Diwali 2022 : धनत्रयोदशीच्या दिवशी यमाला देवाला १३ दिवे का अर्पण केले जातात?

घराच्या दक्षिण दिशेला तोंड करून कणकेचा दिवा लावला तर अकाल मृत्यूचे भय निघून जाते
Diwali 2022
Diwali 2022esakal
Updated on

दिवाळीचा सण जवळ आला आहे; सगळेच दिवाळीसाठी खूप उत्सुक आहेत. दिवाळीमध्ये धनत्रयोदशीला खूप महत्व आहे. धनत्रयोदशीला धन्वंतरीची पूजा करून लोकं आपल्या निरोगी आयुष्याची कामना करतात. याच दिवशी यमदीपदानही केले जाते. यम हा मृत्यूचा देवता आहे. मृत्यू हा कोणालाही चुकलेला नाही, आणि मृत्यूची भीती ही सर्वांना आहेच. या दिवशी घराच्या दक्षिण दिशेला तोंड करून कणकेचा दिवा लावला तर अकाल मृत्यूचे भय निघून जाते. यमाला दिवा लावताना प्रार्थना करावी की, हे यमदेवता सूर्य पुत्रा, हा दिवा मी तुला अर्पण करत आहे. माझे अकाल मृत्यूपासून रक्षण कर. चांगले आरोग्य दे असे म्हणून यमदेवताला यमदीपदान करावे व नमस्कार करावा.

Diwali 2022
Diwali Rangoli 2022 : तुम्हाला माहितीये, रांगोळीची परंपरा हडप्पा संस्कृतीपासून!

यमदीपदानात १३ च दिवे का लावतात?

असं म्हणतात, माणसाच्या शरीरात एकूण १३ प्रकारचे सूक्ष्म वायू असतात. त्यामुळे माणसाचे शरीर संचलित असते. या १३ प्रकारच्या वायूंपैकी कोणताही वायू न्यून झाला तर जीवाला धोका असतो. १३ या संख्येच्या स्वरूपात दीपदान केल्यामुळे एकेका वायूवर असलेले मृत्यूचे आवरण नष्ट होऊन माणसाच्या शरिरात वाहत असलेले १३ वायू सुरळीतपणे कार्य करू लागतात.हे १३ वायू म्हणजे ५ पंचप्राण, ५ पंचउपप्राण, स्थिती, लय आणि उत्पती होय.

Diwali 2022
Diwali Festival 2022 : यंदा दिवाळीत सुर्य ग्रहण; जाणून घ्या लक्ष्मी पुजन कधी करावे

यमदिपदानाचे महत्त्व

यमदिपदानामुळे अपमृत्यूचा आणि अकालमृत्यूचा धोका टळतो; यमदेवाची कृपा आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर राहते. सर्वसाधारणपणे माणसाच्या शरीरातून यमलोकाकडे प्राण जायला जसे १३ दिवस लागतात तसच अपमृत्यू येतांनाही १३ दिवस लागतात पण १३ दीपदान करून आपण त्याचा धोका टाळू शकतो. याने यमलहरी शांत होतात.१३ या अंकात यमाला तृप्त करण्याचे शब्दबीजात्मक स्वरूपाचे सामर्थ्य असल्यामुळे त्रयोदशीच्या दिवशी १३ दीपांच्या स्वरूपात मृत्यूपासून आमचे रक्षण कर असं म्हणत यमाला प्रार्थना केली जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.