Dhanteras Puja 2022 : आरोग्य अन् समृद्धीसाठी करावी धनत्रयोदशी पुजा; जाणून घ्या मंत्रांसह संपुर्ण विधी

Dhanteras 2022
Dhanteras 2022esakal
Updated on

Diwali Festival Dhanteras 2022 : अश्विन कृष्ण त्रयोदशी म्हणजेच दिवाळी पर्वातील अत्यंत महत्वाचा दिवस म्हणजे धनत्रयोदशी. यंदा 2 धनत्रयोदशी तिथी आल्या असल्याने महाराष्ट्रात काही विशेष जिल्ह्यांनी 22 तर काही जिल्ह्यांमध्ये 23 ऑक्टोबरला धनत्रयोदशी साजरी करावी असे पंचांगकर्ते मोहन दाते सांगतात. उत्तम आरोग्याच्या प्राप्तीसाठी भगवान धन्वंतरीचे पुजन या दिवशी केले जाते. घरोघरी धनत्रयोदशी पुजन मोठ्या भक्तीभावाने केले जाते. मात्र आताच्या या धावपळीच्या युगात पुजेसाठी गुरुजी मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत धनत्रयोदशी पुजेची संपुर्ण माहिती तिही मंत्रांसहित. चला तर मंत्रासह धनत्रयोदशी पुजन अन् मुहूर्त जाणून घेऊया.

(Dhanteras Diwali festival 2022 Dhantrayodashi puja Complete rituals with mantra)

Dhanteras 2022
Dhanteras 2022: 'हे' भन्नाट संदेश पाठवून तुमच्या प्रियजनांना द्या धनत्रयोदशीच्या शुभेच्छा
धन्वंतरी
धन्वंतरीesakal

या जिल्ह्यांनी साजरी करावी 22 अन् 23 ऑक्टोबरला धनत्रयोदशी

मुंबई, पुणे, नाशिक, सांगली, कोल्हापुर या जिल्ह्यांत 22 ऑक्टोबरला धनत्रयोदशी साजरी करावी.

तर सोलापुर, औरंगाबाद, मराठवाडा, विदर्भात 23 तारखेला धनत्रयोदशी साजरी करावी.

दिवाळीत धनत्रयोदशीला विशेष महत्व आहे. घरोघरी धनत्रयोदशीनिमीत्त भगवान धन्वंतरी, लक्ष्मी कुबेर पुजन केले जाते. या दिवशी काय करावे यासह धनत्रयोदशी पुजनाचा मंत्रांसहित संपुर्ण विधी जाणून घेऊ.

धनत्रयोदशीला काय करावे..?

धर्म अभ्यासक अशोककाका कुलकर्णी सांगतात, अश्विन शुद्ध त्रयोदशीला धनत्रयोदशी म्हणतात. या दिवशी वस्त्रालंकाराची खरेदी करणे शुभ मानले जाते. या दिवशी उपवास करून घरातले द्रव्य व अलंकार पेटीतून काढून साफसुफ करुन व पुनश्च योग्य ठिकाणी ठेवावे. कुबेर, विष्णू, लक्ष्मी, योगिनी (देवी), गणेश, नाग आणि द्रव्यनिधी यांची पूजा करून खिरीचा किंवा धणे व गूळ यांचा नैवेद्य दाखवावा. या पूजेसाठी झेंडूच्या फुलांचे विशेष महत्त्व आहे. यासह गरजुंना यथाशक्ती दान द्यावे. या दिवशी सायंकाळी तेलाने भरून एक दिवा प्रज्वलित करावा व नंतर त्याची गंधादी उपचारांनी पूजा करून घराच्या दाराजवळ, धान्याच्या राशीजवळ ठेवावा. हा दिवा रात्रभर जळत राहणे आवश्यक आहे.

