Dasara 2022 : दसऱ्याला पाटी आणि वहीवर आकडे काढूनच सरस्वती का काढतात?

त्रिकोणाकृति बीज मंत्राचा उपयोग करुन हे सरस्वती यंत्र काढले जाते
Dasara 2022
Dasara 2022esakal
Updated on

शारदीय नवरात्र संपून आज दसरा सुरू झाला आहे. कालपर्यंत संपूर्ण भारतात खूप जल्लोषाचे वातावरण होते. दसऱ्याबद्दल अनेक आख्यायिका आहेत; जसे की देवीने राक्षसांशी दहा दिवस युद्ध करून दसऱ्याच्या दिवशी विजय मिळवला तर काही लोक म्हणतात की पांडव त्यांचा वनवास आणि अज्ञात वास संपवून दसऱ्याच्या दिवशी युद्धासाठी सज्ज झाले होते तर काही लोक म्हणतात की आज प्रभू श्रीरामचंद्रानी रावणाचा पराभव केलेला.

Dasara 2022
Dasara Festival 2022 : गृहोपयोगी वस्‍तूंना मागणी; Electronic बाजारपेठेत चैतन्य

यादिवशी लोकं रावण दहन करतात, आपट्याची पाने वाटून जुने क्लेश संपवतात आणि काही लोकं आपल्या उपकरणांची, अवजारांची आणि विद्येची पूजा देखील करतात. ज्यात सरस्वतीची एक प्रतिमा काढली जाते.

Dasara 2022
Dasara Festival 2022 : गांधी तलावाजवळ आज रावणदहन

दसऱ्याच्या दिवशी लहानपणापासूनच आपल्याला सवय आहे की आपण १_१ असे काढून सरस्वतीची प्रतिमा काढतो, लहानपणी आपण ही प्रतिमा काढून शाळेतही घेऊन जायचो, संध्याकाळी अशी प्रतिमा बाबा किंवा आजोबा कुंकवाने किंवा लाल पेनाने काढून सरस्वतीची पूजा करायचे.

Dasara 2022
Dasara Melava 2022 : दसरा मेळाव्यासाठी चोख नियोजन अन् बंदोबस्त

पण यामागे नक्की तंत्र काय?

याला तांत्रिक साधना किंवा तंत्रशास्त्र म्हणू शकतो. त्यात  "ऐं" "ऱ्हिं" इ.अनेक  बीज मंत्रे येतात. त्यापैकी " ऐं" हा एक बीज मंत्र आहे. तंत्र शास्त्राचे काही ग्रंथ ब्राह्मी लिपित आहेत. तर हा "ऐं " बीज मंत्र ब्राह्मी लिपीत त्रिकोणाकृती लिहीला जातो.

Dasara 2022
Dasara Melava 2022: दसरा मेळाव्यामुळे मुंबईतील वाहतूकीत बदल; 'या' पर्यायी मार्गांचा करा वापर

त्या त्रिकोणाकृति बीज मंत्राचा उपयोग करुन हे सरस्वती यंत्र काढले गेले आणि प्रचलित झाले. असे हे सरस्वती यंत्र थोड्या थोड्या फरकाने अनेक प्रकारे काढलेले सरस्वती विषयक ग्रंथात सापडते. तंत्र शास्त्रातले कोणतेही यंत्र हे बीज मंत्राचे प्रकटीकरण असते. अशी अनेक यंत्रे बहुदा सर्वच देवी देवतांची असतील. ही आकृती म्हणजे बीजमंत्राचे प्रतिकात्मक आकृतीरुप असलेले लघुरुप आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.