लिंबेजळगाव : दीपावलीचा उत्सव हा पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. सोमवारी (ता.२७) वसुबारसने या उत्सवाची सुरवात झाली. कृषिप्रधान संस्कृतीत या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सोमवारी सांयकाळी गाय-वासरास अनेकांनी औक्षण करून पूजा केली. ग्रामीण भागात घरोघरी पूजा करण्यात आली. त्याचप्रमाणे हा दिवस गुरूद्वादशी म्हणूनही साजरा केला जातो. यंदा प्रथमच सलग आठ दिवस दिवाळीचे पर्व सुरू राहणार आहे.