Diwali 2022 : दिवाळीत रांगोळी आणि आकाश दिव्याचे काय आहे खास महत्त्व?

रांगोळी काढण्याची प्रथा वर्षानुवर्षे सुरू आहे.
Rangoli and Akash Diva in Diwali
Rangoli and Akash Diva in DiwaliEsakal
Updated on

रांगोळी काढण्याची प्रथा वर्षानुवर्षे सुरू आहे. शुभ कार्यात मैदा, तांदळाचे पीठ आणि आता अनेक रंगांची रांगोळी काढली जाते.पाच दिवस चालणाऱ्या या उत्सवात विविध सणांची, प्रथांची रेलचेल पाहायला मिळतेय. दिवाळीत घरासमोर आकर्षक रांगोळी काढली जाते. दिव्यांची रोषणाई केली जाते. दिवाळीत मातीचे दिवे लावणे हे विशेष महत्त्वाचे मानले जाते.लंका जिंकून भगवान राम जेव्हा सीतेसह अयोध्येला परतले तेव्हा संपूर्ण शहर दिव्यांनी उजळून निघाले होते. श्रीरामाच्या स्वागतासाठी सर्वत्र विद्युत रोषणाई करण्यात आली होती. 

शुभ कार्यापूर्वी दिवा लावण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. दिवाळीत दिवा लावणे आणि रांगोळी काढण्याचे नेमके महत्त्व काय ते जाणून घ्या.रांगोळी ही भारताची प्राचीन सांस्कृतिक परंपरा आहे. रांगोळीचा हेतू म्हणजे शक्ती, उदारता जाणवणे आणि नशीब मिळविणे हे आहे. संस्कृत भाषेत रांगोळीला रंगवल्ली म्हटले जाते. सौंदर्याचा साक्षात्कार आणि मंगलाची सिद्धी हे रांगोळीचे उद्देश मानले जातात. रांगोळी म्हणजे रांगोळीच्या दगडाच्या चूर्णापासून आणि रंगांच्या साहाय्याने रेखाटलेल्या ओळींपासून तयार झालेली आकृती. 

Rangoli and Akash Diva in Diwali
Diwali Recipes : दिवाळीनिमित्त पारंपारिक पद्धतीने बनवा रंगीत कानवले

भारतीय संस्कृतीमध्ये रांगोळीला खूप महत्त्व आहे. सण, उत्सव, मंगलसमारंभ, पूजा, कुलाचार, कुलधर्म, संस्कारविधी, व्रतवैकल्ये यांच्याशी सामान्यपणे ही कला निगडित आहे. रांगोळी काढण्याची प्रथा वर्षानुवर्षे सुरू आहे. शुभ कार्यात मैदा, तांदळाचे पीठ आणि आता अनेक रंगांची रांगोळी काढली जाते. 'रांगोळी' म्हणजे 'रंग' आणि 'अवल्ली' (पंक्ती). दिवाळी लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी वेगवेगळ्या रंगांचा वापर करून रांगोळी काढली जाते.असे म्हटले जाते की, रांगोळी उत्साहाचे प्रतीक आहे आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करते. त्यामुळे दिवाळीत प्रत्येक दिवशी विविध डिझाईनची रांगोळी काढणं महत्वाचं आहे. सध्याच्या काळात या परंपरेला स्पर्धेचं रूपदेखील आलं आहे.   

कंदिलांचे पारंपारिक महत्त्व?

पावसाळा संपवून नवी पिके हाती आल्यावर शरद ऋतूच्या मध्यावर अश्विन आणि कार्तिक महिन्याच्या संधिकाळात हा सण येतो. या दिवसात प्रभू रामचंद्र सीतेसह चौदा वर्षाचा वनवास संपवून अयोध्येला परत आले. त्यावेळी अयोध्यातील प्रजेने दीपोत्सव केला. तेव्हापासून दरवर्षी हा उत्सव साजरा केला जातो. असे म्हणतात, की दीपज्योती हे चिरंतन सर्वात्मक परमेश्वराचे प्रतीक आहे आणि म्हणूनच ‍‍दिवाळी आली, की घराघरांवर आकाशदिवे लागतात. विविध प्रकारच्या कलाकृतीचे, रचनात्मक कौशल्याचे आकाशदिवेच उच्च अभिरुची दर्शवितात असे नव्हे, तर अगदी साद्या पतंगाच्या कागदापासून तसेच जिलेटिन कागदाच्या पारंपारिक कलाकृतीही आकाशदिव्यांत साजून दिसतात.दिवाळी हा सण येतो तोच झगमगत्या दिव्यांना सोबतीला घेऊन. या सणात नि‍रनिराळ्या प्रकाराच्या दिव्यांनी घरे, दुकाने, गल्लीबोळ असा सगळा परिसर झगमगायला लागतो. अंगणात, घराबाहेर, सज्ज्यावर लावल्या जाणार्‍या पणत्या, दिव्यांच्या माळा यामुळे प्रत्येक घर प्रकाशात न्हाऊन निघते. कुणाच्या गॅलरीत, खिडकीबाहेर टांगलेले रंगीबेरंगी आकाशकंदील नावाचे प्रकाशनृत्य आपली नजर खिळवून ठेवते. वैविध्यपूर्ण आकाशकंदीलांतून पडणार्‍या या प्रकाशाने घराचे अंगण उजळून जाते. दिवाळी पहाट, लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज या दिवशी प्रत्येक घराबाहेर लावलेले आकाशकंदील पाहणेही आनंददायी असते. संध्याकाळी ठिकठिकाणी लखलखणारे हे आकाशदिवेच दिवाळीच्या प्रसन्न, आनंददायी वातावरणाची निर्मिती करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.