Diwali Vrat 2022 : धनत्रयोदशीला करा हे व्रत, संतती अन् संपत्ती सुखाचा होईल लाभ; जाणून घ्या विधी

Diwali Dhanteras Vrat 2022
Diwali Dhanteras Vrat 2022esakal
Updated on

Diwali Dhanteras Vrat 2022 : प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात सुख- समृद्धी प्राप्त व्हावी असे वाटत असते. मात्र अनेक कारणांनी आयुष्यात काही ना काही अडीअडचणी येत असतात. यात आर्थिक वृद्धी होत नसेल तर मोठे कठिण होऊन बसते. यासह वैवाहिक जिवनात दांपत्याला संतती असणे हे मोठे सौभाग्य असते. जर संतती नसेल तर वैवाहिक जिवन अर्थहीन आहे असे मानले जाते. जिवनाच्या या चक्रात आर्थिक अडचणी, शारीरिक व्याधी, संतती सुख नसणे अशा समस्या उद्भवतात. या समस्यांचे निराकरण व्हावे अन् इच्छित फळाची प्राप्ती व्हावी यासाठी धर्म अभ्यासकांकडून स्कंदपुराणात उल्लेख असलेले गोत्रिरात्र हे व्रत करण्याचा सल्ला दिला जातो. काय आहे हे गोत्रिरात्र व्रत? याचा विधी काय यासह हे व्रत कधी करावे याबद्दल जाणून घेऊया.

(Diwali Dhantrayodashi Gotriratra Vrat 2022 Know the Spiritual significance and ritual)

Diwali Dhanteras Vrat 2022
Diwali Festival Puja 2022 : जाणून घ्या दिवाळीच्या पुजेसाठी लागणारे साहित्य

असे करावे गोत्रिरात्र व्रत

गोत्रिरात्र व्रत करण्याविषयी धर्म अभ्यासक अशोककाका कुलकर्णी सांगतात, आश्विन कृष्ण त्रयोदशी म्हणजेच धनत्रयोदशीपासून लक्ष्मीपुजनाच्या दिवसापर्यंत हे व्रत केले जाते. यात उदयव्यापिनी तिथी घेतली जात असून दोन दिवस ती असेल तर पहिल्या दिवशी तिथी मानली जाते. या व्रतामध्ये गोठा किंवा गाईच्या येण्या-जाण्याचा मार्ग यांपैकी एका सोयीस्कर ठिकाणी 8 फूट लांब व 4 फूट रुंद यज्ञवेदी तयार करून 'सर्वतोभद्र' असे लिहावे. त्यावर छत्राकार वृक्ष काढून फळे, त्यावर फूले व पक्षी काढावेत. झाडाशेजारी मंडळाच्या मध्यभागी गोवर्धनधारी श्रीकृष्ण, डाव्या बाजूस रुक्मिणी, मित्तविंदा, शैल्या, जांबवती; उजव्या बाजूस सत्यभामा, लक्ष्मणा, सुदेवा, नाग्नजिती; त्याच्याच पुढील भागात नंद; मागील भागात बलराम व यशोदा; तसेच, कृष्णासमोरच्या भागात सुरभी, सुनंदा, सुभद्रा, व कामधेनू यांच्या सुवर्णमूर्ती स्थापव्यात. प्रत्येका देवतेची नाममंत्राने पूजा करावी.

Diwali Dhanteras Vrat 2022
Surya Grahan 2022 : 'ग्रहणासारखा मुहूर्त नाही'; अशुभ मानला जाणारा ग्रहण काळ आहे अत्यंत शुभ, महंत सांगतात...

उदा. - गोवर्धनाय नम: |

'गवामाघार गोविंद रुक्मिणीवल्लभ प्रभो ।

गोपगोपीसमोपेत गृहाणार्घ्यं नमोऽस्तु ते ।'

या मंत्राने कृष्णास व

'रुद्राणां चैव या माता वसूनां दुहिता च या ।

आदित्यानां च भगिनी सा न: शान्ति प्रयच्छन्तु ।

या मंत्राने गाईस अर्घ्य द्यावे. यानंतर,

Diwali Dhanteras Vrat 2022
Diwali Festival Muhurat 2022 : यंदा दिवाळीला एकाच दिवशी 2 सण; जाणून घ्या शुभ मुहूर्त

'सुरभी वैष्णवी माता नित्यं विष्णुपदे स्थिता । प्रतिगृह् णाति मे ग्रासं सुरभी मे प्रसीदतु ।'

या मंत्राने गाईस नैवेद्य दाखवावा. विविध फळे, फुले इत्यादी साहित्याने पुजा करून पंचपक्वान्नांचा नैवेद्य दाखवावा. यासह टोपल्यांतून सात धान्ये व सात पक्वान्ने सुवासिनींना द्यावी. अशाप्रकारे तीन दिवस व्रत करून चौथ्या दिवशी सकाळी आंघोळीनंतर गायत्री मंत्राने 108 तिळांची हवनात आहुती द्यावी व उद्यापन करावे. या व्रतामुळे मनुष्याला सुख, संपत्ती यासह संततीचा लाभ होतो असे श्री. अशोककाका कुलकर्णी सांगतात.

Diwali Dhanteras Vrat 2022
Dhanteras 2022 : धनत्रयोदशीला सोने का खरेदी करतात? काय आहे आख्यायिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.