Chaturmas 2023 : मंडळी, चातुर्मासाची आधुनिक कहाणी माहितीये? जाणून घ्या आजच्या काळातलं महत्व

हल्लीच्या सोशल मीडियाच्या जगात या चातुर्मासाचं महत्व माहितीये, जाणून घ्या.
Chaturmas 2023
Chaturmas 2023esakal
Updated on

Current Importence Of Chaturmas : चातुर्मास म्हणजे चार महिन्यांचा समुह. आषाढी एकादशी म्हणजे देवशयनी एकादशीपासून सुरू होणारा हा चातुर्मास कार्तिकी एकादशी म्हणजे देव उठनी एकादशीपर्यंत असतो. श्रावण, भाद्रपद, अश्विन आणि कार्तिक अशा ४ महिन्यांचा कालावधी असतो. पण यंदा अधिकमास आल्याने हा कालावधी ५ महिन्यांचा आहे.

आजवर आपल्याला याचे अध्यात्मिक, धार्मिक महत्वच माहित होते. पण पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक गौरव देशपांडे यांनी याचं आधुनिक महत्वही सांगितलं आहे. नेमकं काय आहे जाणुन घेऊया.

या चार महिन्यांचच का महत्व?

वर्षात १२ महिने असतात, पण मग या चार महिन्यांच का एवढं महत्व आहे? याविषयी देशपांडे सांगतात, चातुर्मास हा दक्षिणायनात सुरू होतो. आपल्याकडे उत्तरायण आणि दक्षिणायन असे दोन आयन असतात. सुर्याचा प्रवास ज्या दिशेने त्यानुसार हे आयन ठरतात.

पुराणानुसार दक्षिणायनाच्या काळात देव झोपतात आणि दैत्य जागे असतात. म्हणूनच आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात. तर प्रत्यक्षात असं असतं का, तर नाही. याकाळात वाईट शक्तींचे, नकारात्मकतेचे प्राबल्य जास्त असते. विशेषतः या चार महिन्यांच्या कालावधीत. त्यामुळे या काळात सकारात्मता वाढावी म्हणून जास्त व्रतवैकल्य, पूजा करायला सांगितल्या आहेत.

Chaturmas 2023
Ashadhi Ekadashi 2023 : आषाढ महिन्यातल्या एकादशीलाच मोठी एकादशी का म्हणतात?

देशपांडे सांगतात, चातुर्मासात अन्न पचनासाठी होत असलेलं पित्ताचं सिक्रिशन याकाळात कमी होतं. म्हणूनच याकाळा आहार-विहाराचे पथ्य सांगितले आहेत. जेणे करून पचायला सोपे पदार्थ खावेत. तामस पदार्थ सेवन करू नये असं सांगितलं आहे.

काय वर्ज्य करावे?

  • इडलिंबू

  • महाळुंग

  • करपलेले अन्न

  • मसूर

  • मांस

  • पांढरा पावटा

  • काळा वाल

  • घेवडा

  • चवळी

  • लोणची

  • वांगी

  • कलिंगड

  • मुळा

  • चिंच

  • ऊस

  • कांदा-लसुण, इत्यादी.

Chaturmas 2023
Chaturmas 2023 : चातुर्मासात भगवान विष्णू झोपल्यावर या देवी देवतांची करावी उपासना

नियम पाळावा

चातुर्मासात एक नियम धरावा आणि तो चार महिने पाळावा असं म्हटलं जातं. यामागे कारण म्हणजे कोणताही नियम आपण सलग १२० दिवस पाळला की, तो अंगवळणी पडतो. त्यामुळे याकाळात नियमित व्यायामाचा नियम पाळावा.

उपासना करा

ज्या देवाची उपासना करायची त्याच्या शरीराने नाही मनाने जवळ रहायचं. त्यासाठी त्याच्याशी निगडीत स्तोत्र पठण करावे. यात विशेषतः विष्णूसहस्रनाम म्हणावे.

दानधर्म

शक्य ते यथाशक्ती दानाला महत्व आहे. त्यासाठी अन्नदानाला विशेष महत्व आहे. शिवाय हे दान संकल्प करून केले तर त्याचे फळ जास्त मिळते.

काही लोक एखादा पदार्थ या काळात खाणे सोडतात, तेच पदार्थ जर दान दिले तर त्यावरची आसक्ती कमी होण्यास मदत मिळते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.