Astro Tips : श्रीमंत व्हायचंय? 'या' सवयी पाळा, दिसेल काही दिवसातच फरक

त्या कोणत्या सवयी आहेत, जाणून घ्या
astro tips
astro tipssakal
Updated on

जीवनात अडचणी येतच असतात. कोणी त्यावर शांती करा, होम हवन करा हे उपाय सांगते. तर कोणी घरात वास्तूशास्त्रानुसार बदल करण्यास सांगते. यामुळे खरंच किती फायदा होतो हे एक कोडे असले तरी लोक त्याचा अवलंब करतात.

संकटांच्या फेऱ्यात अडकल्यावर लोकांना काहीच कळेनासे होते. अशावेळी आपण दिसेल ते उपाय करतो. अनेकांना खूप कष्ट करूनही पैसा कमवणे जमत नाही. त्यामुळे अनेक प्रकारच्या समस्यांनी घेरले जाते.

अशा स्थितीत पैशाची कमतरता आणि अनेक समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रात काही उपाय सांगितले आहेत.

astro tips
Astrology: V अक्षरापासून नाव असणाऱ्या लोकांचा स्वभाव कसा असतो?

मोठे श्रीमंत लोक घरी नित्यनियमाने काही गोष्टी करतात. त्या गोष्टींचा परिणाम म्हणून त्यांच्याकडे पैसा आणि आरोग्य टिकून राहते. त्यामुळे काही सवयी स्वत:ला लावून तूम्हीही देवाला प्रसन्न करून धन, दौलत कमावू शकता. त्या कोणत्या सवयी आहेत हे पाहुयात.

  • सकाळी उठल्याबरोबर आई-वडील, शिक्षक आणि वडिलधाऱ्यांना नमस्कार करा आणि त्यांचे आशीर्वाद घ्या. रोज गाईला गूळ आणि चपाती खायला घालावी. तिची पूजा करावी. यामुळे तूमच्या मनात असेलले इच्छित कार्य पूर्ण होईल.

astro tips
Astro Tips: घरात घडणाऱ्या या घटना मानल्या जातात अशुभ, कारण...
  • तुमच्या शहर किंवा गावाजवळ असेल्या तलाव, नदी किंवा समुद्रात कणकेचे गोळे माशांना खाऊ घालावेत. दारात येणाऱ्या कुत्र्यांना भाकरी खायला द्यावी. बागेत येणाऱ्या पक्ष्यांना धान्य खायला ठेवावे. असे करणे शास्त्रात शुभ मानले जाते.

  • घरी आलेल्या पाहुण्यांना काय हवं नको ते पहावे. त्यांची सेवा करावी. रोज स्वयंपाक करताना पहिली चपाती देवाच्या नावाने बनवावी. त्यासोबत गुळ आणि तूप घालून बृहस्पतीला देवाला अर्पण करावी. यामुळे अन्नपूर्णा नेहमी प्रसन्न होते.

astro tips
Astrology: S अक्षरापासून नाव असणाऱ्या लोकांचा स्वभाव कसा असतो?
  • रोज सकाळी स्नान करून भगवान शंकराच्या शिवलिंगाला जल अर्पण करावे. शिवलिंगासमोर ओम नमः शिवाय या मंत्राचा १०८ वेळा जप करावा.

  • दर शनिवारी पिंपळाच्या झाडाला पाणी, थोडे कच्चे दूध अर्पण करावे. त्याच्या सात प्रदक्षिणा घालाव्यात. सूर्यदेवतेची आणि पिंपळाची पूजा करावी.

  • तसेच, झाडाला वाहिलेल्या पाण्याने डोळ्यांवरून हात फिरवावा. असे करताना पितृदेवाय नमः असे म्हणावे. यामुळे कुंडलीत असलेले राहू, केतू, शनि-पितृ दोष सुधारतात.

  • सकाळी सूर्यासमोर बसून गुरु मंत्राचा जप करावा.निस्वार्थी भावनेने शक्य असेल तेवढे गरिबांना दान करावे.

  • प्रत्येक जीवाबद्दल करुणा, आपुलकीची भावना ठेवा. रविवार किंवा मंगळवारी कोणाकडून उधार किंवा कर्ज घेऊ नका. बुधवारी कर्ज घेतले तर त्याची परतफेड मंगळवारी करा.

  • स्वयपाकातील पहिली चपाती गायीला आणि शेवटची चपाती कुत्र्याला द्यावी. यामुळे घरात लक्ष्मीचे, रिद्धी-सिद्धीचे आगमन होईल. पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी गायत्री महामंत्राचा नियमित साधना करावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.