Dhanteras 2022
Diwali 2022 : दिवाळीला लक्ष्मीची मुर्ती खरेदी करताना या गोष्टी अजिबात विसरु नका; अन्यथा घडेल मोठी चूक
Diwali Festival 2022
Diwali Festival 2022esakal

पुजचे साहित्य

चौरंग/ पाट - 1, लाल वस्त्र - 1 श्रीफळ (नारळ) - 1, गहू/ तांदूळ, हळद, कुंकू, गुलाल, कापूर, उदबत्ती, खडीसाखर, विड्याची पानं, सुपारी, सुटे नाणे, पंचरंगी धागा, हार, फुले, पंचामृत, गुळ, धणे, फळ, अत्तर, अष्टगंध, तुपाची निरांजन, समई तांब्याचे कलश - 2.

या प्रकारे करा पुजेची मांडणी

धनत्रयोदशीला पुजेची मांडणी ही पुर्वाभिमुख म्हणजेच पुर्व दिशेला असावी. या दिशेला 1 चौरंग/ पाट ठेवून त्यावर लाल वस्त्र अंथरावे. या चौरंगाच्या मध्यभागी 5 विड्याची पाने ठेवावी. प्रत्येक विड्याच्या पानावर सुपारी, बदाम, खारीक, हळकुंड, रुपयाचे सुटे नाणे असे प्रत्येक पानावर ठेवावे. चौरंगावर कलश स्थापनेसाठी उजव्या बाजुला गहू किंवा तांदूळ टाकून त्यावर पाण्याने भरलेला कलश ठेवावा. या कलशात हळद, कुंकू, गुलाल, अक्षता, फुल, रुपयाचे नाणे, सुपारी व विड्याची 5 पाने ठेवून श्रीफळ (नारळ) स्थापित करावे. यानंतर चौरंगावर गणपती, लक्ष्मी, सरस्वती आणि कुबेर यासह धन्वंतरी देवाचा फोटो किंवा मुर्ती ठेवावी. यासह घरातील धन म्हणजे सोन- चांदी, पैसे ठेवावे. चौरंगाच्या उजव्या बाजुला समई प्रज्वलित करावी अन् पुजेसमोर छानशी रांगोळी काढावी, अशाप्रकारे धनत्रयोदशी पुजेची मांडणी करावी.

Dhanteras 2022
Diwali Muhurat 2022 : यंदा 2 दिवस धनत्रयोदशी, मग नेमका सण कधी साजरा करावा? पंचांगकर्ते दाते सांगतात...

धनत्रयोदशी पुजेचा संपुर्ण विधी

सर्वप्रथम स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. यानंतर आपल्या घरातील देव्हाऱ्यासमोर किंवा जेथे आपण धनत्रयोदशी पुजन करणार आहात (पुर्व दिशेला) तेथे पुजेची तयारी करावी. गणेशाचे स्मरण करुन या मंत्राचा उच्चार करावा.

सत्यं च येन निरतं रोगं विधूतं, अन्वेषित च सविधिं आरोग्यमस्य।

गूढं निगूढं औषध्यरूपम्, धन्वन्तरिं च सततं प्रणमामि नित्यं।।

भगवान धन्वंतरीची मुर्ती किंवा प्रतिमा पुजा स्थळी स्थापन करून स्वतः पूर्व दिशेला मुख करून बसावे.

सर्वप्रथम आपल्या डोळ्यांना पाण्याचा स्पर्ष करावा. (दिलेल्या माहीतीनुसार दिलेला मंत्रही त्यासोबत म्हणावा)

ॐ नेत्राच्यम्य नेत्र उदक स्पर्शाः |

त्यानंतर उजव्या हातावर पळी भर पाणी घेवून ते प्राशन करुन

आचमन करावे, त्यावेळी ही नावे उच्चारावी.

ॐ केशवाय नमः । ॐ नारायणाय नमः । ॐ माधवाय

ॐ गोविंदाय नमः

या नावाने पाणी सोडावे. पुढील नावे हात जोडून म्हणावीत. नंतर प्राणायाम करावा.

