Chaitra Navratri Fasting Rules : नवरात्रीत मीठ खाल्ल्याने उपवास मोडतो का? वाचा नियम

नवरात्रीत मिठाच्या सेवनाशी संबंधित अशाच एका नियमाविषयी माहिती देणार आहोत
Chaitra Navratri Fasting Rules
Chaitra Navratri Fasting Rulesesakal
Updated on

Chaitra Navratri Fasting Rules : चैत्र नवरात्रीचा उत्सव सुरू आहे. हिंदू धर्मात वर्षातून दोनदा येणारा हा सण अत्यंत शुभ मानला जातो. यादरम्यान 9 दिवस माता दुर्गेच्या विविध रूपांची पूजा केली जाते. या काळात जे व्रत करतात त्यांना विशेष पुण्य प्राप्त होते. प्रत्येकजण प्रयत्न करतो की या काळात अशी कोणतीही चूक होऊ नये, ज्यामुळे त्यांचे व्रत अयशस्वी होईल. आज आम्ही तुम्हाला नवरात्रीत मिठाच्या सेवनाशी संबंधित अशाच एका नियमाविषयी माहिती देणार आहोत.

Chaitra Navratri Fasting Rules
Chaitra Navratri 2023 : चैत्र नवरात्री सुरू होण्याआधीच उरकून घ्या ही कामं, नाहीतर...

नवरात्रीत मीठ खाल्ल्याने उपवास मोडतो का?

ज्योतिषशास्त्रानुसार, हिंदू धर्मातील कोणत्याही व्रतामध्ये पांढरे मीठ सेवन करण्यास मनाई आहे. पण नवरात्रीच्या उपवासाच्या नियमांमध्ये तुम्ही रॉक सॉल्ट (काळे मीठ) वापरू शकता. हे मीठ शुद्ध आणि नैसर्गिक मानले जाते. बरेच लोक सेंधे मीठ आणि पांढरे मीठ सारखेच मानतात, पण तसे नाही. डोंगरावरील खडक बारीक करून सेंधे मीठ तयार केली जाते. नवरात्रीत मिठाचा नियम सामान्यतः कोणत्याही उपवासात निषिद्ध मानला जातो.

पण नवरात्रीच्या उपवासाच्या नियमांमध्ये तुम्ही रॉक सॉल्ट (काळे मीठ) वापरू शकता. हे मीठ शुद्ध आणि नैसर्गिक मानले जाते. हे खाल्ल्याने उपवास मोडत नाही. बरेच लोक काळे मीठ आणि पांढरे मीठ हे समान मानतात परंतु तसे नाही. डोंगरावरील खडकांना बारीक करून रॉक मीठ तयार केले जाते. तर काळे मीठ कृत्रिमरीत्या बनवले जाते.

Chaitra Navratri Fasting Rules
Chaitra Navratri 2023 : आज नवरात्रीचा दुसरा दिवस, या दिवशी माता ब्रम्हचारिणीची पूजा का केली जाते, वाचा

नवरात्रीच्या उपवासात काळ्या मिठाचा वापर करा

नवरात्रीच्या उपवासाच्या नियमात फक्त शुद्ध आणि सात्विक अन्न खाण्याची तरतूद आहे. यामध्ये मीठाचाही समावेश आहे. वास्तविक पांढरे मीठ रसायनांच्या माध्यमातून तयार केले जाते. म्हणूनच ते शुद्ध मानले जात नाही. पूजा आणि उपवासासाठी बनवल्या जाणार्‍या प्रसादात पांढरे किंवा काळे मीठ (नवरात्रीला मिठाचा नियम) घालणे निषिद्ध मानले जाते. मात्र यात काळे मीठ वापरू शकता. रॉक सॉल्ट(काळे मीठ) मध्येही औषधी गुणधर्म आढळतात, त्यामुळे ते आरोग्यासाठी चांगले मानले जाते. म्हणूनच नवरात्री असो किंवा इतर कोणताही उपवास असो, त्यात नेहमी काळे मीठ वापरावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.