Champa Shashti : ज्याने पाहिली नाही जेजुरी, त्याने पहावी चांदोरी

Champa Shashti
Champa Shashti esakal
Updated on

चांदोरी : गोदावरी नदी द्वितीयेच्या चंद्राप्रमाणे ज्या ठिकाणी प्रवाहित होते ते गाव म्हणजे चंद्रावती. चंद्रावतीचे पुढे अपभ्रंश चांदोरी असे झाले. महाराष्ट्राचे कुलदैवत आणि प्रतिजेजुरी म्हणून समजल्या जाणाऱ्या चांदोरी येथील गोदातीरावरील पुरातन खंडेराव मंदिर एक श्रद्धास्थान. जेजुरीच्या खंडेरायाच्या दर्शनाला जाण्यापूर्वी आणि जाऊन आल्यानंतर पहिल्यांदा इथे दर्शन घेण्याची प्रथा आहे. त्यामुळे ‘आधी चांदोरी, मग जेजुरी’ अथवा ‘ज्याने पहिली नाही जेजुरी, त्याने पहावी चांदोरी’, अशी परंपरा चांदोरीसह उत्तर महाराष्ट्रात वर्षानुवर्षे पाळली जाते.

चांदोरीचे जहागीरदार सरदार देवराव महादेव हिंगणे यांचे सातवे वंशज पुष्करबाबा हिंगणे म्हणाले, की देव खंडोबा बानूचे माहेर असलेल्या चंदनापुरीला जाताना चांदोरी येथील गोदातीरीच्या मुक्कामी थांबले. माझे पणजोबा गावचे सरदार नानासाहेब जहागीरदार यांना ‘माझी मुक्कामाची जागा असलेल्या ठिकाणी मंदिर बांध’, असा दृष्टांत दिला. त्यानंतर ज्या ठिकाणी मंदिर बांधायला घेतले, त्या ठिकाणी जेजुरीप्रमाणे स्वयंभू पिंड मिळाली. हे स्थान खंडोबाचा पदस्पर्शाने पुण्य झाले असल्याचे महत्त्व पूर्वीच्या पिढीकडून आतापर्यंतच्या पिढीपर्यंत मौखिक स्वरूपात पोचले आहे.

Champa Shashti
Champa Shashti : चंपाषष्ठीला तळी भरलीच पाहीजे; जाणून घ्या संपुर्ण विधी

वर्षभरात चांदोरीमध्ये उत्सव होतात. चांदोरी येथून भाविक दर वर्षी जेजुरीला पायी जातात. माघ पौर्णिमेला दोन दिवस यात्रोत्सव होतो. त्या वेळी परंपरेने बारागाड्या ओढल्या जातात. खंडोबाचे भक्त (कै.) चंद्रकांत गडाख यांना बारागाड्या ओढण्याचा, तर मंदिरातील इतर पूजाविधी करण्याची जबाबदारी शिव उपासक गुरव कुटुंबीयांची नेमणूक केली आहे. त्यामुळे नीलकंठ शिंदे व त्यांचे कुटुंबीय सेवेची परंपरा पार पाडत आहेत. दिंडोरी, निफाड आदी गावातील भक्त जेजुरीला जाताना काठीची भेट आणि दर्शन चांदोरीला घडवतात. ही परंपरा अव्याहत सुरू आहे.

हेही वाचा : दुधाच्या प्लास्टिक पिशवीचा कापलेला छोटा कोपराही घडवेल अनर्थ...

श्री. शिंदे म्हणाले, की खंडोबाचे मंदिर हे गोदावरी नदीच्या किनारी असून, स्वयंभू लिंग आहे. हेगडी प्रधानांची मूर्ती आहे. दीपमाळ आहे. चंपाषष्ठीला मंदिरात चांदोरीतील ग्रामस्थ घरच्या देव्हाऱ्यातील देवांच्या प्रतिमा भेटीसाठी घेऊन मंदिरात येतात. पहाटेपासून सायंकाळपर्यंत भाविकांची वर्दळ असते. गोदातीरावरील मंदिराचा जीर्णोद्धार १९८० च्या दरम्यान करून भंडाऱ्याचा पिवळा रंग देण्यात आला आहे. राज्य सरकारने तीर्थक्षेत्र गटाचा ‘ब’ दर्जा दिला असून, मंदिर परिसरात विविध विकासकामे सुरू आहेत.

॥ चंपाषष्ठी दिवसी अवतार धरिसी मणी मल्ल दैत्यांचा संहार करिसी ॥

॥ चंपाषष्ठी चा करिती जे करिती कुळधर्म त्याचे होत आहे परिपूर्ण धर्म ॥

चंपाषष्ठी श्रीखंडेरायाच्या उपासनेतील उत्सव...

श्री मल्हारी मार्तंडाचे षड्‌रात्रोत्सावाचा सांगतेचा दिवस. या दिवशी मार्तंड भैरवांनी मल्लासुर दैत्याचा संहार केला. भूतलावरील अरिष्ट टाळले. विजायोत्सावामध्ये देवांनी मार्तंड भैरावांवर भंडारासोबत चंपावृष्टी (अर्थात चाफ्याची पुष्पवृष्टी) केली म्हणून मार्गशीर्ष शुद्ध षष्ठीला चंपाषष्ठी असे संबोधले जात असल्याची आख्यायिका आहे. कुटुंबातील सर्वांना सुख, समाधान आणि आरोग्यपूर्ण जीवनाचा आनंद मिळावा, आपल्यावरील संकटे नाहीशी व्हावीत यासाठी षड्‌रात्रोत्सवामध्ये रूढीप्रमाणे कुळधर्म- कुलाचार होतो. व्रत, उपवास केला जातो. त्यातून कुटुंबामध्ये मांगल्याचे आणि प्रसन्न वातावरण तयार होते.

Champa Shashti
Champa Shashti : ...म्हणून साजरी केली जाते मार्गशीर्ष महिन्यात चंपाषष्ठी; जाणून घ्या महत्त्व

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.