Dhanteras Rangoli Designs: धनत्रयोदशीच्या निमित्ताने सुंदर रांगोळी काढा, पहा 'या' प्रकारच्या उत्तम डिझाइन्स

आपल्या भारतीय संस्कृतीत रांगोळीला खूप महत्त्व आहे.
Dhanteras Rangoli Designs
Dhanteras Rangoli DesignsEsakal
Updated on

आपल्या भारतीय संस्कृतीत रांगोळीला खूप महत्त्व आहे. अगदी दररोज दारापुढे एक छोटस स्वस्तिक का होईना पण काढावं असं घरातले मोठे म्हणतात त्यात सण आला म्हणजे आपण अंगणात मोठी रांगोळी तर झालीच पाहिजे. धनत्रयोदशीच्या निमित्ताने तुम्हीही यापैकी एक सुंदर रांगोळी काढू शकतात. 

यावर्षी धनत्रयोदशी २२ ऑक्टोबर रोजी साजरी केली जाईल. दिवाळीच्या दोन दिवस आधी धनत्रयोदशी साजरी केली जाते. धनत्रयोदशी दिवाळीच्या सणाची सुरुवात म्हणून ओळखली जाते. धनत्रयोदशीला भगवान धन्वंतरी, लक्ष्मी देवी, कुबेर आणि यमराज यांची पूजा केली जाते. या दिवसापासून लोक आपली घरे सजवण्यास सुरुवात करतात. धनत्रयोदशीच्या शुभमुहूर्तावर रांगोळी काढण्याची परंपरा आहे. पण आजकाल अपार्टमेंट फ्लॅट असल्यामुळे घरापुढे तेवढी मोठी जागा असतेच अस नाही.. पण या रांगोळ्या तुमचा हाही प्रश्न सोडवतील.

Dhanteras Rangoli Designs
Dhanteras Rangoli DesignsEsakal

१. ही रांगोळी तुम्ही पूजेच्या ठिकाणी किंवा दरवाजाही काढू शकतात. यामध्ये भांड्याची रचना काढून, जी फारशी अवघड नसते, त्यात शुभ धनत्रयोदशी असे लिहू शकतात. तसेच, संपत्तीचे प्रतीक म्हणून लहान नाणी बनविण्यास विसरू नका.

Dhanteras Rangoli Designs
Dhanteras Rangoli DesignsEsakal

२. कमळाच्या फुलावर एका भांड्यात अनेक नाण्यांनी भरलेली ही रांगोळी रचना अतिशय सुंदर दिसते. पिवळा, लाल, हिरवा, पांढऱ्या रंगापासून ही रांगोळी तयार केली आहे. तुम्ही तुमच्या आवडीचा रंगही घेऊ शकता. स्वस्तिक चिन्ह काढा आणि चहुबाजूंनी दिवे ठेवा.  

Dhanteras Rangoli Designs
Dhanteras Rangoli DesignsEsakal

३. ब्राईट रंग वापरून काढलेली ही रांगोळी खूप सुंदर दिसते. त्याची रचना देखील साधी आहे. यामध्ये पिवळा, गुलाबी आणि निळा रंग वापरण्यात आला आहे. तसेच दिव्यांच्या सजावटीने ती खूप सुंदर दिसते आहे.

Dhanteras Rangoli Designs
Dhanteras Rangoli DesignsEsakal

४. मोराचा आकार असलेली ही रांगोळी अतिशय सुंदर आहे. ही रांगोळी डिझाईन या धनत्रयोदशीला तुमच्या घराला एक वेगळा लूक देईल. तुमच्या घरी येणारा प्रत्येक पाहुणा तुमची प्रशंसा केल्याशिवाय राहणार नाही. मात्र, ही काढण्यासाठी जागा लागेल आणि अतिशय सुबकपणे काढावी लागेल. ५-६ रंगांनी बनवलेली ही रांगोळी जरूर काढून पहा. 

Dhanteras Rangoli Designs
Dhanteras Rangoli DesignsEsakal

५. शुभ धनत्रयोदशी लिहिलेली ही रांगोळी तुम्ही तुमच्या बाल्कनी मध्ये, लिफ्ट एरिया मध्ये, तुमच्या घराच्या अंगणात, हॉल यापैकी कुठेही काढू शकता. यामध्ये एका बाजूला मडक्यावर स्वस्तिक चिन्ह आणि दुसऱ्या बाजूला कमळाचे फूल तयार करण्यात आले आहे. दिवाळी, धनत्रयोदशीच्या पूजेच्या वेळी त्यांचा वापर केला जातो. कमळाचे फूल हे देवी लक्ष्मीचे आवडते फूल आहे. रांगोळी काढल्या नंतर तुम्ही ती दिव्यानेही सजवू शकता. 

Dhanteras Rangoli Designs
Dhanteras Rangoli DesignsEsakal

६. वर्तुळाकारात काढलेल्या या रांगोळीची रचनाही अतिशय आकर्षक आहे. यामुळे तुमचे घरही उठून दिसेल. शुभ धनत्रयोदशी लिहून तुम्ही झेंडूच्या फुलांनी, दिव्याने सजवू शकता. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.