जेव्हाही वास्तूचा विषय निघतो, तेव्ही ब्रह्मस्थानाचे सर्वाधिक महत्व सांगितले आहे. हा घरातला एकदम मध्यातला भाग असतो. आणि इथूनच पूर्ण घराला ऊर्जा प्रवाहित होते असे मानले जाते. असे मानले जाते की, इथे ब्रह्माचा वास असतो असे मानले जाते. वास्तूशास्त्रात वास्तू पुरूष ही कल्पना केली जाते. जो अधोमुखी झोपलेला असतो. जेंव्हाही घरात वास्तू पूजा केली जाते तेंव्हा या काल्पनिक वास्तू पुरूषाची पूजा केली जाते.
ब्रह्मस्थानाला मोकळे ठेवण्याचा सल्ला दिला जातो. जूने लोक घराच्या मध्याभागी एक चौकोन करायचे. ब्रह्मस्थानाला आकाश तत्व मानले जात असल्याने हे आवश्यक आहे. म्हणून हे खुले सोडणे लाभ दायक आहे. सध्याच्या काळात असे करणे शक्य नाही पण काही दोष्टींचा काळजी घेणे आवश्यक आहे.
जड फर्निचर ठेऊ नये
ब्रह्मस्थानाला आकाश तत्वाला जोडले जाते. म्हणून इथे जड वस्तू ठेऊ नये असे सांगितले जाते. काही लोक घराच्या सेंटरला सोफा किंवा डाइनिंग टेबल किंवा इतर फर्निचर ठेवतात. त्यामुळे या स्थानाची पॉझिटीव्हीटी ब्लॉक होते.
जागा मोकळी ठेवण्याचा प्रयत्न करावा
ब्रह्मस्थानाला शक्य तोवर मोकळे ठेवावे. जर तुम्ही नवीन घर बनवत असाल तर सेंटरची जागा ओपन टू स्काय ठेवावे. ज्यामुळे आकाश तत्वाची एनर्जी घराला मिळत राहिल. पण जर तुम्ही शहरी भागात राहत असाल तर असे करणे शक्य नसते. इथे तुम्ही पॉलीकार्बोनेटची ट्रांस्परंट शीट लावू शकतात.
कधीही पिलर लावू नये
ब्रह्मस्थान घराच्या सेंटरला असल्याने तिथे कोणत्याही प्रकारचे पिलर बनवू नये. हे केवळ वास्तूच्या नाही तर विज्ञानाच्या दृष्टीनेही आवश्यक आहे. ब्रह्मस्थानाला घराची सेंटर ऑफ ग्रॅव्हीटी असते. जर खदी भूकंप झाला तर सगळ्यात आधी हा भाग हलतो आणि सगळे घर खाली कोसळते. म्हणून इथे कोणताही पिलर नसावा. आणि गरज पडतच असेल तर सेंटर सोडून थोडे डावीकडे बनवावे.
अस्वच्छता नसावी
ब्रह्मस्थानाला ब्रह्माचे स्थान मानले गेल्याने इथे थोडीही घाण झाली तर घरात नकारात्मकता वाढते. काही लोक आपले चप्पल बूट घरात ठेवतात. ते ब्रह्मस्थानावर ठेवणे टाळावे. शिवाय या स्थावर कचरा नसावा.
जिन्याची सुरूवात नसावी
काही लोक ड्रॉइंग एरिया घराच्या सेंटरला बनवतात. आणि ब्रह्मस्थानावरून जिन्याची सुरूवात करतात. असे करणे याग्य समजले जात नाही. जर तुमच्या घराची रचना अशा आहे की, ब्रह्मस्थानावरील वस्तूंची रचना तुम्हाला बदलता येणार नसेल तर तिथे ब्लू लाइट लावावा. जेणे करून तिथे आकाशतत्वाचा प्रभाव वाढेल.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.