Surya Grahan 2022 : यंदा 25 ऑक्टोबर मंगळवार रोजी खंडग्रास सुर्य ग्रहण आहे. या वर्षातील शेवटचे असणारे हे ग्रहण नेमके दिवाळीच्या पर्वात येत आहे. ग्रहण शुभ मानले जात नाही. त्यामुळे या काळात शुभ कार्य करु नये असे म्हटले जाते. ग्रहण काळात काय करावे, काय करु नये असे अनेक प्रश्न उद्धवतात. या सर्व प्रश्नांसह नेमके ग्रहण कधी सुरु होणार, याचे वेध कधी लागणार याविषयी आपण जाणून घेवूया.
(Dont do these things during Surya grahan 2022 Solar Eclipse date time)
भारतात असे दिसेल सुर्यग्रहण
धर्म अभ्यासक पं. नरेंद्र धारणे सांगतात, यावर्षी अश्विन कृष्ण अमावस्या म्हणजेच 25 ऑक्टोबर मंगळवार रोजी खंडग्रास सुर्यग्रहण आहे. हे ग्रहण पूर्ण भारतात दिसणार आहे. या सुर्यग्रहणाचे भारतात ग्रस्तास्त दिसणार असल्यामुळे ग्रस्त असलेले सुर्यबिंब अस्ताला जाईल. त्यामुळे भारतामध्ये कोठेही ग्रहण मोक्ष दिसणार नाही म्हणून स्पर्शकालापासून सुर्यास्तापर्यंत पुण्यकाल मानावा .
ग्रहणाचा स्पर्श : दुपारी 4 वाजून 49 मी.
ग्रहण मध्य : दुपारी 5 वाजून 43 मी.
ग्रहण मोक्ष (सुर्यास्त) : संध्याकाळी 6 वाजून 08 मी.
ग्रहणाचा पर्वकाल : 1 तास 19 मिनीटे राहील.
असे असतील ग्रहणाचे वेध
ग्रहणाचे वेध मंगळवारच्या पहाटे 3 वाजून 30 मिनीटांपासून लागणार असून सुर्यास्तापर्यंत ग्रहणाचे वेध पाळावे. बाल, वृद्ध, अशक्त, आजारी व्यक्ती आणि गर्भवतींनी मंगळवारी दुपारी 12 वाजेपासून सुर्यास्तापर्यंत वेध पाळावे.
वेध सुरु असताना काय करावे अन् काय करु नये...?
यावर पं. धारणे सांगतात, वेध सुरु असताना भोजन करू नये, मात्र स्नान, जप, देवपूजा, श्राद्ध इत्यादी कर्म करता येतील. तसेच पाणी पिणे, झोपणे, मलमूत्र उत्सर्ग करता येईल. ग्रहण पर्वकाळात म्हणजेच ग्रहण स्पर्श ते सुर्यास्त या काळात दुपारी साधारण 4.49 ते सायंकाळी 6.08 पर्यंत पाणी पिणे, झोपणे, मलमूत्र ही कर्मे करू नयेत.
ग्रहण काळात हे करावे
ग्रहण स्पर्श होताच स्नान करावे, पर्व काळामध्ये देवपूजा, तर्पण, श्राद्ध, जप, होम, दान करावे. पूर्वी घेतलेल्या मंत्राचे पुरश्चरण ग्रहणात करावे. ग्रहण मोक्षानंतर स्नान करावे. अशौच असतांना म्हणजे सुतक असताना ग्रहण काळात ग्रहणासंबंधी स्नान, दान करण्यापूर्ती शुद्धी असते.
(ग्रहण माहिती व वेळ संदर्भ - दाते पंचांगानुसार)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.