Chandra Grahan 2022 : ग्रहणांना घाबरु नका, त्यांचा आनंद घ्या; खगोल अभ्यासक अमोघ जोशी सांगतात...

Chandra Grahan 2022
Chandra Grahan 2022esakal
Updated on

तुम्हाला माहिती आहे का...?

Chandra Grahan 2022 : या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण आज (ता. ८) नोव्हेंबर रोजी होणार आहे. हे चंद्रग्रहण भारतात संध्याकाळी ५ वाजून २८ मिनिटांपासून ते ६ वाजून १८ मिनिटांदरम्यान दिसणार आहे. ग्रहणाविषयी बऱ्याच मान्यता आहे. ग्रहण पाहणे हे अशुभ मानले जाते असते. खगोल शास्त्रात मात्र ग्रहण हे नैसर्गिक प्रक्रीया आहे असे सांगितले जाते. त्यामुळे ग्रहण पाहणे शुभ आहे की अशुभ असा प्रश्न निर्माण होतो. चला तर आज खगोल अभ्यासकांकडून या विषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

Chandra Grahan 2022
Chandra Grahan 2022: चंद्रग्रहण पाहणे शुभ की अशुभ? हे वाचाच...

ग्रहणावेळी काळजी घेणे आवश्यकच...

खगोल अभ्यासक अमोघ जोशी सांगतात, ग्रहणाविषयी प्रत्येकाला कुतूहल असते. खरं तर सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण ही एक खगोलीय घटना आहे. उन- सावल्यांचा खेळ म्हणजे ग्रहण. सूर्यापुढे चंद्र आला किंवा पृथ्वी, चंद्र, सुर्य एका रांगेत आले की ग्रहण येते. यात एकाचे प्रतिबींब झाकले जाते त्यामुळे आपल्याला ग्रहण दिसते. अशाप्रकारच्या उन सावल्यांचा खेळ हा पावसाळ्यात तर नित्याचा असतो. ढग सुर्यासमोर दाटून आले की सूर्यही दिसत नाही. त्यामुळे ग्रहणाचा मानवी जीवनावर कुठलाही परिणाम होत नाही.

हा तर निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार

ग्रहण हा निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार असून त्याचा आनंद सर्वांनी घ्यावा. ग्रहण पाहिल्यामुळे कोणाला काही बाधा झाल्याची घटना अजूनतरी ऐकिवात नाही, मात्र ग्रहण पाहताना योग्य ती काळजी घेतली नाही तर शारीरिक इजा होऊ शकते, तरी योग्य ती काळजी घेऊन ग्रहण म्हणजेच निसर्गाचा हा अद्भुत चमत्कार बघितलाच पाहीजे असे अमोघ जोशी म्हणाले.

Chandra Grahan 2022
Chandra Grahan : सणासुदीत येणारी ग्रहणे मानवजातीसाठी धोक्याची घंटा; स्वामी संविदानंद यांचा मोठा खुलासा

भरती- ओहोटी हा चमत्कार नाही का...?

या प्रश्नावर अमोघ जोशी म्हणाले, चंद्र आणि पृथ्वी या दोन्ही ग्रहांना स्वतःची ग्रॅव्हीटी आहे. दोन्ही ग्रह एकमेकांना आपल्या ग्रॅव्हीटीनुसार स्वतःकडे खेचत असतात. ही प्रक्रीया प्रत्येक क्षणाला सुरुच असते मात्र त्याचा फारसा प्रभाव आपल्याल जाणवत नाही. मात्र समुद्राचा पृथ्वीवरील एकूण विस्तार मोठा असल्याने याचा प्रभाव समु्द्राला जाणवतो. आणि आपल्याला भरती ओहोटी दिसते हे त्यामागचे मुळ कारण आहे.

Chandra Grahan 2022
Sade Sati : साडेसाती म्हणजे काय?

ग्रहण पाहताना कोणती काळजी घ्यावी..?

ग्रहण ही खगोलीय घटना असून ऊन सावल्यांचा हा खेळ आहे. यातून प्रकाश किरणांचा मोठा प्रभाव असतो त्यामुळे ग्रहण उघड्या डोळ्यांनी दिसण अवघड आहे. आणि असा प्रयत्नही करु नये यामुळे डोळ्यांनी इजा होऊ शकते.

बाजारात यासाठी विशेष गॉगल उपलब्ध असतात त्यांचा वापर करावा. एक्स-रे मधून ग्रहण बघण्याचा जुगाड करु नये, याचा विपरीत परिणाम आपल्या डोळ्यांवर होऊ शकतो.

Chandra Grahan 2022
कर्ज परतफेडीच्या नियोजनाचे पाच मार्ग...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.