Dev Diwali 2024: देव दिवाळीला हिंदू धर्मात खुप महत्व आहे. दिवाळीनंतर हा सण मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो. यंदा १५ नोव्हेंबरला देव दिवाळी साजरी केली जात आहे. या दिवशी घरी दिवे लावले जातात. तसेच माता तुळशीची, महादेव आणि पार्वतीची पूजा करणे शुभ मानले जाते.
देव दिवाळी उत्तर प्रदेशमधील काशीत मोठ्या आनंदात आणि जल्लोषात साजरी केली जाते. या शहराला महादेवाचे गाव म्हणून ओलखले जाते. या खास दिवसानिमित्त गंगा घाट लाखो दिव्यांनी सजलेला असतो. हे सुंदर दृश्य पाहण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी असते. देव दिवाळी आणि काशीशी काय संबंध आहे आणि त्याचे धार्मिक महत्व काय आहे हे जाणून घेऊया.