ॐ विष्णवे नमः ।

ॐ मधुसूदनाय नमः |

ॐ त्रिविक्रमाय नमः |

ॐ वामनाय नमः ।

ॐ श्रीधराय नमः |

ॐ हृषीकेशाय नमः ।

ॐ पद्मनाभाय नमः ।

ॐ दामोदराय नमः ।

ॐ दामोदराय नमः ।

ॐ संकर्षणाय नमः ।

ॐ वासुदेवाय नमः ।

ॐ प्रद्युम्नाय नमः

ॐ अनिरुद्धाय नमः

ॐ पुरुषोत्तमाय नमः ।

ॐ अधोक्षजाय नमः ।

ॐ नारसिंहाय नमः ।

ॐ अच्युताय नमः

ॐ जनार्दनाय नमः ।

ॐ उपेन्द्राय नमः ।

ॐ हरये नमः ।

ॐ श्रीकृष्णाय नमः ।

त्यानंतर प्राणायाम करावा.

ॐ भूः ॐ भुवः ॐ स्वः ॐ महः ॐ जनः ॐ तपः ॐ सत्यम् ।

ॐ भूर्भुवः स्वः । ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात ॥

आचमन प्राणायाम पूर्ण करावे व पळीभर पाणी सोडावे.

या मंत्रांनी सर्व देवतांना हात जोडून वंदन करावे

Dhanteras 2022
Diwali 2022: नरक चतुर्दशीला का फोडतात कारिट फळ? काय आहे त्यामागची आख्यायिका..
esakal

ॐ श्रीमन्महागणपतये नमः इष्टदेवताभ्यो नमः । श्रीसरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमः कुलदेवताभ्यो नमः । ग्रामदेवताभ्यो नमः । स्थानदेवताभ्यो नमः । वास्तुदेवताभ्यो नमः मातृपितृभ्यां नमः । श्रीलक्ष्मीनारायणाभ्यां नमः सर्वेभ्यो देवेभ्यो नमः । सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमः निर्विघ्नमस्तु

उजव्या हातावर एक पळी पाणी घेवून त्यात रुपयाचे नाणे, सुपारी, गंध-अक्षत फुल ठेवून पुजेचा संकल्प करावा.

(टिप- संकल्पामध्ये ज्या ठिकाणी --- अशी खूण आहे तेथे त्या दिवशीच्या संवत्सराचे, नक्षत्राचे, वाराचे योग व करण यांची नावे पंचांगात पाहून म्हणावीत.)

श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो द्वियीये परार्धे विष्णुपदे श्रीश्वेतवाराहकल्पे, वैवस्वतमन्वन्तरे, कलियुगे, प्रथमचरणे, भरतवर्षे, भरतखंडे, जंबुद्वीपे दण्डकारण्ये देशे, गोदावर्याः दक्षिणे तीरे --मण्डले, ग्रामे, शालिवाहन शके, नाम संवत्सरे, ---अयने, ऋती, मासे, पक्षे, - तिथी, वासरे, -----दिवस, नक्षत्रे, एवंगुणविशेषणविशिष्टायां शुभपुण्यतिथौ, मम आत्मनः श्रुति स्मृति पुराणोक्त फलप्राप्त्यर्थ अस्माकं सर्वेषां सहकुटुंबानां सहपरिवाराणां क्षेम स्थैर्य विजय अभय आयुरारोग्यैश्वर्याभिवृद्धयर्थ शान्त्यर्थ पुष्टयर्थ तुष्टयर्थ समस्तमंगलावाप्त्यर्थ समस्तदुरितोषशांत्यर्थं समस्ताभ्युदयार्थ च इष्टकामसंसिद्धयर्थ कल्पोक्तफलावाप्त्यर्थ मम इह जन्मनि जन्मजन्मांतरे च सहकुटुंबस्य क्षेमस्थित्यायुरारोग्यैश्वर्यादिवृद्धि सर्वकामर्निर्विघ्नसिद्धि पुत्रपौत्रधनधान्यविद्याजययशसमृद्धिद्वारा अद्य अश्विन कृष्णत्रयोदशी प्रतिवार्षिकं विहितं श्री धन्वंतरी देवताप्रीत्यर्थं यथाशाक्ति यथाज्ञानेन यथामीलितोपचारद्रव्यैः ध्यानावाहनादिषोडशोपचारैः पूजां करिष्ये.

कुठलेही पुजन करताना आपण सर्वप्रथम गणेशाचे पुजन करतो. कारण गणपती बाप्पा आपले आराध्य दैवत आहेत. त्यामुळे गणेशाचे स्मरण करावे.

वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ|

निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ||

या मंत्राचा उच्चार करुन गणेशाला गंधाक्षत पुष्प (फुल) अर्पण करावे.

या दिवशी कुबेर, विष्णू, लक्ष्मी, योगिनी (कुलस्वामिनी), नाग आणि द्रव्यनिधी (घरातील धन) यांच्या पुजनाला विशेष महत्व आहे. आपण जी 5 विड्याची पाने चौरंगावर ठेवली आहेत त्या प्रत्येक विड्यावर या देवतांची स्थापना करायची आहे.

Dhanteras 2022
Diwali 2022: कोण आहे देवी लक्ष्मीचा भाऊ? त्याच्या शिवाय केलेली पूजा अपूर्ण राहते.

कुबेर पुजन

या मंत्राचा उच्चार करुन कुबेराला गंधाक्षत पुष्प (फुल) अर्पण करावे.

ॐ श्रीं ह्रीं क्लीं श्रीं क्लीं वित्तेश्वराय नमः॥

ॐ ह्रीं श्रीं क्रीं श्रीं कुबेराय अष्ट-लक्ष्मी मम गृहे धनं पुरय पुरय नमः॥

ॐ यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्याधिपतये॥

धनधान्यसमृद्धिं मे देहि दापय स्वाहा॥

विष्णू पुजन

या मंत्राचा उच्चार करुन भगवान विष्णूला गंधाक्षत पुष्प (फुल) अर्पण करावे.

मङ्गलम् भगवान विष्णुः, मङ्गलम् गरुणध्वजः।

मङ्गलम् पुण्डरी काक्षः, मङ्गलाय तनो हरिः॥

लक्ष्मी पुजन

या मंत्राचा उच्चार करुन लक्ष्मी देवीला गंधाक्षत पुष्प (फुल) अर्पण करावे.

श्री महालक्ष्म्यै च विद्महे विष्णु पत्न्यै च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् ॐ॥

योगिनी (कुलस्वामिनी देवी) पुजन

या मंत्राचा उच्चार करुन कुलस्वामिनी देवीला गंधाक्षत पुष्प (फुल) अर्पण करावे.

नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नम:।

नम: प्रकृत्यै भद्रायै नियता:प्रणता:स्म ताम् ॥

नाग पुजन

या मंत्राचा उच्चार करुन गंधाक्षत पुष्प (फुल) अर्पण करावे.

ॐ नवकुलाय विद्महे विषदंताय धीमहि तन्नो सर्प प्रचोदयात ||

गंधाक्षत पुष्प अर्पण करुन सर्व देवांना नमस्कार करावा. यासह आपण घरातील जे धन ठेवलं असेल त्याची मनोभावे पुजा करावी.

यानंतर आपण जो कलश मांडला आहे त्याला 5 ठिकाणी गंध लावावा.

गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती। नर्मदे सिन्धु कावेरी जले अस्मिन् सन्निधिम् कुरु॥

या मंत्राचा उच्चार करुन कलशाला फुल, हार अर्पण करुन नमस्कार करावा.

Dhanteras 2022
Fun Facts : दिवाळी विषयी तुम्हाला 'या' १० गोष्टी माहितीये?
esakal

धन्वंतरी पुजन

या मंत्राचा उच्चार करुन धन्वंतरी देवाचे स्मरण करुन देवाला गंधाक्षत पुष्प (फुल) अर्पण करावे पुजन विधी सुरू करावा.

देवान् कृशानसुरसंघनिपीडिताङ्गान्

दृष्ट्वा दयालुरमृतं विपरीतुकामः ।

पाथोधिमन्थनविधौ प्रकटोऽभवद्यो धन्वन्तरिः स भगवानवतात् सदा नः ॥

ध्यानार्थे अक्षतपुष्पाणि समर्पयामि ॐ धन्वन्तरिदेवाय नमः ।

या मंत्राद्वारे देवाला शुद्ध पाणी, अर्घ्य (गंधाचे पाणी) अर्पण करावे.

ॐ धन्वन्तरये नमः । स्नानार्थे जलं समर्पयामि।

पळीत पंचामृत घेऊन देवाला स्नान घालावे.

