Diwali 2022: उटणे लावण्याचे काय आहे फायदे?

अभ्यंगस्नानाला आपल्याकडे पूर्वीपासून महत्त्व आहे.
utane
utaneEsakal
Updated on

वसुबारसपासून या दिवाळीची सुरुवात होते. दिव्यांची आरास, दारासमोर सडा-रांगोळी नवीन कपडे आणि फराळ करण्याची पद्धत आहे. यावेळी मान्सून संपलेला आणि शेतातलं पीक कापून घरात येत असतं. त्यामुळे धन-धान्य आणि लक्ष्मीचं पूजा केली जाते. गणरायाला नमन केलं जातं. अंधकारावर मात करून दिव्यांनी किंवा प्रकाशानं तेजोमय करणारा हा उत्सव भारतात साजरा केला जातो.

दिवाळी जवळ आली की आपल्याला हमखास आठवण होते कडाक्याच्या थंडीत पहाटे तेल लावणे आणि मग उटणे लावून केलेली मस्त कडक पाण्याने आंघोळ करणे.

अभ्यंगस्नानाला आपल्याकडे पूर्वीपासून महत्त्व आहे. अभ्यंगाचे आयुर्वेदात असंख्य वर्षांपूर्वी महत्त्व सांगितले आहे. विविध नैसर्गिक घटकांपासून तयार झालेले हे सुगंधी एकप्रकारचे स्क्रबर असल्याचेच म्हणावे लागेल. हे उटणे केवळ थंडीतच नाही तर एरवीही वापरायला हवे ज्यामुळे चेहऱ्याची त्वचा चांगली होण्यास मदत होते.  

उटणे लावल्यामुळे शरीराला होणारे फायदे काय आहेत पाहूया…

1) स्वच्छ त्वचा करण्यासाठी..

उटण्यामधील आयुर्वेदीक घटकांमुळे संसर्ग कमी होण्यास मदत होते. परिणामी अ‍ॅक्ने, पिगमेंटेशन, स्कार्स कमी होण्यास मदत होते. यामुळे सूर्यप्रकाशामुळे झालेले त्वचेचे नुकसान टाळण्यास मदत होते. लिंबामध्ये ब्लिचिंग घटक असल्याने त्याचे काही थेंब मिसळणे फायदेशीर ठरते. 

utane
Diwali Vrat 2022 : धनत्रयोदशीला करा हे व्रत, संतती अन् संपत्ती सुखाचा होईल लाभ; जाणून घ्या विधी

2) आठवड्यातून एकदा उटण्याचा वापर केल्याने त्वचा निरोगी होण्यास मदत होते. मात्र त्यानंतर लगेचच सूर्यप्रकाशात जाणे टाळा. जायचे झाल्यास सनस्क्रीनचा वापर आवर्जून करावा.

utane
Diwali cleaning : दिवाळीसाठी साफसफाई करताय ? असे चमकवा घरातील आरसे

3) उटणे नैसर्गिकरित्या चमक देते.

उटण्यामध्ये रक्तचंदन, वाळा, चंदन, वेखंड, कात, नागरमोथा यासारख्या वनस्पती आणि खोडांचा वापर केला जातो. हे घटक त्वचेला स्क्रबर म्हणून काम करतात. यामुळे काळवंडलेली त्वचा उजळण्यास मदत होते. याशिवाय उटण्याच्याबरोबरीने बेसन पीठही लावल्यास ते फायद्याचे ठरते. 

utane
Diwali Recipe: दिवाळी स्पेशल इंस्टन मैदा चकली कशी तयार करावी?

4) चंदनामुळे शरीराला थंडावा मिळतोत्वचा मुलायम होण्यासाठीदिवाळी हा थंडीच्या दिवसांत येणारा सण. थंडीमुळे शरीराची त्वचा कोरडी होते. अनेकदा अशा कोरड्या त्वचेमुळे आगही होते. या समस्येपासून सुटका व्हावी यासाठी पूर्वीपासून उटण्याचा वापर केला जातो. 

utane
Tax On Diwali Gift : दिवाळीला तुम्हालाही मिळतात गिफ्ट? तर, भरावा लागेल टॅक्स

5) उटण्यामधील आयुर्वेदिक घटकांमुळे त्वचेचा कोरडेपणा कमी होऊन ती मुलायम होण्यास सुरुवात होते. उटण्यामध्ये असणारी चंदन पावडर आणि हळद यामुळे त्वचा उजळण्यास मदत होते. त्यामुळे दिवाळी शिवायही एरवी आणि विशेषतः थंडीच्या दिवसात आठवड्यातून एकदा उटण्याचा वापर जरुर करावा.

utane
Diwali Recipe: कुरकुरीत शंकरपाळी रेसिपी

6) शक्य वयानुसार त्वचेला येणाऱ्या सुरकुत्या हे अतिशय सामान्य आहे. उटण्यामुळे सुरकुत्या पडण्याचे प्रमाण कमी होते. हळदीमध्ये अ‍ॅन्टी एजिंग घटक असल्याने त्याचा त्वचेला फायदा होतो. त्वचा दीर्घकाळ तजेलदार आणि टवटवीत दिसते. याशिवाय उटण्यात मध किंवा दूध लावल्यास त्याचा जास्त फायदा होतो. मध मिसळल्यास त्वचा मुलायम होण्यास मदत होते.

utane
Diwali Recipe: नाशिकचा खमंग चिवडा घरच्या घरी कसा तयार करायचा?

7) चेहऱ्यावरील किंवा हाता-पायावरील केस जास्त वाढू नयेत यासाठी लहानपणी बाळाला आंघोळ घालताना मसुराच्या डाळीचे पिठ किंवा हरभरा डाळीच्या पिठ लावले जाते. मात्र तरीही हे केस कमी न झाल्यास उटणे हा अतिशय उत्तम पर्याय असतो. उटणे लावून ते गोलाकार फिरवल्यास त्याचा केसांची वाढ थांबण्यासाठी उपयोग होतो. मात्र अशाप्रकारे उटणे चोळताना त्याचा त्वचेवर वाईट परिणाम होणार नाही याची काळजी घ्यायला हवी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.