Shardiya Navratri 2023: यंदाच्या नवरात्रीत करा फक्त 'हे' काम, जाणून घ्या

सध्या सर्वत्र नवरात्रौत्सवाची धामधूम पहायला मिळत आहे.
Navratri
Navratri sakal
Updated on

हिंदू धर्मात शारदीय नवरात्रीला खूप महत्त्व आहे. यावर्षी नवरात्रीची सुरुवात 15 ऑक्टोबर 2023 पासून होत आहे, जी 23 ऑक्टोबर 2023 पर्यंत चालणार आहे. यानंतर 24 ऑक्टोबर 2023 रोजी दसरा साजरा आहे.

नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते. अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून सुरू होणारे नवरात्र नवमी तिथीपर्यंत चालते.

नवरात्रीच्या 9 दिवसात काही विशेष कार्य केले तर आई जगदंबा लवकरच प्रसन्न होते. त्यामुळे नवरात्रीमध्ये काही खास गोष्टी लक्षात ठेवा.

नवरात्रीत या गोष्टी लक्षात ठेवा

- नवरात्रीच्या 9 दिवसांत घरातील स्वच्छता आणि पवित्रतेची विशेष काळजी घ्या. नवरात्रीच्या आधी साफसफाई करा. तसेच 9 दिवस दररोज प्रवेशद्वारावर कुंकू आणि हळद लावून लक्ष्मीचे पाऊल बनवा.

- नवरात्रीच्या काळात दररोज ब्रह्म मुहूर्तावर स्नान आणि ध्यान करून दुर्गा देवीची पूजा करा आणि दररोज संध्याकाळी आरती करा. तसेच दुर्गा देवीला तिच्या आवडत्या वस्तू अर्पण करा. यामुळे देवी प्रसन्न होते.

नवरात्रीमध्ये अखंड ज्योती प्रज्वलित केल्याने माणसाची प्रत्येक इच्छा पूर्ण होते. त्यामुळे नवरात्रीच्या काळात विधीप्रमाणे अखंड ज्योती लावा. तसेच शेवटच्या दिवशी हवन आणि कन्या पूजन करावे.

Navratri
Navratri 2023 : शारदीय नवरात्रौत्सवात देवीच्या व्रताचे महत्व काय ? ९ दिवसच का साजरा केला जातो हा उत्सव ?

ही चूक करू नका

नवरात्रीमध्ये शुद्धता आणि पावित्र्याची विशेष काळजी घेतली जाते. या काळात अशी कोणतीही वस्तू घरात आणू नका, अन्यथा दुर्गा देवीची नाराजी होऊ शकते. त्यामुळे नवरात्रीच्या काळात मांसाहार, मादक पदार्थाचे सेवन करू नका किंवा घरात आणू नका. नवरात्रीत सात्विक अन्नच खावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.