Diwali Festival 2021 : वसुबारस, धनत्रयोदशीने दीपावलीस सुरूवात

दीपावलीचा उत्सव हा पारंपरिक पध्दतीने साजरा केला जातो.
diwali first day
diwali first day
Updated on

लिंबेजळगाव (जि.औरंगाबाद) : दीपावलीचा उत्सव हा पारंपरिक पध्दतीने साजरा केला जातो. मंगळवारी (ता.दोन) धनत्रयोदशीने या उत्सवाची सुरूवात झाली. हा दिवस वसुबारस म्हणुनही ओळखला जातो. एकाच वेळी दोन तिथी आल्याने सर्वांनीच सोमवारी (ता.1) सांयकाळी गाय वासरास ओक्षण करून पुजा केली. ग्रामीण भागात घरोघरी पूजा करण्यात आली. त्याचप्रमाणे हा दिवस गुरूद्वादशी म्हणूनही साजरा केला जातो. (Diwali Festival 2021)

नरक चतुर्दशी व लक्ष्मीपूजन

गुरुवारी (ता.4) नरकचतुर्थी असून या दिवशी पहाटे पाचला अंभ्यगस्नान केले जाते. आमावस्येला गुरुवारी सकाळी 6 वाजता सुरूवात होते. उत्तररात्री 3:30 पर्यंत अमावस्या आहे. गुरुवारी प्रदोष काळी (सायंकाळी) लक्ष्मीपूजन आहे. लक्ष्मीपूजनाचा मुहुर्त दाते पंचागानुसार सायंकाळी 4 ते रात्री 11 पर्यंत लक्ष्मीपुजन मुहुर्त असुन त्यातही पहाटे 6:44 ते 8:58 स्थिर वृचिक लग्न, 8 ते 9 :30 शुभ, दुपारी 12:30 दुपारी 2:30 स्थिर कुंभ लग्न, 3:30 ते 5:40 अमृत, सायंकाळी 6 ते 8 स्थिर वृषभ लग्न, 8 ते रात्री 11 वाजेपर्यंत शुभ व अमृत मुहुर्तावर लक्ष्मीपुजन करता येत असल्याचे वेदशास्त्रसंपन्न गुरुधानोरा येथील बालु गुरुजी जोशी यांनी सांगितले.

वही पूजनास मुहुर्त

शुक्रवारी (ता.पाच) सकाळी 7 ते 8:20, 10:25 ते 11:25 पर्यत वहीपुजनास मुहुर्त असून लक्ष्मीपुजनासोबतही वहीपुजन करता येत असल्याचे ज्योतिषी लक्ष्मण जोशी गुरुजी यांनी सांगितले.

बलिप्रतिपदा (दिवाळीचा पाडवा)

शुक्रवारी (ता.5) नवीन विक्रम संवत सुरू होते. बलिप्रतीपदा म्हणजे दिवाळीचा पाडवा. या दिवशी पत्नीने आपल्या पतीस ओवाळणे, नवीन दुकान, विविध कार्याचा शुभारंभ करण्याचा दिवस असतो. शेतीच्या अवजाराचे पुजनही याच दिवशी केले जाते. जु, वखर, तिफन, नागर आदी शेती अवजारे रांगेत ठेवून त्याची पाडव्याला पुजा करावी. हे पुजन दिवसभर करता येते असे लिंबेजळगाव (ता.गंगापूर) येथील वेदमूर्ती दीपक जोशी गुरुजी यांनी सांगितले.

भाऊबीज

शनिवारी (ता.सहा) भाऊबीज आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाला ओवाळते व भाऊ बहिणीचे रक्षण करेल अशी प्रतीज्ञा करुन बहिणीला काहीतरी भेटवस्तु देत असतो. हे पुजन दिवसभर चालते.

लक्ष्मीपूजनच्या वेळी.....

घराच्या मुख्य दरवाजाला आंब्याची पाने आणि झेंडुच्या फुलाचे तोरण लावून दरवाजाच्या बाहेरील बाजुस दोन्ही पटावर स्वास्तिक काढावे. उंबरठ्याजवळ बाहेरून घरात येणारी लक्ष्मीची पावली रांगोळीने काढावीत. दक्षिण, दक्षिण - पूर्व व आग्नेय कोपरा या दिशाना लाल व नारंगी, तर उत्तर- पश्चिम दिशेला हिरव्या रंगाचा विजेचा दिवा वापरल्याने लक्ष्मी प्रसन्न होते. पूर्वमुखी व उत्तरमुखी होउनच लक्ष्मीपुजन करावे. लक्ष्मीपुजनाच्या वेळी चार वातीचा दिवा लावणे अंत्यत शुभ मानले जाते. लक्ष्मीपुजनावेळी ऊस घरात आणून त्याचीही पुजा करावी. त्यामुळे ऐश्वर्य प्राप्त होते. लक्ष्मीपूजनासाठी ईशान्य कोपऱ्यातील जागा सर्वोत्तम मानली आहे. पुजा करताना तोंड ईशान्येस, पुर्वेस, उत्तरेस असावे. लक्ष्मीची मूर्ती किंवा लहान आकाराचे चित्र असावे.

लक्ष्मीपूजन करताना.........!

लक्ष्मीपूजन करताना एक चौरंग किंवा एखादे नवीन कापड घेऊन त्यावर एका बाजुस श्रीगणेशाची मुर्ती किंवा प्रतिमा ठेवावी. त्याच्या उजवीकडे लक्ष्मीमातेची मूर्ती ठेवावी. तिच्या पलीकडे सरस्वतीची मूर्ती अथवा प्रतिमा ठेवावी. या वेळी लक्ष्मीच्या जवळच्या एका पात्रामध्ये केशर व चंदन उगाळुन केलेल्या गंधाचे अष्टंगधाने कमळ काढावे. या कमळाच्या आकृतीवय श्रीयंत्र, कुबेर यंत्र, कनकधरायंत्र, द्रव्यलक्ष्मी (रोख नाणी नोटा) आदी गोष्ठी ठेवाव्यात. आणि त्याचीही पुजा श्री गणेशाच्या पुजेबरोबर करावी. लक्ष्मीला कधीही हात जोडुन नमस्कार न करता साष्टांग नमस्कार करावा.

आकाश दिव्याचे महत्त्व

दिवाळीत आकाशदिव्यांना अनन्यसाधारण महत्त्व असून त्याची परंपरा त्रेतायुगापासून आहे. आकाश दिव्यातुन प्रक्षेपित होणाऱ्या सात्विक लहरीमुळे वास्तुभोवती संरक्षण कवच निर्माण होते व अनिष्ठ शक्तीपासून वास्तुचे रक्षण होते.

पणत्याचे महत्त्व

दिवाळीत तेलाच्या पणत्या लावतात. तेलाचा दिवा सभोतालच्या परिसरातुन एक किलोमीटर वरून सात्विक लहरी खेचून आणतो. याउलट मेनाच्या दिव्यातुन केवर रज, तम, कण यांचे प्रक्षेपण होते. तर विजेचा दिवा बहिर्मुख करतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()