Diwali Festival 2022 : कार्तिक हा मराठी महिन्यातील आठवा आहे. यंदा इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे हा महिना २६ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला बलिप्रतिपदा म्हणजे दिवाळीतील पाडव्यापासून सुरु होणाऱ्या या महिन्यात मोठ्या भक्ती-भावाने देवतांची पुजा केली जाते. उत्सवापासून सुरु होणाऱ्या या महिन्याचे नाव शिवपुत्र कार्तिक स्वामी यांच्या नावावर आहे. या महिन्यापासून हिवाळ्याला सुरुवात होत असते. त्यामुळे पूजेसोबतच हा महिना आरोग्यासाठीही विशेष आहे. चला तर अशा या कार्तिक महिन्याचे महत्व यासह या महिन्यात काय करावे हे जाणून घेवूया.
(Do these things in Kartik month Spiritual importance in Diwali Festival 2022 )
ज्या लोकांचे मन अशांत राहते, अशा लोकांनी कार्तिक महिन्यात नामस्मरण आणि ध्यान करावे. हा काळ नामजप आणि ध्यानासाठी वरदान आहे. या दिवसांमध्ये वातावरण असेच राहते, त्यामुळे मन लवकर एकाग्र होते. नामजप आणि ध्यान केल्याने मानसिक त्रास दूर होतात.
या महिन्यापासून थंडीचा हंगाम सुरू होतो. अशा परिस्थितीत गरजू लोकांना थंडीपासून बचाव करणारे ब्लँकेटसारखे गरम कपडे दान करावे. सणांचा काळ असेल तर तुम्ही पैसे, धान्य, नवीन कपडे, चप्पल गरजू लोकांना दान करू शकता. या दिवसात गायींच्या संगोपनासाठी दान करावे यामुळे कुटुंबात सुख-समृद्धी नांदते.
कार्तिक महिन्यात पवित्र नद्यांमध्ये स्नान करून दिवे दान करण्याची परंपरा आहे. त्याची सुरुवात कोजागिरी पौर्णिमेपासून होते. याच कारणामुळे कार्तिक महिन्यात अनेक लोक स्नान करण्यासाठी देशातील सर्व पवित्र नद्यांवर पोहोचतात. या स्नानानंतर सूर्याला अर्घ्य अर्पण करावे. स्नान घाटावर गरजू लोकांना दान करावे असे सांगितले जाते यामुळे महालक्ष्मीची सदैव कृपादृष्टी आपल्यावर राहते.
कार्तिक महिन्यापासून हिवाळा सुरु होते. त्यामुळे या महिन्यात थंडी वाढते. या दिवसांमध्ये पौष्टीक आहारावर भर देणे गरजेचे आहे. या दिवसात शरीराला थंडीशी लढण्याची ताकद मिळेल अशा पदार्थांचा आहारात समावेश करा. यादिवसात कोमट केलेले केशर दूध प्यावे. हंगामी फळे खावी. तसेच या महिन्यात पेहरावाकडेही लक्ष दिले पाहिजे. असे कपडे परिधान करावे, ज्यातून बाहेरच्या थंडीचा शरीरावर जास्त परिणाम होणार नाही, अन्यथा सर्दी, खोकल्यासारखे मौसमी आजार होऊ शकतात.
संकलन - गिताश्री पुराणिक.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.