांसह सजवतात. मंदिर व आसपासच्या प्रदेशाला चैतन्यशील बौद्ध ध्वजांनी सजवले जाते. सकाळच्या प्रार्थनेनंतर, भिक्षूंची उत्साही मिरवणूक निघते, त्यात मोठ्या प्रमाणात देणगी, मिठाई आणि फराळाचे वाटप केले जाते.
इतर ठिकाणी, मठ, धार्मिक इमारती आणि निवासस्थान येथे प्रार्थना, व प्रवचन करत असतात. बौद्ध लोक या दिवशी स्नान करून पूर्णपणे पांढरे कपडे घालतात. लोक भगवान बुद्धांच्या मूर्ती समोर फळे, फुले, मेणबत्त्या आणि धूपही ठेवतात.
पवित्र पिंपळाचे झाड, ज्याला कधीकधी महाबोधी वृक्ष किंवा “पिंपळ वृक्ष” असे म्हंटले जाते. ज्या झाडाखाली बुद्धाला ज्ञान प्राप्त झाले. बौद्ध स्वभावाने काटेकोर शाकाहारी आहेत. या दिवशी मांसाहार करणे टाळले जाते. आणि घरोघरी गोड खीरेचा पदार्थ बनवला जातो.
भगवान बुद्धांची महत्त्वाची शिकवण :
जे लोक तिरस्कार करतात, त्यापेक्षा दुप्पट लोकांची पूजा करतात. जो प्रेमात नाही तो प्रभावीत होत नाही.
चंद्र, सूर्य आणि सत्य या जगातल्या तीनच गोष्टी आहेत ज्या कधीही लपून राहू शकत नाहीत.
माणसाला राग येणे अयोग्य आहे. राग तुम्हाला शिक्षा देत नाही; उलट, राग तुम्हाला शिक्षा करतो.
मनुष्याने आपल्या ध्येयापर्यंत पोहोचणे हे गरजेचे आहे.
एक कपटी आणि दुष्ट मित्र वन्य प्राण्यापेक्षा जास्त धोकादायक असतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.