Chaitra Navratri 2023 : नवरात्रीत दुर्गा सप्तशती पठण केल्याने बदलणार तुमचं नशीब, जाणून घ्या नियम

ज्योतिषी म्हणतात की नवरात्री या दिवसांमध्ये दुर्गा सप्तशतीचं पठण केल्याने कल्याण होतं.
Chaitra Navratri 2023
Chaitra Navratri 2023sakal
Updated on

Chaitra Navratri 2023 : दुर्गा सप्तशती एक ऐसा स्त्रोत आहे ज्याच्या प्रत्येक अध्यायाचा एक विशेष आणि वेगळा उद्देश आहे. सप्तशतीचा पाठ एका कल्याणकारी कवच सारखा आहे. ज्योतिषी म्हणतात की नवरात्री या दिवसांमध्ये दुर्गा सप्तशतीचं पठण केल्याने कल्याण होतं.

दुर्गा सप्तशती एक असा ग्रंथ आहे ज्यामध्ये देवी दुर्गा महिषासुर नावाच्या राक्षसावर विजय मिळवते, याचं वर्णन करण्यात आलंय. चला तर जाणून घेऊया दुर्गा सप्तशतीचं महत्व. (Chaitra Navratri 2023 saptshati path change your luck)

काय आहे दुर्गा सप्तशती?
दुर्गा सप्तशती मध्ये देवीची आराधना करण्यासाठी मंत्र, स्तोत्र आणि साधनेची आवश्यकता असते. मात्र सर्वाधिक मान्यता प्राप्त स्तोत्र दुर्गा सप्तशती मानले जाते. मार्कंडेय ऋषिने या सप्तशती पठणचे निर्माण केले. याचा एक एक श्लोक महामंत्र आहे. असं म्हणतात की दुर्गा सप्तशती नियमांशिवाय पठण करू नये.

दुर्गा सप्तशतीचे 13 अध्याय आहे. यामध्ये एकूण 700 श्लोक आहे. या श्लोकमध्ये 700 श्लोक तीन भागात विभागले आहेत. प्रथम चरित्र , मध्यम चरित्र आणि उत्तम चरित्र. दुर्गा सप्तशती पठणच्या श्लोकांचा सरळ प्रभाव होतो. सप्तशतीमध्ये शक्ती प्राप्तीशी निगडीत अद्भुत विज्ञान आहे. असं म्हणतात की दुर्गा सप्तशतीचं पठण केल्याने सर्वप्रकारच्या सिद्धी प्राप्त होतात.

Chaitra Navratri 2023
Chaitra Navratri 2023 : नवरात्रीत लक्ष्मी मातेला प्रसन्न करायचंय?  मग देवीपुढे रांगोळीचे हेच डिझाईन्स काढा!

दुर्गा सप्तशती मंत्राचा जप करण्याचे नियम
आपल्या इच्छेनुसार मंत्र निवडावे. नवरात्रीमध्ये मंत्राचा जाप सुरवात करावी. कमीत कमी दररोज तीन माळांमध्ये मंत्राचा जाप करावा आणि नऊ दिवस या मंत्राचा जाप करावा. सप्तशतीच्या पठणच्या आधी उत्कीलन मंत्राचा जाप करा.

या उत्कीलन मंत्रानंतर कवच, अर्गला आणि कीलकचं पठण करावं. सप्तशतीचं पुर्ण लाभ घेण्यासाठी लाल वस्त्र धारण करुन याचे पठण करावे. या दरम्यान सात्विक राहावे. जर उपवास ठेवाल तर उत्तम आहे. मंत्राचा जाप लाल चन्दन किंवा रुद्राक्षच्या माळेने करावा.

Chaitra Navratri 2023
Chaitra Navratri 2023 : महाअष्टमीला करा हे खास उपाय, आर्थिक अडचणी होतील दूर

कसं करावं पठण?
सप्तशतीचं पठण कोणत्याही वेळी करावं. नवरात्रीमध्ये याचं पठण करणे, सर्वोत्तम असतं. देवीच्या समोर तुपाचा दिपक लावा. लाल फुले अर्पित करा. यानंतर नियमपूर्वक सप्तशतीचं पठण करावं. तुम्ही जितके दिवस सप्तशतीचं पठण कराल, तितके दिवस सात्विकता पाळा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.