Darsh Amavasya 2023 : दर्श अमावस्येला हे उपाया करा, मिळेल पितरांचा आशीर्वाद

दर्श अमावस्येला हिंदू धर्मात फार शुभ मानलं जातं. या दिवशी काही उपाय केल्याने पितरांचे आशीर्वाद मिळतात.
Darsh Amavasya 2023
Darsh Amavasya 2023esakal
Updated on

Darsh Amavasya 2023 : आज दर्श अमावस्या आहे. हिंदू धर्मात फार शुभ मानलं जातं. या दिवशी काही उपाय केल्याने पितरांचे आशीर्वाद मिळतात. या अमावस्येला श्राद्ध अमावस्या पण म्हणतात. या दिवसी चंद्रदर्शन होत नसल्याने पितरांना प्रसन्न करण्यासाठी हा दिवस चांगला मानला जातो. हिंदू धर्मात प्रत्येक अमावस्येचं विशेष महत्व असतं. दर्श अमावस्येच्या दिवशी पूर्वजांची पूजा करण्याचं महत्व असतं.

या दिवशी काही लोक व्रतदेखील करतात. कालसर्प दोष निवारण पूजा करण्यासाठी हा दिवस श्रेष्ठ असल्याचे मानले जाते.

अशी अख्यायिका आहे की या दिवशी आपले पितरं पृथ्वीलोकात येतात. त्यांच्यासाठी जेवणाचे ताट काढून ठेवायला हवे. गाईला गूळ आणि जेवण द्यावे. या दिवशी काही उपाय केल्याने सर्व व्याधी दूर होतात. जाणून घेऊया उपाय.

व्यवसायात अडचणी येत असल्यास हा उपाय केल्यास व्यवसायाच्या अडचणीतून मूक्ती मिळू शकते.

  • यासाठी शनिवारी सकाळी एक लिंबू घेऊन त्याचे ४ भाग करायचे. त्यावर पिवळी मोहरी, २९ काळे मिरे आणि ७ लवंगा घेऊन व्यवसायाच्या ठिकाणी ठेवून यावे.

  • आणि संध्याकाळी या सर्व वस्तूंना काळ्या कपड्यात बांधून कोरड्या विहिरीत टाकून यावे.

  • या उपायाने व्यवसायातल्या अडचणी दूर होऊन धनवर्षा होऊ लागेल.

Darsh Amavasya 2023
Mole Astro Tips : महिलांच्या शरीरावर इथे तीळ असणं ठरतं लकी..!
  • आर्थिक अडचण दूर करण्यासाठी दर्श अमावस्येच्या संध्याकाळी इशान्य कोपऱ्यात गाईच्या तुपाचा दिवा कापसाच्या वाती ऐवजी लाल दोऱ्याचा वापर करून लावायला हवा. दिव्यात थोडे केसर घालून लावल्याने लक्ष्मी प्रसन्न होते. पैशांची कमतरता जाणवत नाही.

  • गाईला हिरवे गवत खाऊ घालायला हवे. सर्व कार्य सिद्ध होतील शिवाय बुद्धीही कुशाग्र होईल.

  • अमावस्येला रात्री १२ वाजता मोहऱ्या हातात घेऊन गच्चीवर जाऊन ३ वेळा परिक्रमा करून ते सर्व दिशांना फेकून ll  ॐ श्री हीं क्लीं महालक्ष्मये नमः ll हा मंत्र म्हणावा.

Darsh Amavasya 2023
Kitchen Astro Tips : स्वयंपाक घरातल्या तव्याचे हे छोटेसे उपाय करतील घरातले सगळे तणाव दूर...

दर्श अमावस्या पूजन विधी

पुराणानुसार अमावस्येला स्नान, दान करण्याची परंपरा आहे. तसंच या दिवशी गंगा स्नान करण्याचे विशेष महत्व आहे. पण ज्यांना गंगास्नान शक्य नाही त्यांनी जवळच्या नदीत, तलावात स्नान करावे. किंवा आंघोळीच्या पाण्यात पवित्र नदीचं पाणी मिसळून आंघोळ करावी. महादेव, पार्वती आणि तुळशीची पूजा करावी.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.