ॐ धन्वन्तरये नमः । पंचामृतस्नानार्थे पंचामृतं समर्पयामि ।

त्यानंतर पुन्हा शुद्ध पाणी घालावे.

पंचामृतस्नानान्ते शुद्धोदक स्नानं समर्पयामि ।

यानंतर देवाची मुर्ती स्वच्छ वस्त्राला पुसून स्वच्छ करावी अन् देवाची सिंहासनी (नियोजित जागेवर) स्थापना करावी.

Dhanteras 2022
Dhanteras Puja: कर्जमुक्त व्हायचंय? धनत्रयोदशीच्या दिवशी 'हे' उपाय करा

देवाला अत्तर लावावे.

ॐ धन्वन्तरये नमः । सुवासितं इत्रं समर्पयामि ।

वस्र अर्पण करावे.

ॐ धन्वन्तरये नमः । वस्त्रं समर्पयामि ।

गंध लावावा.

ॐ धन्वन्तरये नमः । गन्धं समर्पयामि ।

अक्षता अर्पण कराव्या.

ॐ धन्वन्तरये नमः । अक्षतान् समर्पयामि ।

फुले अर्पण करावी.

ॐ धन्वन्तरये नमः । पुष्पं समर्पयामि ।

ॐ धन्वन्तरये नमः । धूपम् आघ्रापयामि ।

उदबत्ती ओवाळावी.

ॐ धन्वन्तरये नमः । दिपकं दर्शयामि ।

निरंजन ओवाळावी.

देवाला धणे- गुळ/ खिरीचा नैवेद्य दाखवावा.

ॐ धन्वन्तरये नमः । नैवेद्यं निवेदयामि ।

एक पळी पाणी देवासमोर अर्पण करावे.

ॐ धन्वन्तरये नमः । आचमनीयं जलं समर्पयामि ।

देवाला फळे अर्पण करावी.

ॐ धन्वन्तरये नमः। ऋतुफलं समर्पयामि ।

तांबूल विडा अर्पण करावा.

ॐ धन्वन्तरये नमः । ताम्बूलं समर्पयामि ।

देवासमोर दक्षिणा ठेवावी.

ॐ धन्वन्तरये नमः । दक्षिणां समर्पयामि ।

कापूर निरंजन प्रज्वलित करुन देवाला ओवाळावे.

ॐ धन्वन्तरये नमः । कर्पूरनीराजनं समर्पयामि ।

शेवटी हात जोडून खालील प्रार्थना म्हणावी.

Dhanteras 2022
Diwali Bath Mistakes : अभ्यंगस्नानावेळी करू नका 'या' चूका; पडाल वर्षभर आजारी!

ॐ धन्वन्तरये नमः । नमस्कारं समर्पयामि ।

अथोदधेर्मथ्यमानात् काश्यपैरमृतार्थिभिः ।उदतिष्ठन्महाराज पुरुषः परमाद् भुतः ॥

दीर्घपीवरदोर्दण्डः कम्ब्रुग्रीवोऽरुणेक्षणः । श्यामलस्तरुणः स्रग्वी सर्वाभरणभूषितः ॥

पीतवासा महोरस्कः सुमृष्टमणिकुण्डलः । स्निग्धकुंञ्चितकेशान्तः सुभगः सिंहविक्रमः ॥

अमृतापूर्णकलशं विभ्रद् वलयभूषितः । स वै भगवतः साक्षाद्विष्णोरंशांशसमम्भवः ॥

सर्व रोगांचा नाश होऊन उत्तम आरोग्य प्राप्तीसाठी खालील मंत्राचे स्मरण करावे.

ऊं रं रूद्र रोग नाशाय धन्वन्तर्ये फट्।।

यानंतर भगवान धन्वंतरीला श्रीफळ अर्पण करून आरती करावी.

धनत्रयोदशीला धन्वंतरी पुजन केल्याने उत्तम आरोग्य अन् दीर्घायुष्य प्राप्ती होते असे धर्म अभ्यासक अशोककाका कुलकर्णी सांगतात.

Dhanteras 2022
Diwali 2022: यंदा दिवाळीच्या पणत्या लावताना 'या' गोष्टींची काळजी घ्यावी?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.