Deep Amavasya : दीप अमावस्येला पूजा करण्याची ही आहे योग्य पद्धत

आषाढ अमावस्येला दीप अमावस्याही म्हणतात. यादिवशी दिव्यांची आरास करून पूजन केले जाते.
Deep Amavasya
Deep Amavasya esakal
Updated on

Deep Amavasya Puja Vidhi : आज १७ जुलै २०२३ ला दीप अमावस्या आहे. या दिवशी संध्याकाळी सर्व दिवे घासून पुसून लख्ख करून त्यांची आरास मांडून पूजा केली जाते. आषाढ महिन्याच्या या शेवटच्या दिवशी असलेल्या अमावस्येला बहुतेक जण गटारी अमावस्या म्हणून ओळखतात. मात्र धर्मशास्त्रात या अमावस्येला दिव्यांच्या पूजनाचे विशेष महत्व सांगितले आहे.

Deep Amavasya
Deep Amavasya esakal

कला कुसर

हल्ली लोक प्रत्येक गोष्टीचा इव्हेंट करतात. किंवा कलाकुसर दाखवत आपल्याला काहीतरी हटके करायचे आहे असे दाखवतात. पण कुठे हटके क्रिएटीव्हिटी दाखवावी याचाही विचार व्हायला हवा. कारण आपल्या रुढी-परंपरा पद्धती यांच्या मागे एक विचार दिलेला असतो. तो आपण जाणून घेणं गरजेचं असतं. जीवनातला अंधःकार, आजारपण, आळस दूर होऊन उत्साह, आरोग्य यांचा प्रकाश उजळू दे सांगणारा हा सण साजरा होतो.

त्यात गौरींप्रमाणे दिव्याला वस्त्र परीधान करण्याची कलाकुसर काही जण करतात. पण ही मूळ पद्धत नाही आणि धोका दायकदेखील आहे. समईला अशा प्रकारचे वस्त्र नेसवल्याने त्यातून गळणाऱ्या तेलाने हे वस्त्र कधीही पेट घेण्याचा धोका असतो. कलात्मकता दाखवण्याला हरकत नाही, पण आगीशी, दिव्याशी खेळ करू नये असं थोरामोठ्यांनी उगाच सांगितलेलं नाही.

Deep Amavasya
Deep Amavasya : ...म्हणून दीप अमावस्येला लहान मुलांना ओवाळावे
Deep Amavasya
Deep Amavasya esakal

कसे करावे शास्त्रोक्त पूजन

रोज संध्याकाळी देवापुढे दिवा लावून शुभं करोती म्हणण्याची पद्धत पूर्वापार आहे. पण हल्ली लोक हे विसरले आहेत. अशा लोकांनी किमान या दीप अमावस्येच्या दिवसापासून ही सवय पुन्हा अंगवळणी पाडावी असा एक सुचक करणारा हा सण मानला जातो.

या दिवशी घरातील सर्व दिवे स्वच्छ लख्ख करून ठेवावे. समई, पणती, निरंजन हे सर्व दिवे घासून पुसून स्वच्छ करावे.

  • संध्याकाळी जिथे आरास मांडायची ती जागा स्वच्छ करून पुसून घ्यावी.

  • छान पाट मांडावे. पाटावर नवे वस्त्र अंथरावे.

  • पाटाच्या खाली व आजूबाजूने रांगोळी काढावी.

  • सर्व दिव्यांची आरास नीट मांडावी.

  • त्यात वाती, तेल घालावे.

  • हळद-कुंकू वाहून दिव्यांची पूजा करावी.

  • फुले वाहून छान आरास सजवावी.

  • दूध, साखरेचा नैवेद्य दाखवावा.

  • हात जोडून शुभंकरोती म्हणावे, आयुष्यातील अंधःकार निघून जाऊन प्रकाशाने आयुष्य उजळावे अशी प्रार्थना करावी.

Deep Amavasya
Somvati Amavsya : घरात पितृदोष असेल तर सोमवती अमावस्येला हे उपाय करा, लाभेल सुख, शांती

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.