Coconut Remedies : हिंदू धर्मात नारळाला विशेष महत्त्व आहे. नारळ हे पूजा-पाठसह अन्य शुभ कामामध्येही वापरले जातात. कोणतेही शुभ करण्यापूर्वी सुरवातीला कलश स्थापना केली जाते ज्यामध्ये नारळाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. माता लक्ष्मी आणि गणेशजी यांना नारळ अत्यंत प्रिय आहे.
आज आम्ही तुम्हाला नारळाचे काही खास उपाय सांगणार आहोत ज्यामुळे तुमचं नशीब रातोरात बदलू शकतं. चला तर जाणून घ्या. (Coconut Remedies 40 rupees coconut will change your luck maa Lakshmi show grace on you)
जर तुमच्या आयुष्यात आर्थिक समस्या असेल आणि घरी नेहमी पैशाची कमतरता जाणवत असेल तर सकाळी उठून अंघोळीनंतर लाल रंगाचे कपडे परिधान करावे.त्यानंतर माता लक्ष्मीची पुजा करावी.
पुजेत नारळ, कमळ, दही आणि मिठाईचा भोग चढवायचा. त्यानंतर पुजेतील नारळ लाल कपड्यामध्ये बांधून अशा ठिकाणी ठेवावे जिथे कोणाचेही लक्ष जाऊ नये. या उपायामुळे तुमच्या आयुष्यातील आर्थिक अडचणी दुर होतील.
घरात सातत्याने नकारात्मक ऊर्जा जाणवत असेल तर नारळाचा हा उपाय तुम्ही करू शकता. अनेकदा घरात नकारात्मक ऊर्जेच्या प्रभावामुळे घर-कुटूंबात अनेकदा आपआपसात क्लेष दिसून येतो.
अशावेळी नारळावर काळा टिका लावत या नारळाला घराच्या प्रत्येक कोपऱ्यात फिरवावे आणि नदीत विसर्जित करावे. असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होणार.
अनेकदा ग्रहदोषाचाही सामना करावा लागतो. ग्रहदोषामुळे अनेक कामे अपयशी ठरतात. अनेकदा कुंडलीत ग्रह दोष आढळल्याने व्यक्ती खूप अस्वस्थ असतो. अशात नारळाचा गा उपाय तुम्हाला फायदेशीर ठरू शकतो.
शनिवारच्या दिवशी नारळाचे दोन भाग करावे आणि दोन्ही भागात साखर भरुन त्याला निर्जन जागेवर न्यावे. असं केल्याने कुंडलीचा ग्रह दोष शांत होतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.